श्री योग वशिष्ठ ग्रंथानुसार..
श्री योग वशिष्ठ ग्रंथानुसार.... मनुष्य जन्म कशासाठी..सतत ग्रंथ वाचन अध्यात्म श्रवण व देवाचे नाम,तसेच देवाचे कार्य करत राहिले तर मनात इतर विचार येणे हळूहळू कमी होते.पुढे संसारातील त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा येतो यालाच विरक्ती असे म्हणतात.मग मनुष्य चिंता,द्वेष इत्यादी गोष्टीपासून दूर जातो.तो जे घडेल ती ईश्र्वराची इच्छा समजून सहन करतो.तो दुःख आणि सुख समान मानतो व अतिशय प्रसन्न राहतो.ही स्थिती फार दुर्लभ आहे. लाखो लोकांमध्ये एखाद्याला ती प्राप्त होते.पण अभ्यासाने कधीतरी तरी प्राप्त होतेच होते.मग मनुष्याला विवेक प्राप्त होतो. हे सर्व अतिशय सहज प्राप्त होते फक्त प्रयत्न चालू ठेवणे महत्त्वाचे आहे.
श्री वशिष्ठ सांगतात की मनुष्य जन्म यासाठीच प्राप्त झालेला आहे नाहीतर भोग तर प्राण्यांना सुध्दा मिळतात.तेव्हा मनुष्य जन्माचे सार्थक करून देवाची प्राप्ती करून घ्यावी अन्यथा मनुष्य जन्म वाया गेला असे समजावे.
Comments
Post a Comment