क्रांतिकारक नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित लेख. पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏



रामचंद्र गणपती नायकवडी व लक्ष्मीबाई याच्या पोटी नागनाथ नायकवाडी याचा वाळव्यातल्या एका शेतकरी कुटुंबात जुलै १५ इ.स. १९२२ साली त्यांचा जन्म झाला.
 पुढे शिक्षण, पहिली ते सहावीपर्यंत वाळवा, सातवी आष्टा येथे आणि आठवी ते मॅट्रिक राजाराम हायस्कूल, कोल्हापूर येथे शिकले. आणि त्यानी.
मॅट्रिकचे शिक्षण अर्ध्यात सोडून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. स्वातंत्र्यानंतर १९४७-४८ला ते मॅट्रिक झाले.

1942 च्या स्वातंत्र्यपूर्व काळात अगदी बालवयातच आपल्या कोवळ्या मुठीत क्रांतीचा अंगार आणि धगधगता निखारा घेऊन ते घरात पुन्हा पाऊल न ठेवण्याची शपथ घेऊन घराबाहेर पडले.


सन १९३० - क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याशी विद्यार्थी दशेत ओळख झाली. आणि त्याच्याशी जोडले.

सन १९३९ - कर्मवीर भाऊराव पाटील यांची भेट. सेवादलात सक्रीय सहभाग घेतला. पुढे सन१९४० - कामेरी जि. सांगली येथे पहिली विद्यार्थी परिषद घेतली.

८ ऑगस्ट १९४२ - कॉंग्रेसच्या करेंगे या मरेंगे चळवळीत सहभाग.



देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचीही परवा न करता क्रांतीकार्य करणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागनाथअण्णा नायकवडी यांचे आज मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. भारत सरकारतर्फे त्यांना 'पद्मभूषण' सन्मानाने गौरविण्यात आले होते.
 

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचीही परवा न करता क्रांतीकार्य करणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागनाथअण्णा नायकवडी यांचे आज मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. भारत सरकारतर्फे त्यांना 'पद्मभूषण' सन्मानाने गौरविण्यात आले होते.
स्वातंत्र्यपूर्व लढयात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गरीब शेतकरी, कष्टकरी, श्रमजिवी, दुष्काळग्रस्त, धरणग्रस्त, बहुजन समाज यांच्या हितासाठी ज्यांनी आजवरचे आपले सारे आयुष्य वेचले त्या वाळव्याच्या क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांना गेल्याच वर्षी केंद्र शासनाने

नागनाथ आण्णांचा जन्म १५ जुलै १९२२ रोजी झाला. स्वातंत्र्य लढयात त्यांच्या माता-पित्यांचेही मोठे योगदान होते. त्यामुळेच त्यांची आई लक्षीबाई यांना क्रांतिवीरांगणा म्म्हणून ओळखले जात होते. त्याचा वारसा लाभलेल्या क्रांतिवीर नागनाथ आण्णांचे प्राथमिक शिक्षण वाळवा व आष्टा येथे, तर माध्यमिक शिक्षण कोल्हापूरला राजाराम हायस्कूलमध्ये झाले. पण १९४२ च्या स्वातंत्र्य लढयात त्यांनी मॅट्रिकचे शिक्षण अर्धवट सोडून स्वातंत्र्य लढयात स्वत:ला झोकून दिले. भूमीगत चळवळीत ते कार्यरत झाले. नंतर १९४८ मध्ये ते मॅट्रिक होऊन त्यांनी राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.
१९३० मध्ये वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या वाळवा गावात होणारया देशभक्तीपर, आवेशपूर्ण भाषणांमुळे ते चांगलेच भारावून गेले. मग त्यांनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन प्रभात फेरयांतूनही भाग घ्यायला सुरूवात केली. पुढे ऑगस्ट १९४२ साली मुंबईत भरलेल्या अ.भा.काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनास ते उपस्थित राहिले. त्यानंतर हत्यारे पैदा करण्यासाठी गोव्याची यशस्वी मोहीम केली. शेणोली येथे पे-ट्रेन लुटली. धुळे खजिना लुटला.

 १९४४ मध्ये फितुरीमुळे त्यांना वाळवा येथे अटक झाली. पण सातारा जेलच्या अभेद्य भिंतीवरून उडी घेऊन ते पुन्हा भूमिगत आंदोलनात सामील झाले. या परिसरातील
७ जून १९४३ - शेणोली स्टेशन येथे पे स्पेशल ट्रेन लुटीत सहभाग.

३ ऑगस्ट १९४३ - नाना पाटील नेतृत्वाखाली प्रतिसरकार स्थापन, पणुंब्रे येथे.

१४ एप्रिल १९४४ - धुळे खजिना लुटीत चित्तथरारक सहभाग.

२५ फेब्रुवारीला हुतात्मा किसन अहीर व नानकसिंग सहकारी शहीद. जीवलग दोस्त गेल्याचे दुःख.

सन १९४८ ते १९५७ - सामाजिक-राजकीय चळवळीत सक्रिय.

१३ फेब्रुवारी १९५० - बुंगवाडी येथील यशवंत गोविंद कदम (ता. तासगाव) यांच्या कन्येशी कोल्हापुरात सत्यशोधक पद्धतीने लग्न.

सन १९५७ - आमदार म्हणून लोकांनी निवडून दिले.

सन १९४९ - वाळव्यात हुतात्म्यांची स्मारके म्हणून किसान शिक्षण संस्थेची स्थापना. गरीब मुलांसाठी वसतीगृहाची स्थापना.

सन १९६३ - मुलींनी शिकावे म्हणून जिजामाता विद्यालयाची स्थापना केली.

सन १९६५ - मुलींसाठी सावित्रीबाई फुले वसतीगृहाची स्थापना.

सन १९७२ - शेतीला पाणी मिळावे म्हणून किसना नं. १ पाणी संस्था स्थापना.

सन १९७४ - नागठाणे बंधारा (ता. पलूस) बांधला. परिसर सुजलाम् सुफलाम् झाला.

सन १९७५ - फासेपारध्यांना शिक्षण व पुनर्वसनासाठी खास प्रयत्न.

सन १९८१ - हुतात्मा कारख़ान्याची स्थापना. मंजुरी (दिल्लीत ११ महिने ठिय्या).

सन १९८३-८४ - हुतात्मा कारखान्याचा गळीत हंगाम सुरू.

२६ मे ८५ - ऐतवडे बुद्रुक येथे ५० हजार लोकांची शेतकरी परिषद यशस्वी.

सन १९८५ - दुसऱ्यांदा अपक्ष आमदार म्हणून विधानसभेवर निवड.

सन १९८५ - सोनवडे (शिराळा) दुर्गम भागातील मुलांसाठी शाळा वसतीगृह सुरू.

सन १९८६ - तिसरे अखिल भारतीय दलित आदिवासी संमेलन वाळव्यात घेतले.

सन १९८८ - रशिया दौऱ्यासाठी पत्नी सौ. कुसुमताईंसमवेत रवाना.

सन १९८९ ते ९३ - दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू केल्या.

सन १९८९ - कराड लोकसभेसाठी उमेदवारी.

सन १९९० - साखर कारखाना झोन दुरूस्ती चळवळ, सरकारला हादरा.

२५ फेब्रुवारी १९९३ - वाळवा ते सोनवडे बाबरी मशिद पाडलेबद्दल मानवी साखळी (८० कि. मी.)

२६ मे १९९३ - किणी येथे ८० हजार लोकांची शेतकरी परिषद.

११ जुलै १९९३ - पासून आटपाडीत पाणी संघर्ष चळवळीला प्रारंभ.

ऑक्टोबर १९९३ - १०८ लातूर भूकंपग्रस्त मुले दत्तक घेतली.

सन १९९६ - कराड लोकसभा निवडणूक लढवली.

सन १९९८ - भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या ४ खासदारांचा सत्कार, प्रत्येकाला टाटा सुमो मोटागाड्या भेट दिल्या.

२७ मे ९९ - मुलींसाठी अद्ययावत वसतिगृह उद्घाटन (वाळवा).

४ डिसेंबर २००० - वडाप बेरोजगारांचा कोल्हापुरात भव्य मोर्चा.

सन २००१ - हुतात्मा दैनिक सुरू करण्याची घोषणा.

सन २००७ - शिवाजी विद्यापीठाकडून डी.लिट. पदवी प्राप्त.

सन २००९ - भारत सरकारचा पद्मभूषण सन्मान.

अण्णांचा बहुमान
१९९३ - नेमगोंडादादा पाटील जनसेवा पुरस्कार

१९९८ - डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील समाजसेवा पुरस्कार

१९९८ - राजर्षी शाहू महाराज पुरस्कार व मानपत्र

१९९९ - फुले-आंबेडकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार

१९९९ - कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार

२००० - नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार

२००० - अरिहंत पुरस्कार

२००१ - प्रतिशाहू पुरस्कार

२००१ - क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार

२००२ - हरिश्‍चंद्र तारामती गौरव पुरस्कार

२००२ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर रत्न पुरस्कार

२००२ - भाई माधवरावजी बागल पुरस्कार

२००२ - जीवन गौरव पुरस्कार कॉ. व्ही.एन. पाटील स्मृति गौरव पुरस्कार

२००२ - रिपब्लिकन मित्र पुरस्कार व मानचिन्ह

२००२ - शाहीर फरांदे पुरस्कार

२००२ - लक्ष्मीबाई मगर भूमिपुत्र पुरस्कार

२००३ - भगवान नेमिनाथ पुरस्कार

२००३ -दक्षिण भारत जैनसभेचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार

२००३ - समाज भूषण पुरस्कार

२००४ - चिकोत्रा भूषण पुरस्कार

२००५ - फुले, शाहू, आंबेडकर लोकमान्य पुरस्कार

२००६ - आद्य क्रांतिवीर उमाजीराव नाईक पुरस्कार

२००६ - मणिभाई देसाई पुरस्कार

२००६ - लोकनेते पुरस्कार

२००६ - शाहू महाराज पुरस्कार

२००६ - लोकनेते पुरस्कार

२००७ - हुतात्मा गौरव पुरस्कार

२००७ - सामाजिक कृतज्ञता पुरस्कार

२००७ - आर्य भूषण पुरस्कार

२००७ - राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार

२००७ - किसन वीर सामाजिक पुरस्कार

२००७ - डी. लिट्. बहुमान

२००९ -भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार

२०११ - महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे समाजजीवन गौरव

२०१२ - रयत माऊली पुरस्कार
सदर्भ 
[ दै.लोकमत मधील बातमीचा सदर्भ ]

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४