स्वराज्याची राजधानी सातारचे पहिले छत्रपती शाहू





👉१८_मे_१६८२
"संभाजीराजांना" महाराणी येसुबाई पोटी 'गांगवली' उत्तर कोकण रायगड माणगाव येथे पुत्ररत्न प्राप्त झाले.
"शिवाजीराजे" नाव ठेवले व नंतर "शाहू" प्रचलित झाले असे उल्लेख वाचनात आहेत.

👉मुद्रा:-
श्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः। सा मूर्तिरिव वामनी ।। शंभूसुतोरिव।।
।।मुद्रा शिवराजस्य राजते ।।

👉 मातोश्री महाराणी येसूबाई व शाहूराजे

👉छत्रपती संभाजीराजांच्या १६८९ साली झालेल्या मृत्यूनंतर शाहूराजे आणि त्यांच्या मातोश्री महाराणी येसूबाई मोगलांच्या कैदेत सापडल्या.


 👉छत्रपती शाहू महाराज  तब्बल 18 वर्षे औरंगजेबाच्या कैदेत होते.

👉शाहूराजांची पुढे तब्बल १८ वर्षे कैदेत राहून १७०७ साली औंरंगजेबाच्या मृत्यूनंतरच सुटका झाली.
ज्या व्यक्तीच बालपण जितक्या खडतर आणि जास्त जबाबदारीतून जात ती व्यक्ती मोठेपणी तितकीच कर्तुत्ववान होते.

👉 छत्रपती शाहू महाराजांचं बालपण 

👉शिवरायंचे बालपण जहागीरदार पुत्र म्हणून गेले, लहानपणी अनेक कठीण प्रसंग त्यांनी पहिले. संभाजी राजांचे बालपण राजपुत्र म्हणून गेले, आग्रा भेटी सारखे प्रसंग त्यांनी स्वतः लहानपणी अनुभवले.
आपले आजोबा आणि वडील यांच्याहून खडतर बालपण शाहूंच्या वाट्याला आले.
संपूर्ण बालपण कैदेत गेलेला आणि नंतर  सर्वात जास्त गादीवर साम्राज्याकर्ता झालेला हा एकमेव राजपुत्र आहे.

👉 छत्रपती शाहू महाराज यांचा कार्यकाल 

👉छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्त्वपूर्ण ठसा उमटवला.

👉 कैदेतून सुटका व अंतर्गत राजकारण.

👉औरंगजेबाच्या अझमनामक मुलाने शाहूंची सुटका करून त्यांना राजपदाची वस्त्रे व राजपद दिले; मात्र चौथाई व सरदेशमुखी साठी  १७१३ पर्यंत मराठ्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे त्यांना वाट पाहावी लागली.

👉 राज्याभिषेक


  👉  छत्रपती शाहू (कार. १७०८–४९) यांनी १२ जानेवारी १७०८ रोजी राज्याभिषेक करून घेऊन विधिवत मराठी राज्याचे अधिपती असल्याचे जाहीर केले. त्यांनी सातारा ही राजधानी केली. अष्टप्रधान मंडळ स्थापन करून मातब्बर सरदारांकडे खाती सुपूर्त केली. त्यांनी अनेक गुणी, कर्तृत्ववान व पराक्र मी माणसे निवडून राज्यविस्तार केला.

 पहिले शाहू महाराज छत्रपती झाले  राज्यकारभार करू लागले परंतु मोठी अशी संपत्ती, पुरेसे सैन्य नव्हते. प्रतिकूल परिस्थितीतून  छत्रपती शाहू महाराजांनी अतिशय कौशल्यपूर्ण राज्य विस्तार दक्षिणे पासून तांजवर पर्यंत. ओडीसा बंगाल पासून गुजरात पर्यंत स्वराज्य विस्तार केला.

👉 राजधानी सातारा 


👉सातारा राजधानी हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले.मध्य भारत,उत्तर भारत, माळवा गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले,मुघल साम्राज्याचा अस्त होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याचा  झेंडा भारतभर फडकला ते थोरले शाहू महाराज त्यांच्याच कारकिर्दीमध्ये.



 

👉छत्रपती थोरले शाहू महाराज यांना ही अष्टप्रधान मंडळ नेमले.

१)बहिरो रामेश्वर पिंगळे - पेशवा
२)धनाजीराव जाधव - सेनापती
३)नारो शंकर- सचिव
४)रामचंद्र पुडे- मंत्री
५)महादजी गदाधर - सुमंत
६)अंबुराव हणमंते ऊर्फ ७)बाळकृष्ण वासुदेव - अमात्य
८)होनाजी अनंत - न्यायाधीश
९)मुदगलभट - पंडितराव
सरलष्कर-हैबतराव निंबाळकर.
चिटणीस- खंडोबल्लाळ .

👉पायदळ सरनोबत :-सरदार पिलाजीराव गोळे

पोतनिशी व खासनिशी- आनंद प्रभू ( मुरारबाजीचा पुतण्या )अशा नेमणुका केल्या तसेच.

थोरले शाहू महाराज यांनी परसोजी भोसले यांनी सेनासाहेब सुभा ही पदवी ही दिली

 .. तर सल्लागार पदी हे रायभानजी काका भोसले हे होते त्याच्या निधनानंतर हे पदवी सुभेदार पिलाजी राव जाधवराऊ यांना दिले.

 मराठेशाही साम्राज्याची विस्तार करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक मराठे सरदारांना विविध भागातील लष्करी मोकासा व वतन दिले व अखंड हिंदुस्थान मराठ्यांच्या नियंत्रणात आणले मराठ्यांचा भगवा जरीपटका दिल्लीवर फडकविला अशी महत्त्वाचे सरदार घराणे

१)अक्कलकोटकर :- युवराज फत्तेहसिंह राजे भोसले 
२)ग्वाल्हेरकर:- सरदार राणोजीबाबा शिंदे 
३) गुजरात :-सेनापती :-खंडेराव दाभाडे 
४)बडोदाकर :-सरदार दमाजीराव गायकवाड 
५) इंदुरकर :-सुभेदार मल्हारराव होळकर
६) नागपूरकर :--सेनासाहेबसुभा परसोजीराजे भोसले 
७)धारेकर:-- उदाजीराव पवार 
८)गजेंद्रगडकर :-हिंदुराव घोरपडे 
यासह अनेक घराणे तत्कालीन कालखंडात छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या नेतृत्व खाली आपल्या पराक्रमाने उदयास आले आहेत. सर्वांचा या ठिकाणी उल्लेख करणे शक्य नाही.





👉छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कडून संयमित व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कडून आक्रमकता घेऊन ४२ वर्षे हिदुस्थानचे राज्य कारभारी करणार एकमेव छत्रपती थोरले छत्रपती शाहू याना मानचा मुजरा........।।




 👉वारणेचा तह सातारा गादी आणि करवीर गादी.


👉 छत्रपती  संभाजी व छत्रपती शाहू या बंधूंत १३ एप्रिल १७३१ रोजी वारणेचा तह झाला. या तहानुसार वारणा नदी दोन्ही राज्यांची सरहद्द म्हणून मान्य करण्यात आली.


👉 शत्रूलाही घात करण्याची इच्छा होऊ नये. असा हा राजा अजात शत्रू म्हणून प्रसिद्ध होते. वडिलांचे छत्र लहानपणीच गेले. तब्बल 17 वर्षे बालपण कैदेत गेले. तरीसुद्धा या राजाने शून्यातून विश्व निर्माण करत.साऱ्या र्हिंदुस्थानावर मराठ्यांचा दरारा निर्माण केला.

👉 अतिशय सौजन्यपूर्ण वृत्तीने माणसांची पारख करून विश्वास टाकून. सरदारांचे संघटन करून अखंड हिंदुस्तान  मराठा साम्राज्याला जोडण्याचा प्रयत्न केला.


 👉15 डिसेंबर 1749 रोजी छत्रपती शाहू महाराजांचे सातारा येथे निधन झाले.  पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज यांना कोटी कोटी नमन.

लेखन
 नितीन घाडगे.




Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४