आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳📜 ७ जुलै इ.स.१६७७( आषाढ वद्य तृतीया, शके १५९९, संवत्सर पिंगळ )

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

📜 ७ जुलै इ.स.१६७७
( आषाढ वद्य तृतीया, शके १५९९, संवत्सर पिंगळ )

शेरखानची सपशेल शरणागती :-
        आक्रमक मराठ्यांचा रणावेश पाहून तिरुवाडी परिसरातुन पळालेला शेरखान, बोनागीरमपट्टनमच्या किल्ल्यात गेला अशी खबर आजच्या दिवशी मिळाली. मराठ्यांनी त्याच किल्ल्याला वेढा दिला. ह्या वेढ्याने फक्त नावाचाच शेर असलेला शेरखान हादरून गेला. मराठे काही पिछा सोडत नाहीत, हे पाहून नाईलाजाने तहास तयार झाला. आपल्या प्रांतातील सर्व मुलुख, २०,००० होन आणि मुलाला ओलीस ठेवण्याचे कबूल करून त्याने शिवरायांशी तह मंजूर केला. 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 ७ जुलै इ.स.१६८१
सिद्दीविरुद्ध संघर्ष - उंदेरीवरील हल्ला 
शिवछत्रपतींच्या निधनानंतर ज्या परिस्थितीत संभाजी राजांनी मराठी सत्तेची सूत्रे हाती घेतली, त्या परिस्थितीत त्यांना बाह्य आणि अंतर्गत धोके निर्माण होणे हि गोष्ट अटळ होती. १६८० च्या उत्तरार्धात पश्चिम किनार्यावर असणाऱ्या शिद्दीने विरुद्ध आक्रमक हालचाली करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे या शत्रूला प्रथम आवर घालणे आवश्यक होते. शिद्दीवरील स्वारीची पूर्वतयारी म्हणून उंदेरी या छोट्या बेटावर प्रथम हल्ला करण्याचे संभाजीराजांनी ठरवले. त्याप्रमाणे नागोठाणे येथे असलेल्या जवळजवळ तीन हजार सैनिक व २२ गलबते यांच्या एका मराठी काफिल्याने ऑगस्ट १६८० मध्ये उंदेरीवर हला चढवला, परंतु सिद्दीने हा हल्ला परतवून लावला. या अपयशाने खचून न जाता ७ जुलै १६८१ च्या पाहटे मराठी आरमाराने उंदेरीवर दुसरा हल्ला चढविला. हा हल्लाही अयशस्वी झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ७ जुलै इ.स.१७३३
छत्रपती शाहूराजे ह्यांनी उमाबाई दाभाडे हिस पत्र लिहून कळवले कि, दंडाराजपुरीच्या सिद्दीने अमर्यादाने वागून कोकणात उत्पाद आरंभिला; म्हणून फत्तेसिंह भोसले प्रतिनिधी व पंतप्रधान ह्यांस पाठवून आम्ही मोहीम आरंभ केली. रायगड आदी करून कोकणातील गडकोट हबशाकडून घेतले, मुलुख काबीज केला, दंडाराजपुरी व दोन-चार स्थळे फक्त राहिली आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ७ जुलै इ.स.१७९९
तिमूरशहाला एकूण ६३ मुलंमुली होते - त्यातले २४ मुलगे. त्यापैकी शाह झमान इतरांचे खून वगैरे करून १७९५ मध्ये गादीवर आला. तेव्हा त्याला कळालं की तिजोरीत खडखडाट आहे. मग त्यानेही त्याच्या आजोबाने केलेला उपाय अवलंबायचा ठरवला. कोणता - तर खैबरखिंडीतून जाऊन उत्तर भारतावर हल्ला करून लुटालूट करायचा हा तो उपाय. मग काय तयारीला लागला तो. १७९९ मध्ये खैबरखिंड उतरून लाहोरला येऊन थांबला. आता पुढे उत्तर भारत मोकळाच होता. 
पण खरंच होता का उत्तर भारत मोकळा? नाही! त्यावेळी इंग्रज भारताच्या राजकारणात शिरकाव करू लागलेले होते आणि त्यांचे लागेबांधे दूरदूरच्या राजांशी होते. त्यावेळी बंगालचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड वेलस्ली. शाह झमान लाहोरला आलेला आहे आणि तो कधीही लूट करायला हल्ला करू शकतो हे समजताच वेलस्लीने एक खेळी खेळली. त्याने इराणच्या शहाशी संधान साधलं आणि त्याला कळवलं की शाह झमान लाहोरला आलेला आहे. ही चांगली संधी आहे मागून जाऊन अफगाणांचं राज्य जिंकायची. त्याप्रमाणे इराणच्या शहाने शाह झमानच्या हेरात प्रांतावर हल्ला केला. ह्यामुळे शाह झमान गडबडून गेला आणि त्याने परत जायची तयारी केली. पण मग लाहोरात कोणाला ठेवायचे? शाह झमानवर लाहोरातही शीख टोळ्यांचे हल्ले होतच होते. ह्यात १९ वर्षांचा रणजितसिंग अग्रेसर होता. शाह झमानने कसाबसा रणजितसिंगाबरोबर शांततेचा तह केला आणि तो झेलम ओलांडून जायला निघाला. त्यावेळी आलेल्या पावसाने त्याच्या तोफा तिथे चिखलात रुतून अडकल्या. ह्यावेळी रणजितसिंग आणि त्याचे ५००० घोडेस्वार मदतीला आले. त्याने त्यातल्या बऱ्याच तोफा वाचवून बाहेर काढून दिल्या. शाह झमान खूष झाला. ह्याबद्दल बक्षिस म्हणून शाह झमानने रणजितसिंगाला लाहोरचा कारभार पहायला सांगितला. ती तारीख होती ७ जुलै १७९९.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ७ जुलै इ.स.१९१०
इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे आणि खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...