निकम ही मराठा कुळी निकुंभ राजवंशाची शाखा आहे.
👉निकम ही मराठा कुळी निकुंभ राजवंशाची शाखा आहे. त्यांचे मूळ जयपुर परिसर राजस्थान येथील आहे.
👉निकुंभ कुळाची उत्पत्ती वं वंशावळ:-
सुर्यवंशी मराठा क्षत्रियांचा वंशव्रुक्ष !! वंशावळी व शाण्णव कुळी या बाळाजी नथुजी गावंड यांच्या पुस्तकात दिलेला वंशव्रुक्ष : श्रीविष्णु> विरंची> मरीची> कश्यप> सुर्य> वैवस्वत मनु > ईक्ष्वाकु{याच वंशात पुढे भोसले घराणे निर्माण झाले } > विकुक्षा> विद्रवाहन> धुंदुमार> यौवनाश्व> मंधाता> धवसंधी> प्रसनजीत> भरा> असित> सगर> रोमजुस> अंशुमत> दिलिप> भगिरथ> काकध> रपुंजय> कल्पसेन> सुदर्शा> अंगिवारुण> शिघ्रकंजय> मारुत> पुरुकुत्स> अंबरीष> मुचकुंद> त्रिशंकु> हरिश्चंद्र> रोहित> नाभक> असन> खडवाग्वी> दीर्घबाहु> दिलीप> अजपाळ> दशरथ> श्रीरामचंद्र> कुश> अतिदीन> निषद> नभ> पुंडरीक> क्षेमधन्य> देवाल्हिक> पार्था> बल> वज्रनाभ> विध्रुति> हिरण्य> योगाचाप> संधी> शिप> विश्वा> ब्रुहद्दल> ब्रुहत्द्दण> उरुक्रियण> वत्सव्रुद्ध> प्रतिवैर्मा> भान> दिवाकर> सहदेव> ब्रुहदश्व> अमरदेव> सुनक्षेत्र> पुष्कर> अंतरिक्ष> सुतप> अमिवजित> ब्रुहदानु> बहुविर्य> जय> रणंजय> संजय> क्षणकु> सुमित्र > याच सुमित्र राजापासुन सुर्यवंशातील पुढिल मराठा कुळे निर्माण झाली= 1}कदम 2}निकम 3}धिटक 4}काळमुख 5}शेलार 6}प्रोक्तट 7}प्रतिहार 8]दोरिक.
👉निकम Nikam
👉वंश :-सुर्य वंश
👉 गोत्र:-पराशर मान्यव्य, कौशिक
👉 वेद:- यजुर्वेद
👉देवक :- कळंब, उंबर, वेळू
👉अश्व वारू :- पिवळा
👉 राजाचे नाव :-प्रभाकर वर्मा
👉 निशान:- ध्वजस्थबी हनुमंन
👉मंत्र:- सूर्य गायत्री मंत्र.
👉कुलदेवी :- आंबेजोगाई, तुळजाभवानी.
👉धूंदू नावाच्या राक्षसला मारुन धुंधर उर्फ़ जयपुर वसवनारे ते राजस्थानच्या पहिल्या आर्य लोकांपैकी आहेत.
👉 अयोध्या वरून राजस्थान प्रांत मध्ये आले. राजस्थान आणि खानदेश या ठिकाणी निकुंभ कुटुंबांची राज्य होते. खांनदेश वर निकुभ वंशाचा राज्य खूप टिकले. आठव्या सदी पासून आणि निकुंभ वंश या प्रांतांमध्ये आहे.अल्ल शक्ती, वैरदेव, कृष्ण असे अनेक प्रतापी राजे निकुंभ वंशामध्ये होऊन गेले. निकुंभ घराणा आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पसरलेला असून आज निकम या नावाने. 96 कुळी मराठ्यांमध्ये निकम नावाने आहे.
👉 विजयनगर साम्राज्य मध्ये अनेक पराक्रम केल्याचा उल्लेख आहेत.
👉 यानंतर विजापूर या ठिकाणीसुद्धा निकम यांचे सरदार होते.
👉 स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांच्या सेना मध्ये निकम पराक्रमी गाजवलेचे उल्लेख आहेत.
👉 निकम कुळामध्ये अनेक उपनावे प्रसिद्ध असून बर्गे, खलाटे, कंक, साबळे प्रसिद्ध घराणे होऊन गेली. यांच्यावरती स्वातंत्र्य लेखन नक्की करू.
👉 निकम कुळातील उपकुळ व आत्ताची भाऊकी कुळे :- बर्गे, गुंड, कंक, खलाटे, साबळे.
👉मराठा साम्राज्याचे सेनापती येसाजी कंक हे निकम कुळातून होते.
👉 सरदार बर्गे अनेक वीर पुरुषांची कागदपत्रातून नावे दिसतात.
👉पुढे कोल्हापूर भागात बर्गे सरदारांचे निकम उपनाम झाले जरी आडनाव निकम आसले तरी ते मुळ बर्गे घराण्यातीलच आहेत बोरपाडळे ,निकमवाडी , कागल,जयसिंगपुर,या गावांमध्ये सध्या निकम घराण्याचे वंशज आहेत अशी माहिती निकम वंशज आदित्य यांनी उपलब्ध करून दिली.
©® लेखन & माहिती संकलन
नितीन घाडगे.
संदर्भ:- मराठा 96 कुळी आर. ए. कदम.(मराठी)
Maratha Kshatriyancha Itihaas by K. B. Deshmukh (मराठी)
मराठा रियासत
९६ कुळी मराठ्यांवरील आधारित साधने
पानिपत व खर्डा पोवाडा
अडवोकेट विशाल बर्गे इनामदार बारामती.
विठ्ठल बर्गे कोरेगाव यांनी बर्गे कुटुंबा वरती संशोधन अनेक लेख प्रसिद्ध केलेल आहेत.
पेशवे दप्तर
आदित्यसिंह निकम
सुर्यवंशी मराठा क्षत्रियांचा वंशव्रुक्ष !! वंशावळी व शाण्णव कुळी या बाळाजी नथुजी गावंड यांच्या पुस्तकात दिली आहे.
आम्हा क्षत्रिय राजपूत समाजातील 36 कुळात निकुंभ ही शाखा आहे आणि आमच्या खान्देशात राजपूत व मराठा समाजामध्ये हे कुळ आढळते.
ReplyDelete