छत्री (स्मारक) शुजालपूरची.एक प्रेरणा स्थळ
छत्री (स्मारक) शुजालपूरची.
एक प्रेरणा स्थळ ..
शिंदेशाही चे संस्थापक श्रीमंत राणोजी शिंदे यांचा 1699 ते 1745 असा केवळ 46 वर्षांचा कालखंड. या अल्पकाळात त्यानी स्वराज्य विस्ताराचे फार मोठे कार्य केले. मुतालकीचे अधिकार व शिक्का त्यांना कर्तबगारीतून मिळाला. तो शिंदे घराण्यानी पराक्रमाने कायम ठेवला.
राणोजीनी अनेक मोहिमा जिंकल्या. लाखो रू. उत्पन्नाचा प्रदेश मिळविला. उज्जैन म्हणजेच अवंतिका ही शिंद्यांची राजधानी थाटली. पुढे दौलतराव शिंदे यांच्या काळात ग्वाल्हेर राजधानी झाली.
राणोजी यांचे 1745 साली शुजालपूर येथे ऐन तारूंण्यात निधन झाले. जेथे त्यांचे अंत्यसंस्कार झाले त्या नेवाज नदी काठी त्यांची छत्री म्हणजे स्मारक त्यांचे पुत्र श्रीमंत जयाजी शिंदे यांनी उभारली. छत्रीचे, बांधकाम, कलाकूसर, घुमट अत्यंत सुंदर आहे. भोवताली प्रशस्त बागबगीचा आहे. छत्री पर्यंत जाणारे रस्ते पक्के व छान आहेत.
मा. आयुक्त पुरातत्व आणि संग्रहालय विभाग, मध्य प्रदेश सरकार यांच्या आदेशानुसार त्या छत्रीबद्दलची माहिती हिंदी व इंग्रजी भाषेत छत्रीच्या चबूतर्यावर लिहीली आहे.
राणोजींचे हे तर ऐतिहासिक स्मारक आहेच शिवाय त्यांच्या स्मरणार्थ शुजालपूरला राणोगंज असे नाव देण्यात आले.
पोस्ट रणवीर शिंदे
Comments
Post a Comment