चंद्रसेन जोगेश्वरी रथ उत्सव सलग दुसऱ्या वर्षी साधेपणाने साजरा.

🙏श्री चंद्रसेन जोगेश्वरी रथ उत्सव पालखी सोहळा साध्या पद्धतीने साजरा होतोय 
कोरोना सारख्या महाभयंकर  पार्श्वभूमीवर निमसोड मध्ये यात्रा अगदी मोजक्या  मंडळीच्या उपस्थितीमध्ये पारंपारिक कार्यक्रम पार पडणार आहे.
 👉यात्रेच्या आदल्या दिवशी सासन काठी मिरवणूक छबिना निघतो.
 पारंपरिक  यात्रेचे स्वरूप असं आहे की किल्ले वसंतगडवर चंद्रसेन महाराजांचे मूळ स्थान. चंद्रसेन देवाची यांची यात्रा याठिकाणी जल्लोषात  पार पडते. परंपरेनुसार मुळ ठाणे असणार किल्ले वसंतगड येथे सासन काठी  घेऊन भक्त जातात.मागील वर्षापासून कोरोजणामुळे अत्यंत साध्या पद्धतीने मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत ही यात्रा पार पडली.

निमसोड याठिकाणी अत्यंत साध्या पद्धतीने छबिना उत्सव पार पाडण्यात आला.
 दरवर्षीप्रमाणे यावर्षी छबिना व सासन काठी मिरवणूक कार्यक्रम रद्द रद्द झाले.

👉    चंद्रसेन महाराजांचा रथ उत्सव निमसोड
 निमसोड याठिकाणी रथ उत्सवाची परंपरा असल्यामुळे येथील घाडगे मंडळींनी चंद्रसेन रथ उत्सव सुरू केला. अत्यंत जल्लोषात मध्ये. हा सोहळा पार पडतो. परंतू करोणाच्या पार्श्वभूमीमुळे मागील वर्षापासून अत्यंत साध्या पद्धतीने रथ सजवला जातो.रथ पूजन केलं जातं आहे. यावर्षी रथ उत्तम प्रकारे सजवण्यात आलेला आहे . कोरोना मुळे हा उत्सव अनुभवता येणार नाही याची खंत आहे.

👉 कुस्त्यांचे जंगी मैदान :-
 यावर्षी सर्व कार्यक्रम रद्द असल्यामुळे
 कुस्ती, ऑर्केस्ट्रा तमाशा  असे उपक्रम  यावर्षी नाहीत.
👉 चंद्रसेन मंदिर पूर्णत्वाकडे:-
 भागातील अतिशय दिव्य प्रशस्त आणि उत्तम ठिकाणी चंद्रसेन महाराजांचे मंदिर निमसोड मध्ये आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. या मंदिरामुळे निमसोड च्या वैभवा मध्ये भर पडत आहे.

 
 ©®लेखक:- नितीन घाडगे

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...