आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१९ जुलै १६४७*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ जुलै १६४७*
महादभट मुद्गल पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे येऊन सांगितले की, मला पर्वती, पिंपळे सौदागर आणि पिंपरी या प्रत्येक गावात एक एक चावर जमीन याप्रमाणे तीन चावर जमीन आणि पुणे परगण्याच्या जकातखात्यातून दिवाबत्तीकरिता रोज तीन रुके असे इनाम आहे. हे इनाम निजामशाही फर्माने, मलिकअंबराचे खुर्द्खत, वाजीरांनी दिलेली भोगवट्याची पत्रे आणि शहाजीराजांनी दिलेले खुर्दखत यांच्याप्रमाणे शुहूर सन १०४७ पर्यंत चालले आहे. यावर्षी सुभेदार दादाजी कोंडदेव यांना देवाज्ञा झाली म्हणून महालीचे कारकून नवीन खुर्दखत आणा असा आक्षेप घेतात. तरी कृपा करून हे इनाम चालू ठेवण्याची आज्ञा व्हावी.
हि सर्व विनंती शिवाजीमहाराजांना या पत्रात उद्धृत केली आहे आणि गतवर्षीपर्यंत ज्याप्रमाणे हे इनाम चालत आले आहे, त्याप्रमाणे पुढे हि चालू ठेवावे असा हुकुम केला आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ जुलै १६५९*
गोव्याच्या किल्ल्यातील दालनात वाचले गेलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र-
छत्रपती शिवाजीराजांचे दंडयाच्या सिद्दी व त्या बंदरातील हबशी (सिद्दीची प्रजा) यांच्याशी वितुष्ट आहे. छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या सरहद्दीवर (सिद्दी विरुद्ध) काही घोडेस्वार व प्यादे पाठवले होते. तेव्हा चौल व वसई येथील कॅप्टन सिद्दीला रसद पुरवीत होते आणि सर्व प्रकारची मदत करीत होत.
ह्या (गोवा पोर्तुगीज) राज्यासी असलेल्या छत्रपती शिवाजीराजांच्या मैत्रीला हि गोष्ट अत्यंत बाधक आहे.
चर्च नंतर सल्लागार मंडळातील सभासदांनी एकमताने निर्णय घेतला की, त्यांनी (चौल व वसई येथील कॅप्टन) दंडयाच्या हबस्याला मदत करू नये, परंतु गुप्त पणे व कोणालाही समजणार नाही आणि छत्रपती शिवाजीराजांना सुगावा लागणार नाही अश्या प्रकारे मदत केल्यास हरकत नाही, असे पत्र लिहावे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ जुलै १६५९*
महाराजांच्या नाविक उपक्रमाचा सर्वात जुना उल्लेख १९ जुलै १६५९ मध्ये येतो. महाराजांनी या कामासाठी रूय लैताव व्हियेगश व फेर्नाव व्हियेगश व ३०० पोर्तुगीज व टोपँझ कारागीर यांना ठेवले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ जुलै १६७६*
"छत्रपती शिवराय" आणि "आदिलशहा" यांच्यात तह.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ जुलै १६९४*
परंड्याचा किल्ला म्हणजे दारूगोळ्याचे भांडार
प्राचीन काळापासून परंडा किल्ला परगणा म्हणजे जिल्ह्याचे ठिकाण असून बहामनी काळात ख्वाजा जहान तर आदिलशाहीत गालीब खान हे किल्लेदार राहिले आहेत. पुढे १६५७ साली मोगलांनी परंडा जिंकून घेतल्यानंतर मीर महंमदखान आणि इज्जतखान हे किल्लेदार होते. पैकी १९ जुलै १६९४ च्या एका पत्रानुसार किल्लेदार इज्जतखानाने किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ इज्जतपुरा नावाने नवीच वस्ती वसविली होती. त्याच्याच काळात परंडा किल्ल्यात रोगाची साथ पसरल्याची नोंद आहे. मध्ययुगीन कालखंडात परंड्याप्रमाणे नळदुर्ग हा जिल्हा असला तरी नळदुर्गमधील किल्ल्यातल्या एका बुरुजाला परंडा बुरूज हे नाव आहे. परंड्याच्या किल्ल्यात भरपूर युद्धसामग्री साठवून ठेवलेली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ जुलै १७३९*
वसईच्या पाडावानंतर पोर्तुगीज सैन्याला आणि त्यांच्या बायकामुलाना मराठ्यानी गोव्यास जाऊ दिले. परंतु गोव्यातील मराठा सैन्य अजून तिकडे रेंगाळत मागे राहिले होते. साष्टी प्रांतातील मराठा सैन्य माघारा परतले, तरी व्यंकटराव घोरपडे त्या सैन्याबरोबर गेले नाहीत. ते सांगे येथे जाऊन राहिले. दाजीराव भावे नरगुंदकर कुकळ्ळीला ठाण मांडून राहिले होते. पोर्तुगीजांकडून ते आणखी काही उपटण्याची अपेक्षा करीत होते. ती रक्कम मिळाल्याखेरीज ते मडगावहून सैन्य हलविणार नाहीत ह्याची जाणीव होताच पोर्तुगीजानी त्यांच्या हातावर देऊ केलेली रक्कम ठेवून त्याना मडगावचा कोट खाली करावयास लावला. दि. १९ जुलै १७३९ या दिवशी पोर्तुगीजानी मडगावच्या कोटाचा ताबा घेतला. परंतु त्यानी तो लगेच पाडून जमीनदोस्त करून टाकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ जुलै १७४५*
शिंदे घराण्यांचे संस्थापक राणोजी शिंदेची पुण्यतिथी
मराठ्याच्या इतिहासात शिंदे घराणे पराक्रमी व एकनिष्ठ म्हणून प्रसिद्ध होते. साता-याजवळ २० कि.मी. अंतरावरचे कोरेगाव तालुक्यातील कण्हेर - खेड हे शिंदे पाटलांचे मूळ गाव होय. याच घराण्यातील राणोजी शिंदे हे पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या पदरी नोकरी करीत होते. मात्र राणोजीचा उत्कर्ष हा थोरले बाजीराव पेशव्यांच्या काळात झाला. जुने जाणते लोक आपल्या गणितात बसणार नाही. त्यामुळे आपल्या बरोबर तरुण कर्तबगार शूर लोकांचा भरणा असावा. हा बाजीरावांचा विचार होता. त्यामुळे अगदी सामान्य कुटुंबातील शिंदे व होळकर यांना बाजीरावांनी आपल्या बरोबर घेतले. बाजीरावांची निवड सार्थ ठरवून शिंदे व होळकरांनी उत्तरेत अनेक पराक्रम गाजवले. त्यांतील शिंदे घराण्यातील राणोजींनी आपल्या पराक्रमाने उत्तरेतील माळव्याची सुभेदारी मिळवली. बाजीरावांशी राणोजी नेहमी एकनिष्ठ व प्रामाणिक राहिले. त्यांनी मध्यप्रदेशातील उज्जनी येथे आपले बस्तान बसवले. पुढे शिंदेनी ग्वाल्हेर हे आपले वास्तव्य स्थान मिळवले. थोरले बाजीरावाच्या कर्नाटक मोहिमेपासून राणोजी सदैव बरोबर असत. थोरल्या बाजीरावांनी १७३७ मध्ये निजामाचा भोपाळ येथे दारुण पराभव केला. त्या युद्धात राणोजी शिंदे यांनी अतुल पराक्रम गाजवला. माळव्यांची मोहिम तसेच राजपुतांनात चौथाई - सरदेशमुखी वसूल करण्याचे काम राणोजींनी मल्हारराव होळकरांबरोबर धडाडीने केले. १७३५ मुघल बादशहा महमंद रंगीला याने खानदुरान आणि वजीर कमरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली दोन लाख सैन्यानिशी दोन मोहिमा मराठ्यांविरुध्द पाठविल्या. त्याप्रसंगी मुघलांची रसद तोडण्याचे महत्त्वाचे काम राणोजींनी केले. त्यामुळे मुघलांच्या दोन्ही मोहिमा अयशस्वी ठरल्या . थोरले बाजीरावांच्या उत्तरेच्या राजकारणात राणोजी शिंदे यांनी नेहामी सहकार्य केले. एवढेच नव्हे चिमाजी आप्पा यांच्या वसईच्या मोहिमेत सुध्दा राणोंजी शिंदेनी पराक्रम गाजवला होता. २८ एप्रिल १७४० मध्ये थोरले बाजीरावांचे मध्यप्रदेशातील रावरखेडी येथे निधन झाले. त्यावेळी राणोजी शिंदे यांनी थोरले बाजीरावांची समाधी बांधण्याचे काम पेशवे नानासाहेब पेशव्यांच्या इच्छेनूसार हाती घेतले. रावरखेडी येथील बाजीरावांची खणखणीत समाधी राणोंजीनी आपलेपणाने केली. आज त्या समाधीनी अवस्था बिकट झाली आहे. त्यांची दुरुस्थी झाली पाहिजेत . मात्र त्यात पक्ष कोणताही असो त्यांची राजकीय इच्छा शक्ती कमी पडते. राणोंजी शिंदे यांनी अगदी कण्हेर खेडच्या पाटीलकीपासून उज्जनी व माळव्याचे अधिकारापर्यत आपला उत्कर्ष पराक्रम व प्रामाणिकपणामुळे केला. राणोजी हे शूर शिंदे घराण्यांचे संस्थापक होते. त्यांना जयप्पा, दत्ताजी, ज्योतिबा, तुकोजी व महादजी असे शूर पुत्र होते. त्यांनी आपल्या शौर्याने मराठ्यांच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले. अशा या पराक्रमी राणोजींचे निधन १९ जुलै १७४५ मध्ये झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ जुलै १८२७*
क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म
(मृत्यू: ८ एप्रिल १८५७)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment