महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे प्राचीन राजे माने घराणे.

       गौड़ क्षत्रिय भगवान श्रीराम यांचे भाऊ भरत यांचे वंशज आहेत.एका किंवदंती नुसार गंधार याचा अपभ्रंश गौर झाला पुढे जाऊन राजस्थान मध्ये स्थानीक गौर हा शब्द प्रचलित झाला. महाभारतातील राजा जयद्रथ याच वंशाचा होताा.   

   माने हे मूळचे राजस्थानमधील गौर क्षत्रिय. गौर म्हणजे र उच्च पदे असणारा. असा होतो. गौर कंधार येथील राष्ट्रकूट त्यांच्याकडे सरदार होते. कंधार राष्ट्रकूट आणि माणदेशातील राष्ट्रकूट.एकच घर. त्यामुळे गौर घराणे माणदेशात आले. कंधारचा राजा कडून  कडून खूप अभिमानी असणारे गौर यांना माने किताब दिल्याचे उल्लेख अनेक ठिकाणी उल्लेख मिळतात.
👉 गौर महाराष्ट्रात 950 वर्षापूर्वी आले अस मत लेखक बाळासाहेब माने यांचा असून ते यामानी घराण्यातील आहेत. शिवाय त्यांचे स्वतःचे पुस्तक यामध्ये असे आणि उल्लेख आहेत.

👉 अतिशय मानी असल्यामुळे गौर क्षत्रिय यांना माने असा किताब दिला.
     गौर छत्रिय घराणे अतिशय अभिमानी. त्यामुळे कोणासमोर हे गौर झुकत नसत.
 👉 कंधारचा राजा ला असं वाटलं गौर खूप शोध लढवय्ये हे आपल्या सोबत असतील तर आणि ते सोबत राहतील. राज्य वाढवता येईल. परंतु अभिमानी गौर कुणा समोरही झुकत नसत.  परंतु फक्त गौर याना त्या राजाने मुभा दिली.हे आहे माने यांच्या पुस्तकात आहे.

 👉माने या लोकांना हे आहे माने यांच्या पुस्तकात.. माने या लोकांना दरवाजातून  वाकून न येण्याची मुभा होती असच उल्लेख आढळून येतो.

👉 पुढे जाऊन गादीवर राजाचा मुलगा आला. परंतु गौर घराणं  या लोकांना दरवाजातून  वाकून न येण्याची मुभा होती. त्यामुळे इतर मराठे सरदार. यांनी त्या राजाला विनंती केली. की आम्ही वाकून मुजरा करायचा. परंतु गौर यांना वेगळा न्याय का. यावरती विचार करून राजाने गौर सरदारांची परीक्षा घ्यायचं ठरवलं.

👉 मोठी मेजवानी ठेवून सर्व सरदारांना बोलवलं. मोठे मंडप घातले. सजावट केली. आणि एकच दरवाजा ठेवला. यातून घोड्यावरुन फक्त एकच मनुष्य जाऊ शकतो असं. या वाटेवरती अशी सोय करून ठेवली  तलवार आडवी बांधली की घोड्यावरुन बसणाऱ्या स्वराच्या बरोबर गाड्यावर यावी.
    या प्रवेशद्वाराच्या समोर राजा असंन टाकून बसला. येणार याची स्वागत  राजा करत असे. इतर सर्व सरदार मंडळी तलवारीच्या खाली वाकून आले. यानंतर मात्र शूर लढवय्ये, अभिमानी गौर सरदार मंडळी. सात भाऊ आपल्या  फौजेसह आले. हे पाहून  क्षणभर विचार करून घोडे मागे घेतले आणि परत वेगाने. मान वर करून अभिमानाने गौर सरदार यांचे एक-दोन-तीन-चार  करत प्रत्येकाचे मुंडके छाटले परंतु मान खाली झुकली नाही. राजांनी सर्व पहिला आणि पळत जाऊन हा सहार थांबवला.आणि राजांनी हुकूम सोडला तलवार काढा.
 राहिलेला गौर व भाऊबंद त्यांना आदरपूर्वक दरबारात आणले.
  यानंतर खास असा दरबार भरवून.  गौर क्षत्रिय सरदारांचा मोठा सन्मान केला. याच वेळी पालखीचा मान देऊन. गौर बायकाना पायात सोन्याचे तोळे घालण्याचा मान दिला. हा अधिकार फक्त राजघराण्यातल्या स्त्रियांनाच असतो. असा मान परंपरागत दिला. असा मोठा मान. व राजे हा किताब देऊन अतिशय अभिमानी गौर क्षत्रियांना माने हा किताब दिला. तेव्हापासून गौर  अभिमानाने माने ही पदवी लावू लागले त्याच आडनाव मध्ये रूपांतर झालं. या घराण्यातील शूर लढवय्ये पुरुष राजेमाने हा किताब लावू लागले. त्या सात भावांपैकी तो वाचला त्यांचं नाव *अताजी गौर*हे होते.  जिवाचा त्याग देऊन जिवापेक्षा  आत्मसन्मान अभिमान खूप महत्त्वाचा. त्यामुळे गौर हे  माने हा किताब मिळाला.
   
  👉  कंधारचा राजाकडे असतांना नेहमी मानपुर च्या राष्ट्रकूट यांच्या राज्यात जाऊ लागत.कधी राजाच्या अश्व परीक्षेला,तर कधी  दोन्ही राज्याच्या अंतर्गत राजकारणासाठी. तर कधी मानांकन च्या लढायांमध्ये मदतीसाठी. असे उल्लेख आहेत.
  मानपुर ही राष्ट्रकूट राजा मानाक त्यांची राजधानी.या भागाला पूर्वी कुंतल देशात असे म्हटले जाईल. उल्लेख अनेक ठिकाणी आहेत. कुंतल देशांमध्ये कृष्णा नदीच्या दक्षिण उत्तर बाजूच्या प्रदेश येतो. म्हणजेच आताचा पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली, सोलापूर,कोल्हापूर पुणे.,नगरचा काही भाग.व दक्षिणेकडे कर्नाटकचा काही भाग. असा कुंतल देशाचा प्रदेश आहे.

   👉  राष्ट्रकूटांची राजेवाडी इथली गढी वापरत होते माने. परंतु बाळासाहेब म्हणतात त्याप्रमाणे 'मानपूर हे त्यांचे [मान्यांचे ] राज्य ' नव्हते.. मान्यखेट अथवा मालखेडचे राज्य वेगळे होते. मान्यखेट कर्नाटकात आहे आणि त्याचा या मानपूरशी संबंध नाही.

👉 म्हसवडकर माने :-  शूर सरदार होऊन गेले. अनेक किताब या घरांमध्ये मिळाले. अनेक या राज घरांन्यनी   बांधकाम केली त्यामध्ये सिद्धनाथ मंदिर. या मंदिरात शिलालेख असून उत्तम प्रकारे जतन केलेला आहे. माने यांचे कुलदैवत सिद्धनाथ असून. माने याचा प्राचीन वाडा म्हसवड येथे आजही  अवशेष पाहायला मिळतील.माने येथून  महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेर अनेक ठिकाणी वतने संस्थांनी जागा मिळवून वास्तव्यास आहे. हे बलाढ्य सरदार घराणे  शूर लढवय्ये आहे. लष्करी परंपरा असल्यामुळे.देशमुखी सरदेशमुखी  घराण्याकडे होती. पाटील क्या इतर अनेक  वतणे या घराण्याकडे आहेत.





👉 ©®लेखन & माहिती संकलक
 नितीन घाडगे.
👉संदर्भ - 1. ग्रँड डफ,
           2. पेशवे दफ्टर,
           3. सरदारांच्या बखरी,
           4. पेशवेकालीन पत्रव्यवहार इ.
संजय देशमुख कामनगावकर हो. पण बखर हाच शब्द आहे माने आणि गोपाळरावांच्या पुस्तकात.
           5. सरसेनापती संताजी घोरपडे लेखक बाळासाहेब माने.या पुस्तकातून.










Comments

  1. छान माहिती दिली पाहुणे.... Rahimatpur वाले बाबत इतकी माहिती न्हवती. Rahimatpur वाले माने राजे माने पैकी नाहीत. ते ठाकूर आहेत. हे पण लक्षात ठेवा. त्यांचे आडनाव ठोके पाटील होते.

    ReplyDelete
    Replies
    1. दादा काही तसे संदर्भ भेटले पाठवा. दुरुस्ती नक्कीच केली जाईल लेखात

      Delete
    2. रहिमतपूर माने सरकार बद्दल माहिती कुठे सापडेल

      Delete
  2. खूप महत्वपूर्ण माहिती.. धन्यवाद व गर्व आहे माने असल्याचा

    ReplyDelete
  3. रहीमतपुर मध्ये म्हसवडकर माने,राजाचे कुर्ले येथील माने;मायणी येथील माईणकर माने असे वेगवेगळ्या ठिकाणचे माने स्थायिक झालेले आहेत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...