प्रती सरकार चे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन
👉नाना पाटील याचा जन्म येडे मच्छिंद्र गड ता.वाळवा जि.सांगली झाला.
👉लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते.
👉 नाना नोकरीतून बाहेर पडले
👉 पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले.
👉* «नाना पाटील माझं नाव हाहा कुराडीचा घाव»* निमसोड येथील भाषण झाले होते. निमसोड येथील रहिवासी संपत बाजी घाडगे यांनी त्या भाषणातील काही शब्द वयाच्या 95 वर्ष पर्यंत लक्षात ठेवले होते. काही काळ निमसोड येथे त्यांचा सहभाग आम्हाला लाभला. त्यावेळेस आम्ही व्हिडिओ काढला होता त्यांचा. त्याची लिंक खालील प्रमाणे.
https://youtu.be/1PQvK9i-vFU
👉1930च्या सविनय कायदेभंग चळवळी चे कार्य करण्यासाठी नांनानी नोकरीला लाथ मारली.
1. ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून दिली
2. तरुणांना आणि जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केले.
3. वारकरी संप्रदायाची छाप नानांच्या जीवनामध्ये दिसून येते.
4. भाषण कौशल्य असल्यामुळे नानांनी अतिशय प्रभावी भाषणे करून तरुणांना धाडशी बनवून संघटन केले.
5. बहुजन लोकांचा स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न केला. अनेकांना स्वतंत्र संग्राम मध्ये सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंह नाना पाटलांचे प्रमुख योगदान होते.
ब्रिटिश शासनाला समांतर अशी पुन्हा उभी केली पाहिजे असं नानांना सतत वाटत होतं.
‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले.
👉 आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात अमलात आणली होती. ही काय साधी गोष्ट नव्हती.
प्रतिसरकारच्या माध्यमातून
1.लोकन्यायालये,
2.अन्नधान्य पुरवठा,
3.बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात.
👉ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून दिली
👉 1942 च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकार स्थापन केला.
👉प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग दि माडगूळकर लिखित पोवाड्याच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.
👉 शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनीसुद्धा नंतरच्या काळामध्ये त्यांच्यावर ती पोवाडे सादर केले होते. युट्युब सोशल मीडियाच्या माध्यमातून आजही त्यांच्या आवाजातील पोवाडा अंगावर काटा आणतो.
👉नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली.
त्यातल्या एका दलाचे-तुफान दलाचे- फील्ड मार्शल जी.डी. लाड होते.
ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बॉंबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते.
👉प्रतिसरकार आणि त्यांची विविध दल यांच्या माध्यमातून गावटगे वठणीवर आणले होते.
इंग्रजांना चाढ्या करणारे पकडून यांच्या पायामध्ये पत्रे ठोकले जात. अशी वेगळी शिक्षा या काळामध्ये खूप प्रसिद्ध होती. फितुरी करणाऱ्यावर बसलेल्या ढाकातून या सरकारची पत्री सरकार अशी ओळख झाली होती.
👉प्रतिसरकारच्या माध्यमातून
1.बाजारव्यवस्था,
2.अन्नधान्य पुरवठा,
3.भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना,
4. दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती.
👉या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती.
👉 ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले यशस्वी करून दाखवले.
👉 1500गावात इंग्रजी सत्ता झुगारुन प्रतिसरकार कार्यरत केले होते.
1943 ते 1946 या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे 1500गावांत प्रतिसरकार कार्यरत होते.
👉यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता.
1.त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला,
2. शिक्षण प्रसार,
3. ग्रंथालयांची स्थापना,
4.अंधश्रद्धा निर्मूलन,
5.ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या संघटने मधून
1शाहीर निकम,
2नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.
👉या नाना पाटलांच्या प्रतिसरकार संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.
👉 देशासाठी नाना तुरुंगात गेले
👉1920 ते 1942या काळात नाना 10 वेळा तुरगात गेले.
👉 काही काळ नाना भूमिगत
👉1942 ते 1946 या काळात ते भूमिगतच होते.
👉 इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले होती.
क्रांतीसिंह नानासाहेब पाटील १९४२ ते १९४६ च्या दरम्यान भुमिगत आसताना बऱ्याचदिवस नानासाहेब हे त्यांच्या मित्राच्या घरी म्हणजे वडियेरायबागच्या
कृष्णा पुंडलिक जाधव ( मास्तर ) यांच्या शेतातील वस्तीवर बरेच दिवस तळ ठोकून होते त्यांच्या जेवणाची सोय हि कृष्णा मास्तरांनची मंडळी जनाबाई कृष्णा जाधव या करत आसत व येडे मच्छिंद्रा जवळ ज्या गाड्या लुटन्यात आल्या त्यात नानासाहेबाच्या सोबत कृष्णा मास्तर हि होते. नंतर बरेच दिवस दोघे हि भुमिगत झाले.ते मुंबई मधिल कृष्णा मास्तर यांच्या चाळीतील खोलीत वेशांतर करून ४७दिवस राहिले होते.
जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत.
👉 नाना भूमिकेत असताना त्यांच्या घरावरती इंग्रजांनी जप्ती आणली होती
👉 काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. अशा बिकट परिस्थितीमध्ये इंग्रजांनी त्यांच्या गावाला वेढा घातला. नाना वेशांतर करून आत घुसले. नाना पाटलांनी आपला जीव धोक्यात घालून. अतिशय शिस्तबद्ध व नियोजित धावपळीत सुद्धा आपल्या आई वरती अंत्यसंस्कार केले.
आणि गावावर पडलेल्या वेढ्यातून सुरक्षित बाहेर सुटले.
यानंतर 1946 दरम्यान देशाला स्वातंत्र्य मिळणार याची खात्री झाल्यावर क्रांतिसिंह नानांनी कराड भागात दिसून आले.
👉स्वातंत्र्योत्तर काळ
👉 संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये नानांनी भाग घेतला.
👉 शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षातून सामाजिक काम चालू ठेवल.
👉1957च्या उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील निवडून आले.
👉1968मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून बीड मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.
संसदेमध्ये मराठीतून भाषण करणारे नाना पहिले खासदार होते.
👉संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.
👉स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर इ.स. १९७६ वाळवा मध्ये निधन झाले.
👉मला वाळव्यामधेच दहन करण्यात यावे ही त्याची इच्छा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करण्यात आले.
लेखन माहिती संकलन
नितीन घाडगे.
संदर्भ
https://youtu.be/1PQvK9i-vFU
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित पोवाडा
क्रांतिसिंह नाना पाटील (लेखक : विलास पाटील, क्रांतिवैभव प्रकाशन)
सिंहगर्जना : क्रांतिसिंह नाना पाटील यांची निवडक भाषणे. (संपादकः रा.तु. भगत, क्रांतिवैभव प्रकाशन)
क्रांतिसिंह नाना पाटील आणि शेतकरी चळवळ (लेखक : दिनकर पाटील, कीर्ती प्रकाशन)
क्रांतिसिंह नाना पाटील: चरित्र आणि कार्य (लेखक : दिलीप मढीकर, ललितराज प्रकाशन)
पत्री सरकार : चरित्र, व्यक्तिमत्त्व आणि चळवळ (लेखक : प्राचार्य व.न. इंगळे)
https://youtu.be/1PQvK9i-vFU
Comments
Post a Comment