उत्तर भारत सोडून महाराष्ट्रात स्थायिक झालेले राजवंश

 उत्तर भारतील
 परमार,
सोलंकी,
चौहान,
 यादव,
 सिसोदिया,
गौर,
जादोन-भट्टी किंवा यादव
आणि मौर्य,
राठोड
👉अशा राजपूत वंशातील लोक मुस्लिम आक्रमणानंतर उत्तर भारत सोडून महाराष्ट्रात स्थायिक झाले. 




1परमार :-यांचे महाराष्ट्र मध्ये पवार, निंबाळकर, जगदाळे.
2राष्ट्रकुट :- महाराष्ट्रातील राष्ट्रकूट सूर्यवंशी घराणे कन्नोज काटेवाड मध्य भारतामध्ये विस्तारित झालं राष्ट्रकूटां नावावरून अपभ्रंश होऊन राठोड असे नामकरण झालं.
2राठोड :- बुंदी येथील हाडोती प्रांतातील राठोड घराणं महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाडळी मलवडी ललगुण बुध, राजापूर,  डिस्कळ,  मोळ, निमसोड, कळंबी, पळसगाव, रायगाव, पाचवड, सांगली जिल्ह्यातील कुमठे, कोल्हापूर भागातील कागल वंदू रे केनवडे कडगाव  हे महाराष्ट्रात घाटगे उर्फ घाडगे घराणे आहे.
3)सोलंकी:-
पाटणकर, माहुरकर आणि काठीकर देशमुख हे सोलंकी आहेत परंतु त्यांचे आडनाव साळुंके होते आहे.
4)चौहान:-
 चव्हाण, मोहिते
5)गौर :-
हे महाराष्ट्रात माने नावानं आहेत.
संदर्भ माने घरण्याचे बाळासाहेब माने यांचे पुस्तक.
शिवाय हेळवी व भाट यांचे असलं रेकार्ड 
6)सिसोदिया
:-भोसाजी सिसोदिया या मूळ पुरुषांच्या नावा वरून आडनाव भोसले व घोरपडे एक रक्त भावकी देखील सिसोदिया आहेत.

👉चालुक्यांपासून उत्पन्न झालेली बरीच सोलंकी

तथापि, दक्षिण भारतातील चालुक्यांपासून उत्पन्न झालेली बरीच सोलंकी कुटुंबे मुस्लिम आक्रमण करण्यापूर्वीच महाराष्ट्रात होती.

7)यादव /जा्दोंन 
 उत्तरेकडील जाधव किंवा जाधवराव हे जादोन-भट्टी म्हणून ओळखले जाणारे होते. 

8)मौर्य राजवंश:-

जावळी कर मोरे महाराष्ट्रात मोरे नावानं आहेत.

9)भाटी राजवंश:-

मराठा आडनाव भोईटे हेही भाटीचे वंशज आहेत.

10)तंवर:-

फाळके हे मूळचे तंवर राजवशातील.

11)बागुल (बागलाण)

राजवंश याच मूळ राठोड कुळीत होते.

महाराष्ट्रात बागल मराठा आडनाव आहे.हाराष्ट्रातील बागलाण भागावर राज्य करीत होते आणि त्यांचे आडनाव हे बागुल किंवा बागल हे नाव पडले. हे एक अतिशय सन्मानीय कुळ होते पण त्यांची संख्या खूप विरळ होते.

12)सेंद्रिक /सेंद्रक राजवंश 

महाराष्ट्रात शिंदे किंवा सिंधिया कुळ, ज्यापैकी ग्वाल्हेर राजघराणे हे सर्वात प्रमुख घर आहे.

विशेष म्हणजे, इतिहासकारांचा असा विश्वास आहे की त्रिलोचंदी बैस कुळ १० व्या शतकात महाराष्ट्रातील मुंगीपैठण येथून उत्तरेकडे गेले. असे उल्लेख आहेत.शिंदे आणि त्रिलोकचंदी बैस यांच्यातील सर्वात महत्त्वाचा संबंध म्हणजे नागदेवतेची उपासना (सर्प) - दोन्ही कुळांमध्ये नागदेवतेच्या उपासनेला सर्वात जास्त महत्त्व आहे.

  कुळी म्हणजे कुळ. मुख्य कुळ व त्यांचे उप-कूळे ही वेगवेगळी असतात. काही कुळांनी त्यांचे वैभव आणि राज्य गमावले तर काही ठिकाणी इतरांना महत्त्व प्राप्त झाले. आदर्श ९६ कुळांच्या यादीमध्ये २४ सूर्यवंशी कुळे, २४ चंद्रवंशी कुळे, २४ ब्रम्हवंशी कुळे आणि २४ नागवंशी कुळे यांचा समावेश आहे.

©®लेखन व माहिती संकलक

नितीन घाडगे

संदर्भ :- 1)96कुळी मराठा,विविध बुक 

            2)युदवंशीसेनी राजपूतो का इतिहास.

             2) गौरीशंकर वोझा 

             3)ग्वाल्हेरचे सुप्रसिद्ध इतिहासकार सरदार आनंदराव भाऊसाहेब फाळके यांनी त्रिलोकचंदी बैस आणि शिंदे हेच कुळ असल्याचे सिद्ध करण्यासाठी भक्कम ऐतिहासिक पुराव्यांची संघटीत केले होते.


( यूपीमधील अवध परिसरातील खजुरगावचा राणा, मुरन्माऊचा राजा आणि कुसमंदाचा राजा या त्रैलोकचंदी बैसांपैकी सर्वांत प्रमुख आहेत.

गंगा-जमुना प्रदेशात १३ व्या शतकात दिल्ली सुल्तानांनी केलेल्या छळाविरूद्ध बंडखोरी करणारे बैसवाड्याचे राजा त्रिलोकचंद पहिले होते. परंतु त्याच्यामुळे त्यांना ऐतिहासिक ओळख त्याला कधीच मिळाली नाही. खरं तर, राजावर पुरेशी संशोधन सामग्रीची कमतरता आहे.

महत्त्वाचे म्हणजे काही असे मानतात की त्रिलोकचंदी बैस ७ व्या शतकातील महान सम्राट, राजा हर्षवर्धन हा त्यांचा पूर्वज होता..)


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४