छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक समारंभ हा आखिल हिंदुस्थानातील अशा प्रकारचा पहिलाच समारंभ होता.
छ.शाहू महाराज यांचा ३१ मे १९२२ रोजी एका #मराठा पुरोहितांकडून वैदिक विधीने संपन्न झालेला हा #राज्याभिषेक समारंभ हा आखिल हिंदुस्थानातील अशा प्रकारचा पहिलाच समारंभ होता.
हा राज्याभिषेक विधी #क्षात्रजगदगुरू सदाशिव पाटील-बेनाडीकर यांचे मार्गदर्शनाखाली पार पडला.
राजर्षी शाहू छत्रपतींनी बहुजनांना धार्मिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी मराठा पुरोहित निर्माण करणारे श्री शिवाजी क्षत्रिय वैदिक विद्यालय स्थापन केले होते. या विद्यालयाचे विद्यार्थी यावेळी राज्याभिषेकासारखा महत्त्वपूर्ण विधी करण्याइतके सक्षम झाले होते. असा मोठा व महत्त्वपूर्ण विधी पार पाडण्यासाठी मुख्य पुरोहित आवश्यक असतो. जो पुरोहितांकडून विधी करवून घेतो. यावेळीपासून ही जबाबदारी राजर्षी शाहू छत्रपतींनी स्थापन केलेल्या क्षात्रपीठाचे पीठाधीपती श्री क्षात्रजगदगुरू यांनी पार पाडली.
मोठ्या समारंभाने विधीपूर्वक व वैदिक पध्दतीने मराठा पुरोहितांकडून हा महत्त्वपूर्ण विधी क्षात्रजगद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
एका ब्राह्मणेत्तर मराठा पुरोहितांकडून वैदिक विधीने संपन्न झालेला हा राज्याभिषेक समारंभ हा आखिल हिंदुस्थानातील अशा प्रकारचा पहिलाच समारंभ होता.
Comments
Post a Comment