भाऊराव साठे हे महाराष्ट्रातील एक समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते.त्याची आज जयंती त्या निमित्ताने विनम्र अभिवादन.

अण्णा भाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त  विनम्र अभिवादन.
अण्णा भाऊ साठे या नावाने प्रसिद्ध असलेले तुकाराम भाऊराव साठे हे महाराष्ट्रातील एक समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे हे अस्पृश्य समाजात जन्मलेले दलित होते आणि त्यांचे संगोपन आणि ओळख हे त्यांच्या लेखन आणि राजकीय कार्यात केंद्रस्थानी होते.
त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.

जन्म नाव
तुकाराम भाऊराव साठे
टोपणनाव
अण्णा भाऊ साठे

कार्यक्षेत्र
लेखक, साहित्यिक
साहित्य प्रकार
शाहिर, कथा, कादंबरीकार
चळवळ
संयुक्त महाराष्ट्र चळवळ

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. उपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतो. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागांतील हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. त्याच्यामुळे लोक प्रेरित झाले..


जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्न केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती - मधुकर, शांता आणि शकुंतला.

अण्णा भाऊंच्या गोष्टींत अथवा लिखाणात विनोद नसतो, असं नाही; पण त्यांचा प्रकृतीधर्म आहे गंभीर लेखकाचा. ज्यांन फार भोगलं आहे, सात पडद्यांतून नव्हे, तर समोरासमोर जीवनातल्या क्रूर सत्याचं ज्याला दर्शन घडलं आहे. अशा पोटतिडकीने लिहणाऱ्या साहित्यिकाचा आत्मा त्यांना लाभला आहे. म्हणून साहजिकच त्यांच्या गोष्टी मोठ्या वैशिट्यपूर्ण असतात. म्हणून तत्कालीन सर्व बड्या कथाकारांपेक्षा ते निराळे आहेत. या लेखकाला प्रतिभेचे देणं लाभलं आहे. जीवनात आग ओकणाऱ्या हरतर्हेच्या गोष्टींच्या अनुभव त्यांच्या गाठी आहे. त्यांच्या मनात एकप्रकारचा पीळ आहे. ते अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा पूजक आहे.”

वि.स. खांडेकर
साहित्यिक,


अकलेची गोष्ट (लोकनाट्य, १९४५)
अण्णा भाऊ साठे : प्रातिनिधिक कथा (संपादक - डाॅ. एस.एम. भोसले)
अमृत
आघात
आबी (कथासंग्रह)
आवडी (कादंबरी)
इनामदार (नाटक, १९५८)
कापऱ्या चोर (लोकनाट्य)
कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह)
खुळंवाडा (कथासंग्रह)
गजाआड (कथासंग्रह)
गुऱ्हाळ
गुलाम (कादंबरी)
चंदन (कादंबरी)
चिखलातील कमळ (कादंबरी)
चित्रा (कादंबरी, १९४५)
चिरानगरची भुतं (कथासंग्रह), १९७८)
नवती (कथासंग्रह)
निखारा (कथासंग्रह)
जिवंत काडतूस (कथासंग्रह)
तारा
देशभक्त घोटाळे (लोकनाट्य, १९४६)
पाझर (कादंबरी)
पिसाळलेला माणूस (कथासंग्रह)
पुढारी मिळाला (लोकनाट्य, १९५२)
पेंग्याचं लगीन (नाटक)
फकिरा (कादंबरी, १९५९)
फरारी (कथासंग्रह)
मथुरा (कादंबरी)
माकडीचा माळ (कादंबरी, १९६३)
रत्ना (कादंबरी)
रानगंगा (कादंबरी)
रूपा (कादंबरी)
बरबाद्या कंजारी (कथासंग्रह, १९६०)
बेकायदेशीर (लोकनाट्य, १९४७)
माझी मुंबई (लोकनाट्य)
मूक मिरवणूक(लोकनाट्य)
रानबोका
लोकमंत्र्यांचा दौरा (लोकनाट्य, १९५२)
वारणेचा वाघ (कादंबरी, १९६८)
वैजयंता (कादंबरी)
वैर (कादंबरी)
शेटजींचे इलेक्शन (लोकनाट्य, १९४६)
संघर्ष
सुगंधा
सुलतान (नाटक)
प्रवासवर्णन
कविता आणि माझा रशियाचा प्रवास
काव्ये
अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या



साठेंच्या लेखनावर आधारित चित्रपट
वैजयंता (१९६१, कादंबरी – वैजयंता)
टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी – आवडी)
डोंगरची मैना (१९६९, कादंबरी – माकडीचा माळ)
मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी – चिखलातील कमळ)
वारणेचा वाघ (१९७०, कादंबरी – वारणेचा वाघ)
अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी – अलगूज)
फकिरा (कादंबरी – फकिरा)


संदर्भ व टीप
 साठेंचे नाव "तुकाराम" उर्फ "अण्णा" होते; तर त्यांच्या वडीलांचे नाव "भाऊ" होते. "अण्णा" व "भाऊ" या दोन नावांना एकत्रित "अण्णाभाऊ" असे लिहिणे चूकीचे आहे.
 Jamdhade, Dipak Shivaji (June 2014). "The Subaltern Writings in India: An Overview of Dalit Literature" (PDF). The Criterion. 5 (3). 2015-04-05 रोजी पाहिले.
 Paul, S. K. (2007). "Dalitism: Its Growth and Evaluation". In Prasad, Amar Nath; Gaijan, M. B. (eds.). Dalit Literature: A Critical Exploration. Sarup & Sons. p. 36. ISBN 978-81-7625-817-3.
 पवार, जे वी (13 April 2019). "The history of Marathi Ambedkarite Literature". Forward Press.
 Awad, Milind (1 August 2010). "The Life and Work of Annabhau Sathe: A Marxist-Ambedkarite Mosaic". Gaur Publishers & Distributors – Google Books द्वारे.
 Sahni, Bhisham (10 November 2015). "Today's Pasts: A Memoir". Penguin UK – Google Books द्वारे.
 "आजही अण्णा भाऊ." 1 August 2013.
 Gaikwad, B. N. (February 2013). "Manifestation of Caste and Class in Anna Bhau Sathe's Fakira and Baburao Bagul's Jenvha Mi Jaat Chorli Hoti" (PDF). The Criterion. 4 (1). 2015-04-05 रोजी पाहिले.
 Abrams, Tevia (1993). "Tamasha". In Richmond, Farley P.; Swann, Darius L.; Zarrilli, Phillip B. (eds.). Indian Theatre: Traditions of Performance. Motilal Banarsidass. pp. 282, 288. ISBN 978-8-12080-981-9.
 Bhattacharya, Binayak (2016). "The Left Encounter: Progressive Voices of Nationalism and Indian Cinema to the 1950s". In Kishore, Vikrant; Sarwal, Amit; Patra, Parichay (eds.). Salaam Bollywood: Representations and Interpretations. Routledge. pp. 26, 38. ISBN 978-1-31723-286-5.
 Wani, Aarti (2016). Fantasy of Modernity. Cambridge University Press. pp. 27–28. ISBN 978-1-10711-721-1.
 Zelliot, Eleanor (1978). "Dalit: New Cultural Context for an Old Marathi Word". In Maloney, Clarence (ed.). Language and Civilization Change in South Asia. BRILL. pp. 78, 82. ISBN 978-9-00405-741-8.
 Krushirang, Team. "लोकशाहीर अण्णाभाऊ म्हणजे अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे अनुभवसिद्ध लेखक..!".
 Waghmore, Suryakant (2016). "Challenging Normalised Exclusion: Humour and Hopeful Rationality in Dalit Politics". In Gorringe, Hugo; Jeffery, Roger; Waghmore, Suryakant (eds.). From the Margins to the Mainstream: Institutionalising Minorities in South Asia. SAGE Publications. p. 151. ISBN 978-9-35150-622-5.
 "अण्णाभाऊ खऱ्या अर्थाने वंचितांचा आवाज होते: मुख्यमंत्री | eSakal". www.esakal.com.
 "Lokshahir Annabhay Sathe Smarak". Pune Metropolitan Corporation. 2017-07-31 रोजी पाहिले.
 Devnath, Shiva (25 May 2016). "Mumbai: 24-year-old woman stabbed to death in broad daylight". Mid-day. 2017-07-31 रोजी पाहिले.
 "सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - महामंडळे". sjsa.maharashtra.gov.in. १ ऑगस्ट २०१९ रोजी पाहिले.
 "साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती". 1 August 2016.
 ओव्हाळ, प्रभाकर. "अण्णा भाऊ साठे (Annabhau Sathe)". marathivishwakosh.org. १ ऑगस्ट २०१९ रोजी पाहिले.
 "अण्णा भाऊ साठे चरित्र आणि कार्य-Anna Bhau Sathe Charitra Ani Karya by Vijaykumar Jokhe - Nag - Nalanda Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com.



Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४