पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर

अहिल्याबाई खंडेराव होळकर
जन्म:-31 मे1725जन्मस्थळ :-  चौडीगाव जामखेड तालुका. अहमदनगर महाराष्ट्र. 
वडील:- मानकोजीराव शिंदे. 
मृत्यू:-13 ऑक्टोंबर1795 (राजधानी महेश्वर) 
पदवी:- पुण्यश्लोक
अधिकारकाळ:-11 डिसेंबर1767ते13 डिसेंबर1795
सप्त सिंधू , सप्त गंगा मुक्त करा …. काशीचा विश्वेश्वर सोडवा …! तुम्ही चुकुर होऊं नका...
शिवरायांच्या अखेरच्या शब्दाला जागलेली, मराठयांची माय माऊली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर 🙏🚩 यांची आज जयंती..


👉आख्यायिकेनुसार

👉 ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खडेराव याची वधू म्हणून आणले.

👉सेनापती मल्हारराव याच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कुम्हेर लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरेे  मल्हारराव  होळकर यांनी  अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर,  मल्हारराव  होळकर       हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा  प्रांताचा कारभार बघू लागल्या. 


👉एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना.

   इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कथेरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे.(इ.स. १७२५ - इ.स. १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) ही, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्या च्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. 

👉त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.


👉अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.

👉राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला. 

👉 महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. 

👉त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

👉 वेरावळ येथील सोमनाथाचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. 

👉अहिल्याबाईंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती. 


👉अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. 

👉कार्यकाळ

मध्य भारताच्या इंदूर मधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. 

हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली.

 अहिल्याबाईंना लोकांनी आणि प्रजेने संतांचा दर्जा दिला होता. 

👉अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला."


👉अहिल्यादेवींच्या काळातील किल्ले व भुईकोट:

  1. किल्ले महेश्वर
  2. इंदोरचा राजवाडा
  3. चांदवडचा रंगमहाल
  4. वाफगाव - यशवंतराजे होळकर यांचे जन्मस्थळ
  5. खडकी-पिंपळगाव : होळकर वाडा
  6. काठापूर : होळकर वाडा किंवा वाघ वाडा
  7. पंढरपूर : होळकर वाडा
  8. लासलगाव : अहिल्यादेवींचा किल्ला
  9. पळशी : पळशीकर वाडा(होळकरांचे दिवाण)

👉अहिल्यादेवींच्या काळातील मंदिरे बारव व धर्मशाळा :

  • अकोले तालुका- विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, वीरगाव, औरंगपूर.
  • वीरगाव - बारव
  • अंबा गाव – दिवे.
  • अमरकंटक (मप्र)- श्री विघ्नेश्वर, कोटितीर्थ, गोमुखी, धर्मशाळा व वंश कुंड
  • अलमपूर (मप्र) – हरीहरेश्वर, बटुक, मल्हारीमार्तंड, सूर्य, रेणुका,राम, हनुमानाची मंदिरे, लक्ष्मीनारायणाचे,मारुतीचे व नरसिंहाचे मंदिर, खंडेराव मार्तंड मंदिर व मल्हाररावांचे स्मारक
  • आनंद कानन – श्री विघ्नेश्वर मंदिर.
  • अयोध्या (उ.प्र.)– श्रीरामाचे मंदिर, श्री त्रेता राम, श्री भैरव, नागेश्वर/सिद्धार्थ मंदिरे, शरयू घाट, विहिरी, स्वर्गद्वारी मोहताजखाना, अनेक धर्मशाळा.
  • आमलेश्वर, त्र्यंबकेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार
  • उज्जैन (म.प्र.)– चिंतामणी गणपती,जनार्दन,श्री लीला पुरुषोत्तम,बालाजी तिलकेश्वर,रामजानकी रस मंडळ, गोपाल, चिटणीस, बालाजी, अंकपाल, शिव व इतर अनेक मंदिरे,१३ घाट, विहिरी व अनेक धर्मशाळा इत्यादी.
  • ओझर (अहमदनगर) (महाराष्ट्र) – २ विहिरी व एक कुंड.
  • इंदूर – अनेक मंदिरे व घाट
  • ओंकारेश्वर (मप्र) – मामलेश्वर महादेव,
  • कर्मनाशिनी नदी – पूल
  • काशी (बनारस) – काशी विश्वनाथ,श्री तारकेश्वर, श्री गंगाजी, अहिल्या द्वारकेश्वर, गौतमेश्वर व अनेक महादेव मंदिरे, मंदिरांचे घाट, मनकर्णिका, दशास्वमेघ, जनाना, अहिल्या घाट, उत्तरकाशी, रामेश्वर पंचक्रोशी, कपिलधारा धर्मशाळा, शीतल घाट.
  • केदारनाथ – धर्मशाळा व कुंड
  • कोल्हापूर (महाराष्ट्र) – मंदिर-पूजेसाठी साहाय्य.
  • कुम्हेर – विहीर व राजपुत्र खंडेरावांचे स्मारक.
  • कुरुक्षेत्र (हरयाणा) - शिव शंतनु महादेव मंदिरे,पंचकुंड व लक्ष्मीकुंड घाट.
  • गंगोत्री –विश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूर्णा, भैरव मंदिरे, अनेक धर्मशाळा.
  • गया (बिहार) – विष्णुपद मंदिर
  • गोकर्ण – रावळेश्वर महादेव मंदिर, होळकर वाडा, बगीचा व गरीबखाना.
  • घृष्णेश्वर (वेरूळ) (महाराष्ट्र) – शिवालय तीर्थ.
  • चांदवड वाफेगाव (महाराष्ट्र) – विष्णूचे व रेणुकेचे मंदिर.
  • चिखलदा – अन्नछत्र
  • चित्रकूट (उ.प्र.) - श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
  • चौंडी – चौडेश्वरीदेवी मंदिर, सिनेश्वर महादेव मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, धर्मशाळा व घाट
  • जगन्नाथपुरी (ओरिसा) – श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा व बगीचा
  • जळगांव (महाराष्ट्र) - राम मंदिर
  • जांबगाव – रामदासस्वामी मठासाठी दान
  • जामघाट – भूमिद्वार
  • जेजुरी(महाराष्ट्र) – मल्हारगौतमेश्वर, विठ्ठल, मार्तंड मंदिरे, जनाई महादेव व मल्हार या नावाचे तलाव.
  • टेहरी (बुंदेलखंड) – धर्मशाळा.
  • तराना? – तिलभांडेश्वर शिव मंदिर, खेडपती, श्रीराम मंदिर, महाकाली मंदिर.
  • त्र्यंबकेश्वर (नाशिक) (महाराष्ट्र)– कुशावर्त घाटावर पूल.
  • द्वारका (गुजरात) – मोहताजखाना, पूजागृह व पुजाऱ्यांना काही गावे दान.
  • श्री नागनाथ (दारुकावन) – १७८४मध्ये पूजा सुरू केली.
  • नाथद्वार – अहिल्या कुंड, मंदिर, विहीर.
  • निमगाव (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
  • नीलकंठ महादेव – शिवालय व गोमुख.
  •  (उ.प्र.) – महादेव मंडी, निमसर धर्मशाळा, गो-घाट, चक्रीतीर्थ कुंड.
  • नैम्बार (मप्र) – मंदिर
  • पंचवटी (नाशिक)(महाराष्ट्र)– श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा, रामघाट.
  • पंढरपूर (महाराष्ट्र) – श्री राम मंदिर, तुळशीबाग, होळकर वाडा, सभा मंडप, धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली. बाजीराव विहीर
  • पिटकेश्वर, ता. इंदापूर - पंढरपूर वारीच्या जुन्या मार्गावर बांधलेली बारव
  • पिंपलास (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
  • पुणतांबे (महाराष्ट्र) – गोदावरी नदीवर घाट.
  • पुणे (महाराष्ट्र) – घाट (कोणता घाट?)
  • पुष्कर – गणपती मंदिर,मंदिरे,धर्मशाळा व बगीचा.
  • प्रयाग (अलाहाबाद,उ.प्र.) - विष्णु मंदिर, घाट व धर्मशाळा, बगीचा, राजवाडा.
  • बद्रीनारायण (उ.प्र.) –श्री केदारेश्वर मंदिर, हरिमंदिर, अनेक धर्मशाळा (रंगदचाटी, बिदरचाटी, व्यासंग, तंगनाथ, पावली) मनु कुंड (गौरकुंड व कुंडछत्री), देवप्रयाग येथील बगीचा व गरम पाण्याचे कुंड, गायींच्या चरण्यासाठी कुरणे.
  • बऱ्हाणपूर (मप्र) – घाट व कुंड.
  • बिठ्ठूर – ब्रह्मघाट
  • बीड (महाराष्ट्र)– घाटाचा जीर्णोद्धार.
  • बेल्लूर (कर्नाटक) – गणपती, पांडुरंग, जलेश्वर, खंडोबा, तीर्थराज व अग्नि मंदिरे, कुंड
  • भरतपूर' – मंदिर, धर्म शाळा व कुंड.
  • भानपुरा – नऊ मंदिरे व धर्मशाळा.
  • भीमाशंकर (महाराष्ट्र) – गरीबखाना भुसावळ (महाराष्ट्र) - चांगदेव मंदिर
  • मंडलेश्वर – शिवमंदिर घाट
  • मनसा – सात मंदिरे.
  • महेश्वर - शंभरावर मंदिरे, घाट, धर्मशाळा व घरे.
  • मामलेश्वर महादेव – दिवे.
  • मिरी (अहमदनगर) (महाराष्ट्र) – सन १७८० मध्ये भैरव मंदिर
  • रामपुरा – चार मंदिरे, धर्मशाळा व घरे.
  • रामेश्वर (तामिळनाडु) – हनुमान व श्री राधाकृष्ण यांची मंदिरे, धर्मशाळा, विहीर, बगीचा इत्यादी.
  • रावेर (महाराष्ट्र)– केशव कुंड
  • वाफगाव(महाराष्ट्र) – होळकर वाडा व विहीर.
  • श्री विघ्नेश्वर – दिवे
  • वृंदावन (मथुरा) – चैनबिहारी मंदिर, कालियादेह घाट, चिरघाट व इतर अनेक घाट, धर्मशाळा व अन्नछत्र.
  • वेरूळ (महाराष्ट्र) – लाल दगडांचे मंदिर.
  • श्री वैजनाथ (परळी,) (महाराष्ट्र)– सन १७८४ मध्ये वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार.
  • श्री शंभु महादेव पर्वत, शिंगणापूर (महाराष्ट्र) – विहीर.
  • श्रीशैल मल्लिकार्जुन (कुर्नुल, आंध्रप्रदेश) – शिवाचे मंदिर
  • संगमनेर(महाराष्ट्र)– राम मंदिर.
  • सप्‍तशृंगी – धर्मशाळा.
  • संभल? (संबळ) – लक्ष्मीनारायण मंदिर व २ विहिरी.
  • सरढाणा मीरत – चंडी देवीचे मंदिर.
  • साखरगाव (महाराष्ट्र)– विहीर.
  • सिंहपूर – शिव मंदिर व घाट
  • सुलतानपूर (खानदेश) (महाराष्ट्र)– मंदिर
  • सुलपेश्वर – महादेव मंदिर व अन्नछत्र
  • सोमनाथ मंदिर, धर्मशाळा, विहिरी.
  • सौराष्ट्र (गुजरात) – सन १७८५ मध्ये सोमनाथ मंदिर, जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा.
  • हरिद्वार (उ.प्र.) – कुशावर्त घाट व मोठी धर्मशाळा.
  • हांडिया – सिद्धनाथ मंदिरे, घाट व धर्मशाळा
  • हृषीकेश – अनेक मंदिरे, श्रीनाथजी व गोवर्धन राम मंदिर
  • नंदुरबार (महाराष्ट्र)- विहीर
  • मुक्ताईनगर(महाराष्ट्र)-मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी
 माहिती संकलन
नितीन घाडगे

👉अहिल्यादेवी यांच्या वरती अनेक पुस्तके उपलब्ध आहेत ती खालील प्रमाणे
  • 1)अहिल्याबाई' : लेखक - श्री. हिरालाल शर्मा
  • 2')अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. पुरुषोत्तम
  • 3)'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. मुकुंद वामन बर्वे
  • 4)अहिल्याबाई होळकर - वैचारिक राणी (लेखक : म.ब. कामत व व्ही.बी. खेर)
  • 5)अहिल्याबाई होळकर : लेखक - माननीय श्री दीक्षित
  • 6)अहिल्याबाई होळकर (चरित्र), लेखक : खडपेकर
  • 7)कर्मयोगिनी : लेखिका - विजया जहागीरदार
  • 8)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जनार्दन ओक
  • 9)महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार - तेजस्विनी अहिल्‍याबाई होळकर (लेखिका : विजया जागीरदार प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
  • 10)शिवयोगिनी (कादंबरी, लेखिका - नीलांबरी गानू)
  • 11).'ज्ञात- अज्ञात अहिल्याबाई होळकर' लेखक - विनया खडपेकर. 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...