आंग्रे(मूळ आडनाव शंखपाल)

आंग्रे

(मूळ आडनाव शंखपाल)

सिंहासन, छत, चिन्हे, घोडा: - (तांबडी) लाल रंग

कबीले देवी: - जोगेश्वरी

देवक : - शंख (शंख शेल)

गोत्र: - गारगांव

वेद: - यजुर्वेद - मध्यानंदिन

विजय शस्त्र: - शस्र्रकंड शस्त्र पूजा

पवार: - भार्गव, आपनन, चव्हाण

गुहायसूत्र: - पारस्का

आडद, अरुद, अड़सूद, आशूद, अटकाद, अख्तर, अखिल, अमानकर, अंधक, अंधेरे, अवाकाले, चाबुकसुवर, चंचल, चटप, चटपेट, एरखंड, इशांकार, इथले, इथले, गदरव, गंधर्व, घोडटेल, हघणे, जंगली, जंजल, जनाजीरे, जठाधर, जटधरी, जाथ, जावजल, कडाळे, कांकराळे, करांडे, कर्णळे, लाड, सबकळ, सदर, सवाई, सावकल, टिप्रेस, त्रिदोशी, तुमाने, तुषार, वाटेणे (एकूण 43)

आंग्रे: - मराठा आर्मीच्या ग्रेट नेव्ही सुप्रीमो सरखेल कान्होजी आंग्रे (कान्होजी आंग्रे) त्यांच्यापासून


मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी एक म्हणजे आंग्रे घराणे. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शखपाळ-शंकपाळ-संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु आंगरवाडी ह्या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांस पुढे आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. 


    सेखोजी हे या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष. त्यांचे चिरंजीव तुकोजी हे उत्तर कोकण काबीज करीत असता शहाजींराजेनी चौलजवळ १६४० मध्ये जी दर्यावरील लढाई केली, तीत प्रथम प्रसिद्धीस आले. १६५९ मध्ये ते शिवाजी महाराजांच्या पदरी गेले. त्यांस मराठी आरमारातील २५ असामींची मुखत्यारी होती. पुढे ते आपल्या कर्तबगारीने सरनौबतीच्या हुद्द्यापर्यंत चढले. १६८० मध्ये तुकोजींचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा कान्होजी ह्यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले. कान्होजी हेच आंग्रे घराण्यातील सर्वांत कर्तबगार पुरुष आणि आंग्रे घराण्याचे संस्थापक होत.


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४