राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच. त्यांना अगदी लहान वयातच वडिलकीची शिकवण झाली होती. आपल्या तीन बहिणींच्या पाठीवर आपला भाऊराया जन्माला आलाय हा त्यांच्यासाठी मोठा आनंद होता

राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच. त्यांना अगदी लहान वयातच वडिलकीची शिकवण झाली होती. आपल्या तीन बहिणींच्या पाठीवर आपला भाऊराया जन्माला आलाय हा त्यांच्यासाठी मोठा आनंद होता.

शंभूराजे लहान असताना प्रत्येकवेळी राणूबाई शंभूराजांना त्यांच्या मांडिवर घेऊन झोपवत असे. त्या शंभू बाळासाठी स्वतः अंगाई गायच्या. राणूबाई दिसल्या नाहीत तर शंभूबाळ खुप कासावीस होत.


जन्मदाती आपल्याला सोडुन गेली आहे, आपला भाऊ खुप लहान आहे, त्याला आईची आठवण येऊ नये म्हणून राणूबाई शंभूबाळाला स्वतःच्या मांडीवर खेळवत असे.

महाराज मोहिम करून जेव्हा गडावर परतायचे आणि आल्यावर महाराज आऊसाहेबांच दर्शन घ्यायचे.. त्यानंतर मात्र महाराजांची नजर शंभू बाळाला शोधायची.आणि शंभूबाळाला शोधत असताना जेव्हा महाराज शंभूबाळाला राणुबाईंच्या मांडिवर निवांत झोपलेले पहायचे तेव्हा महाराजांच्या चेहऱ्यावर मोठ समाधान यायच.

रितीरिवाजानुसार राणूबाईचे लग्न सिंदखेडराजा चे कृष्णाजी जाधवराव यांच्याशी झाला. त्या सासरी गेल्या असल्या तरी त्यांच लक्ष कायम शंभूराजांवर राहिले शेवटपर्यंत त्या शंभूराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४