आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*९ जुलै १५८३*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ जुलै १५८३*
पोर्तुगीज सैन्य कुकल्ली गावच्या हद्दीत शिरले. १५८२ कॅप्टन फिगेरे दों हा पोर्तुगीज आधिकारी तहाचा प्रस्ताव घेऊन कुकल्लीकरांकडे आला. ते एकून ५ जण होते आणि निःशस्त्र होते. कॅप्टन फिगेरेदला मोडकीतोडकी कोकणी भाषा अवगत होती. आपल्या लाघवी बोलण्याने कुकल्लीकर हिंदू पुढाऱ्यांची मने काबीज करण्यात तो यशस्वी झाला. ठरलेल्या दिवशी कुकल्लीकर हिंदुंचे १६ पुढारी पोर्तुगिजांशी सलोख्याच्या पुढील वाटाघाटी असोळण्याच्या कोटांत करण्याचे ठरवून, मात्र पोर्तुगिजांनी विश्वासघाताने या सर्वांना हालहाल करून ठार मारले. त्यातील कानू नाईक या पुढाऱ्याच्या अंगात विरश्री संचारून त्याने तटावर चढून साळ नदीत उडी टाकून अदृश्य झाला. काळू नायकाने असोळणेच्या कोटात घडलेला प्रसंग आपल्या भाऊबंधूंना विदीत केला. पाद्री यांची तुकडी आणि पोर्तुगीज सैन्य कुकल्ली गावच्या हद्दीत शिरले. त्यांनी "भिवसा" येथील शंभु महादेव मंदिर आणि "असणी कट्टा" येथील श्रीरामाच्या देवळा समोरील तलाव भ्रष्ट केले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*९ जुलै १६५५*
छत्रपती शिवरायांनी पुरंदर किल्ल्याची जबाबदारी 
सरसेनापती नेताजी पालकर यांना सोपवली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ जुलै १६७७*
विजापुरचा सुरमा म्हणून अब्दुल्लखानाची ओळख होती. हा किल्ले वेलोरचा किल्लेदार. राजांनी हा किल्ला घेण्यासाठी जोराची तयारी केली होती. पुढे मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला. अब्दुल्लाखान किल्ला शर्थीने लढवत होता. तेव्हा किल्ल्यावर तोफांचा मारा करण्यासाठी महाराजांनी नजीकच्या २ टेकड्यांवर २ किल्ले बांधले, त्यांची नावे साजरा आणि गोजरा. तोफांचा मारा सुरु झाला. वेल्लोरचा किल्ला रेंगळणार असे दिसताच राजांनी नरहरी रुद्र या सरदारास २ हजार स्वार आणि ५ हजार पायदळ देऊन वेढ्याजवल ठेवले. त्यातच, शेरखान मराठ्यांवर चालून आला, त्याला अडवायला राजे स्वतः गेले. खानाला पळता भुई थोडी झाली. पुढे त्याचा पाठलाग ही केला. शेरखान राजांना शरण आला. त्याची वेल्लोर, टेजपठण, व भवनगिरीपठण ही ठाणी मराठयांनी ९ जुलै १६७७ ला ताब्यात घेतली. सहीसलामत सोडण्याबदल्यात शेरखानने राजांशी तह केला, तहानुसार खानाने राजांना त्याचा सर्व मुलुख आणि २० हजार होन रोख दिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ जुलै १६९२*
मिरज प्रांतातील मराठा सुभेदार खंडोबा येदेव (यादव) यास  ९ जुलै १६९२ रामचंद्र पंत आमत्याने संताजी घोरपडे यांच्या सरदेशमुखी संबंधीत पत्र पाठवलेले. संभाजी माहाराजांच्य नंतर संकट कालात संताजी घोरपडे यांनी स्वराज्याचे रक्षन करुन औरंगजेबास दहशत कशी लावली याचे वर्णन पंताने केले आहे.
 राजश्री खंडोबा येदव यादव देशाधिकारी व देशलेखक वर्तमान व भावी पास माहाल मिरज प्रांत गोसावी. अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य सेवक रामचंद्र निळकंठ आमत्या नमस्कार सु ।। सुलास तीनसेन आलफ राजश्री संताजी बिन म्हाळोजी घोरपडे सेनापती लष्कर यांसी राजश्री छत्रपती स्वामी कर्नाटकात जाते समई ईकडे गनिमाची धामधूम बहुत होऊन कुल  दूर्गे हस्तगत केली होती राज्यामध्ये काही अर्थ उरला नव्हता कुल मराठे यांही ईमानास खाता करुन गनिमाकडे गेले याही राजश्रीच्या पायासी बहूतच एकनिष्ठ धरुन ईमानास खाता करुन गनिमाकडे गेले याही राजश्रीच्या पायासी बहुतच एकनिष्ठ धरुन ईमानास न खाता करता जमाव करुन सेख निजाम व सर्जाखान व रणमस्तानखान व जानसारखान येस उमदे वजीर बुडविले. जागा जागा गनिमास कोटगा घालुन नेस्तनाबुद केला आणि देश सोडविला राज्य रक्षणतेच्या प्रसंगास असाधरन श्रम केले औरंगजेबास दहशत लाविली. पुढे कितेक स्वमी कार्याचे ठायी हिमंत धरिताती. या करिता यावरी संतोशी होउन मामले मिरज कार्यात सत्ताविस येथील देशमुख होते नेस्तनाबुद झाले त्यांचे वंशी कोनी ना त्याचें मुतालिक होते तेबळाउन देशमुखी वतन खात होते तेहडी बुध्दी धरून गनिमास मिलोन फिसात केली एकनिष्ठ धरुन ईकडे भेटले नाहीत म्हणून त्यांची देशमुखी दुर करून मशार जिल्हेस राजारामला देशमुखी आपले मजकुराचे आवलाद व अफलादपुत्रपौत्र दिल्हि असे तरी मामले मजकुराची देशमुखी यांचे दुमला करणे    जानिजे. निदेश समक्ष.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ जुलै १६९७*
संताजी घोरपडे व धनाजी जाधव  यांच्यात वाद होण्यास जरी औरंगजेब कारण नसता तरी त्याचा खून मात्र बादशहाच्याच कारवाईने घडून आला, हे खालील पत्रावरून सिद्ध होते. हे पत्र औरंग्याचा सरदार लुत्फुल्लाखान याने संताजी घोरपडेंच्या मृत्यूनंतर लगेच ता. ९ जुलै १६९७ रोजी नागोजीस लिहिले. “तुम्ही निश्चयें करून आमचे दौलतीचा आश्रय करून हुजूर येऊन रुजू जाहला व दुस्मानासही दूर केला. संताजीचा पळावयाचा रस्ता तुम्ही बंद केला. त्यास पळून जाऊ दिले नाही. येणेकरून तुम्ही सरकारची नोकरी एक निष्ठेने बहुत चांगली बजावली. तुमची विनंती मान्य झाली आहे. तुमचे अपराध क्षमा होऊन पातशहाची मेहरबानी व इनायत होऊन येईल.” १६९० मध्ये नागोजी माने औरंगजेबास सोडून स्वराज्यात आला परंतु त्याचे चित्त इकडे स्थिर झाले नाही. संताजी घोरपडे पळू लागल्यावर नागोजी लुत्फुल्लाखानाला भेटला आणि त्याच्यामार्फत पुन्हा
औरंगजेबाची कृपा संपादण्याकरिता त्याने संताजी घोरपडेंचे शीर कापून ते औरंगजेबाला नजर केले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*९ जुलै १७८२*
“पाटील बावांचा आणि पातशहाचा घरोबा व नजफखान वजिरी करीत होते तेही भाऊपणादाखलच होते. याजकरिता मिर्झ शफी, नजफखानाचे भाचे यांचे मानस असे आहे की, ज्याप्रमाणे पहिलेपासून दक्षिणी सरदार यांचा घरोबा आहे त्याप्रमाणे पुढे चालावे आणि पातशाही वजिरी आपले नांवे करून द्यावी. याप्रमाणे पाटीलबावा आणि मिह शफी यांचा पत्रव्यवहार चालला होता. शेवटी दोघांच्या भेटी होण्याचा निश्चय होऊन चंबळ नदीपार अटेरसमीप दिनांक ९ जुलै १७८२ रोजी पाटीलबावा आणि मिर्झा शफी यांची भेट झाली. दोघांचा पगडीबंद भाऊपणा झाला. ही गोष्ट महमदबेग हमदानीस आवडली नाही. अशा प्रकारे कारभाऱ्यात दुफळी माजली. तेव्हा सन १७८३ च्या उन्हाळ्यात बादशहाने हिंगणे वकिलास ग्वाल्हेरास शिंद्यांकडे पाठविले. हिंगणे यांनी स्वतः सर्व परिस्थिती पाटील बावास समजावून सांगितली आणि दिल्लीच्या कारभाराची सर्व सूत्रे विलंब न लाविता लवकरात लवकर आपले हाती घेण्यास मन वळविले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...