महाराष्ट्रातील मराठा बागल घराणे

👉बागलाण:-येथील बागुल वंशाने राज्य निर्माण केल 

👉नाशिक जवळच्या भागावर( सटाणा आणि शहादा तालुका ) आपले राज्य प्रस्थापित केले, बागुल वंशाचा असल्याने त्या भागाला बागलाण म्हटले जाऊ लागले.

बागुल वंशातला एक महाराष्ट्रात पुरुष आला, त्याने नाशिक जवळच्या भागावर( सटाणा आणि शहादा तालुका ) आपले राज्य प्रस्थापित केले, बागुल वंशाचा असल्याने त्या भागाला बागलाण म्हटले जाऊ लागले. पुढे बागलाण मध्ये झालेले राजे, त्यांचे पराक्रम यांचे वर्णन आहे. अकबराने बागलाण वर केलेले आक्रमण आणि त्याला कसे परतवून लावले याचे वर्णन, बागलाण च्या राजाची आणि जहांगीरच्या दोस्तीचे वर्णन आहे. - इथे ग्रंथ संपतो.
पुढे काय झाले, तर औरंगजेब मोठी फौज घेऊन महाराष्ट्रात आला होता तेव्हा त्याने बागलाणवर आक्रमण केले, बरेच दिवस झुंज दिली पण नंतर बागलाणच्या राजाचा निभाव लागला नाही, शेवटी अन्य राजपूत राजांच्या मध्यस्थीने बागलाणच्या राजाने राज्य औरंगजेबाला दिले.



👉आणि औरंगजेबाने त्याला बागलाणचा सरदार बनवून राज्य परत दिले.

पुढे मराठा स्वराज्याने बागलाण वर आक्रमण केले आणि बागलाण स्वराज्यात मिळवले आणि बागुल वंशाच्या हातातून सत्ता कायमची गेली. त्यांनतर बागुल वंशाचे क्षत्रिय महाराष्ट्रभर कुठे कुठे वतनावर, जहागिरीवर विभागले गेले, काहींचे आडनाव बागुल राहिले, काहींचे बागल झाले.
उत्तरप्रदेशातील कन्नोज भागातील क्षत्रिय ठाकूर, 
उत्तराखंडमधील गढवाली राजपूत, राजस्थानातील राजपूत राठोड आणि 
महाराष्ट्रातील मराठा बागल हे एकाच भावकीचे.

👉बागूल घराण्याचे प्रचीन मूळ :-
    वेगवेगळ्या राजांच्या पराक्रमाची आणि कारकिर्दीचे वर्णने आहेत. याच वंशात पुढे एक परमप्रतापी राजा राष्ट्रऔध जन्माला आला. त्याच्याच वंशात पुढे कालसेन आणि चंद्रहार हे दोन परमप्रतापी भाऊ जन्माला आले, यापैकी कालसेन राजा झाला, चंद्रहार सेनापती. यांनी मोठा पराक्रम करत काश्यपपुर(काश्मीर) जिंकले, जेव्हा ते काश्यपपुरच्या मोहिमेवर होते, तेव्हा इकडे अचानक संधी साधून काशीच्या राजाने कन्नोज वर आक्रमण केले, गुप्तचरांकडून बातमी मिळाल्यावर कालसेन आणि चंद्रहार दोघेही सेना घेऊन आपली राजधानी वाचवण्यासाठी कन्नोजकडे वळाले, परंतु वाटेत यमुना नदीला महापूर आला होता त्यामुळे कालसेनची सेना नदी पार करू शकत नव्हती, जर रात्रीत नदी पार केली नसती तर कन्नोज काशीराजाच्या हातात जाणार होते, त्यामुळे यमुनेला प्रसन्न करण्यासाठी चंद्रहारने पूजा केली आणि रस्ता देण्यासाठी म्हणून स्वतःच स्वतःचे शीर कापून अर्पण केले. यमुनेने कालसेनच्या सैन्याला रस्ता दिला, परंतु कालसेनला जेव्हा आपल्या भावाने दिलेल्या बलिदानाची बातमी कळली तेव्हा तो प्रचंड दुखी झाला आणि विलाप करू लागला आणि आपली कुलदेवता वज्रेश्वरी देवीला विनवू लागला, वज्रेश्वरी प्रसन्न झाली आणि तिने चंद्रहारचे शीर पुन्हा धडाला जोडण्यास सांगितले आणि देवीने चंद्रहारला जिवंत केले पण 
धडाला शीर जोडताना नीट जोडले न गेल्यामुळे चंद्रहार जिवंत झाल्यावर विचित्र दिसू लागला, तेव्हा देवी त्याला पाहून म्हणाली, "ओह, बागुल" 
[ संस्कृत मध्ये बागुल म्हणजे एक अतिशय भयंकर दिसणारा बिबट्यासारखा पण काळ्यारंगाचा प्राणी] 
नंतर देवीने चंद्रहारला वरदान दिले कि, तू आजपासून बागुल म्हणून ओळखला जाशील आणि तुझा वंश बागुलवंश म्हणून ओळखला जाईल, तू परमप्रतापी दिग्विजयी राजा होशील. त्यानंतर त्या दोघांनी काशीराजाचा पराभव करून आपली राजधानी वाचवली आणि पुढे पराक्रम करून कैकय पासून सातपुडा पर्वतापर्यंत राज्य पसरवले. पुढे सोयीसाठी राज्याचे दोन भाग केले, कालसेन कान्नोजचा राजा राहीला आणि 👉   👉दक्षिण भागात उज्जेनला चंद्रहार (बागूल) ला राजा केले.
👉त्याकाळात आपल्या वंशातील पराक्रमी पुरुषाचे आडनाव लावण्याची पद्धत होती.

👉बागुल वंशाचे क्षत्रिय महाराष्ट्रभर कुठे कुठे वतनावर, जहागिरीवर विभागले गेले, काहींचे आडनाव बागुल राहिले, काहींचे बागल आडनाव झाले.

👉उत्तरप्रदेशातील कन्नोज भागातील क्षत्रिय ठाकूर, 
उत्तराखंडमधील गढवाली राजपूत, राजस्थानातील राजपूत बागुल  आणि महाराष्ट्रातील मराठा बागल हे एकाच भावकीचे सूर्यवंशाचे रामाचे थेट वंशज म्हणून देवक सूर्यवंफुल आहे.


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...