प्राचीन घाटगे उर्फ घाडगे घराणे
घाटगे घराणे
महाराष्ट्रातील सूर्यवंशी क्षत्रिय घराणे. यांचा मूळ पुरुष "'कामराज घाटगे "हा होय . ब्राह्मणी बादशाह हसनगंगू याच्या दरबारात वयाच्या १६ वर्षी प्रवेश मिळवून त्याच्या पराक्रमाने चकित होऊन बादशाहने ३०० स्वरांची मनसबदारी दिली व हांगणनाक पोळ या मातब्बर सरदाराच्या कन्येबरोबर तिचा विवाह करून दिला .
कामराज घाटगे यास मलवडी व ललगुन या दोन महालांची देशगती होती . या देशागतीवर नारायण हरी कुलकर्णी यास वतनाची व्यवस्था ठेवण्यास सांगून ते बेदरचे बादशाही मनस्सबी करू लागले.
रामेश्वर भटजी म्हणून कामराज घाटगे चा एक पुरोहित होता तो नेहमी कामराजांचे चिंतन करून त्याच्या बरोबर सदैव असे यांनीच काम्राजाचा प्रतिपाळ करून त्यांना नावारूपास आणले .
रामेश्वर भटजी गंध अक्षदांच्या योगाने व चंबूतील तीर्थ सिंचनाने काम्राजाची सर्व संकटे दूर करीत असे
त्यामुळे कामराजाने गंधाक्षदांचे निशाण व चंबूचा शिक्का करून दिला ह्यावरून महापुरुषांचे वरप्रदान घेण्याची चाल हिन्दू क्षत्रियांमध्ये पूर्वीपासून आहे असे दिसून येते
. कामराज अनेक पराक्रम करून १४३९ मध्ये मरण पावला . महाराष्ट्रामध्ये दुर्गादेवीचा दुष्काळ पडला १३९६ मध्ये त्यावेळेस वतनदार व रयत वाट फुटेल तिकडे निघून गेले
उपमन्यु , भारद्वाज भालजन, कौशिक, भृगु ह्या गोत्रांचे लोक दक्षिणेत विद्यानगरकडे गेले . दुष्काळ संपल्यापान्तर १४२९मध्ये बंडखोर लोकांचे पारिपत्य करण्यासाठी मलिक उल तिजार खटाव प्रांतात आला .
खटाव येथे भूपतराव बेरड व भडवली कसबे मलवडी महिपतराव बेरड यांनी यांनी तेथे कोट करून सैन्य जमवले
कामराज घाडगे याने काहीसैन्य पाठवून पुंडावा शांत केला . त्यांनी सैन्य बरोबर त्यांचा पुरोहित दादाजी नरसिंह याना पाठवले होते . दादाजीने रयतेची घडी बसवण्याचे उत्तम काम केले .
त्यांनी एका पंढरीच्या चार पांढऱ्या करून गावाची नावे ठेवली लोकांना सवलती दिल्या पहिल्या वर्षी जमिनीचा महसूल वसूल ना घेता पुढे दर बिघ्यास एक तोबराभर धान्य घेण्याचा ठराव केला.
." दादो नरसीही तोब्रो " म्हणून या वसुलीचे नाव आजतागायत प्रसिद्ध आहे . ह्यावरून मुसलमानी अमदानीत दुष्काळ संपल्यानंतर किती कमी शेतसारा घेत असत हे लक्षात घेण्यासारखे आहे
. कामराजास परसनाक ,लोहनक,मायनाक ,जैतपालनाक बगडनाक ,लोकनक असे पुत्र होते , घाटगे म्हणून जेव्हडे म्हणून काही आहेत तेव्हडे ह्या सहा पुरुषांचे वंशज आहेत
कामराज्याच्या मागे परसनाक व जैतपाळनाक ह्यांनी कसबे मलवडी व लालगून वगैरे ठिकाणची देशगत केली .परसनाक व जैतपाळनाक याचा वंश खटाव ,मलवडी ,बुध या भागात होता असे दिसते .
बगडनाकाचा वंश डिकसळ येथे गेला असे दिसते लोकनाकाचा वंश कागल येथे गेला असे दिसते .
लोकनाकाचा वंश पुढे उत्कष होऊन प्रसिद्धीस पावला असे दिसते . लोकनाकाचा पुत्र कडतोजी होता . त्याचा पुत्र चायजी व त्याचा पुत्र बाळोजी होता .
हे पराक्रमी निपजल्याने त्यांना बाजी हा 'किताब मिळाला . बालोजीस वांगणोजी निंबाळकराने आपली कन्या जानाई हि दिली होती
. बाळोजी विजापूरच्या दरबारात गेला तेथील उमरावांना त्याचे वर्चस्व सहन ना झाल्याने याकूद सर्जा ह्याने एक मेजवानीमध्ये त्यास ठार मारले. बाळाजीस कोरपाळजी ,बाबाजी ,ह्यलोजी लखोजी कह्याजी (कुड्तोजी )राहुजी,मिटोजी , असे ७ पुत्र होते .
ह्यांच्या वतनाची गावे मलवडी महालात ६० व लाल्गुन महालांत २ मिळून एकंदरीत ८२ होती त्यांची वाटणी वांगणोजी निंबाळकर यांनी वाटणी करून दिली .
५ वडिलपणाच्या शिक्क्यासाठी राखून प्रत्येक मुलास ११ प्रमाणे गाव दिले . हि वाटणी १५६६ मध्ये झाली .
बाबाजी व मिटोजी हे हे विजापूरच्या दरबारात योग्यतेस चढले . मराठी शिलेदारास वजिराची वस्त्रे प्राप्त झाली त्यात त्यात अंबाजी पदाजी घाटगे ,साबाजी घाटगे ,छमवा घोरपडे , कान्होजी चव्हाण बाबाजी झुंजारराव घाटगे ,हे होते.
ह्या मराठयानी दौलताबादेवर हल्ला करून मलिकंबरने एका वेळी विजापूरच्या सैन्यावर छापा घालून रणदुल्लाखान, खैरतखान ,याकूबखान ,सुज्यातखान ,रहमतखान तागोजी पांढरे पदाजी खाटे असे नामांकित वजीर पकडून बेड्या घालूनठेवले होते त्यांना सोडून आणले .
हि घटना १७२६ पूर्वी मलिक अंबर मरणेपूर्वी घडली असावी असे वाटते. निजामशाहीमध्ये जाधव व भोसले उदय पावले व अदिलशाहीमध्ये घाटगे व घोरपडे हे ह्याच वेळी नावलौकिकास चढले
माणदेशीची देशमुखी व हे झुंजारराव पद बाबाजी घाटगे ह्यास मिळाले बाबाजीने झुंज करून विजापूर दरबारी वाहव्वा मिळवली म्हणून बादशहाने संतुष्ट होऊन" झुंजारराव "हा 'किताब दिला.
बाबाजी घाटगे हे परशुरामभट ह्यांच्या सांगण्यावरून विजापूर दरबारी दाखल झाले . दरबारात त्यास ७ लक्ष होनांची दौलत प्राप्त झाली . बाबाजी घाटगे १६४१ मध्ये मृत्यू पावले .
त्यांना दवजी व राजाजी राजे असे दोन पुत्र होते . यापैकी दवजीस शहाजी राज्यांनी आपली मुलगी दिली होती . दवजी आपल्या वडिलांची दौलत व कारभार बघू लागले .
दवजींच्या पश्च्यात त्यांचे बंधू राजाजी पुन्हा विजापूरच्या बादशहास भेटले व पुन्हा झुंजारराव हा 'किताब व बापाची जहागिरी परत मिळवली . राजाजी राजे घाटगे यांच्या कारकिर्दीत शिवाजीराजे अवतीर्ण झाले .
परंतु राजाजी राजे स्वराज्यात बिलकुल सामील झाले नाहीत . अफूजलखानाच्या वधानंतर विजापूरच्या सैन्याची जी लढाई झाली त्या लढाईत खानाच्या बाजूने लढण्यासाठी स्वतःच्या जामतेनिशी राजाजी झुंजारराव घाटगे व शिवाजीचे भाऊबंद मंबाजी भोसले व त्यांचे भाचे नरसोजी खंडागळे हे हजर होते .
ह्या सर्वांचा पराभव करून त्यांचे हत्ती घोडे शिवाजी महाराजांनी पाडाव केले व सर्वाना कैद करून वाईस नेले तेथे काही दिवस ठेवून त्यांना सोडून दिले .
१६८० पर्यंत घाटगे शिवाजी महाराजांचा पाठलाग करीत होते पुढे त्यांचा १६८२ मध्ये अंत झाला राज्यजी ह्यास ६ पुत्र होते . त्यापैकी पदाजी राजे दौलतीचे अधिकारी झाले
. शिवाजींच्या पश्चात विजापूरकरांकडून निघून औरंगजेबास येऊन मिळाले . परशराम भट ह्यांनी त्यांचे मन वळवून यांजकडे मोगलांचा पक्ष सोडविला व स्वतः चंदीस जाऊन राजाराम महाराजांना मदत करून पदाजी घाटगे ह्यांची कन्या अंबिकाबाई राजारामचा पुत्र शिवाजी ह्यास करून घेण्याचे वचन घेतले
. हे लग्न पुढे राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराराणी यांच्या कारकिर्दीत रांगणा येथे झाले .
पदाजी राजे महाराष्ट्र धर्म व महाराष्ट्र राज्य यांचा अभिमान बाळगून राजारामाच्या पक्षास मिळाले . म्हणून राजारामाने पदाजीस डिकसळ व कसबे बोथे हि दोन गावे इनाम दिली
. शंकराजी बीन मकाजी घाटगे हा भाऊबंद राजारामाच्या चंदी येथे फार उपयोगी पडले असे दिसते आहे
. पदाजीस नागोजी म्हणून पुत्र होता . तो पुढे शाहू महाराजांना मिळाला . हे प्रसिद्ध घराणे नंतर छत्रपतींच्या राजछत्राखाली आले असे दिसून येते .
Comments
Post a Comment