१९ जुलै १६४७*आजचे ऐतिहासिक पिपळे सौदागर येथील जुने सदर्भ दिनविशेष
*१९ जुलै १६४७*
महादभट मुद्गल पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे येऊन सांगितले की, मला पर्वती, पिंपळे सौदागर आणि पिंपरी या प्रत्येक गावात एक एक चावर जमीन याप्रमाणे तीन चावर जमीन आणि पुणे परगण्याच्या जकातखात्यातून दिवाबत्तीकरिता रोज तीन रुके असे इनाम आहे. हे इनाम निजामशाही फर्माने, मलिकअंबराचे खुर्द्खत, वाजीरांनी दिलेली भोगवट्याची पत्रे आणि शहाजीराजांनी दिलेले खुर्दखत यांच्याप्रमाणे शुहूर सन १०४७ पर्यंत चालले आहे. यावर्षी सुभेदार दादाजी कोंडदेव यांना देवाज्ञा झाली म्हणून महालीचे कारकून नवीन खुर्दखत आणा असा आक्षेप घेतात. तरी कृपा करून हे इनाम चालू ठेवण्याची आज्ञा व्हावी.
हि सर्व विनंती शिवाजीमहाराजांना या पत्रात उद्धृत केली आहे आणि गतवर्षीपर्यंत ज्याप्रमाणे हे इनाम चालत आले आहे, त्याप्रमाणे पुढे हि चालू ठेवावे असा हुकुम केला आहे.
Comments
Post a Comment