सरदार इंद्रोजी कदम
१६७२
पन्हाळयापासून मिरजे पर्यंतचा सर्व भाग शिवाजी महाराजांनी जिंकला. या नंतर मुसलमान सरदार विजापुरास निघून गेले. तेव्हापासून या भागाची सरदारकी मिरजेचे सरदार कदम यांच्याकडे होती.
१७३० बाजीराव बल्लाळ पेशवे यांनी मिरजेचे सरदार इंद्रोजी कदम यांच्या पागेची फडणीशी गोविंद हरी पटवर्धन यांना दिली.
१७३६ सरदार इंद्रोजी कदम हे दिल्लीवरील मोहिमेत कामास आले. पुणं मुक्कामी त्याची मोठी पागा होती. आजही या पागेला `हुजूर पागा' असे नांव आहे.
१७४१ सरदार इंद्रोजी कदम यांच्या पागेची सरदारकी गोविंद हरी पटवर्धन यांना देण्यात आली.
- इंद्रोजी कदम सध्याचे साप ता. रहिमतपूर येथील सरदार होते.
संदर्भ
१) मराठी रियासत - गो. स. सरदेसाई २) मराठी दप्तर रुमाल पहिला - वि. ल. भावे ३) थोरले शाहू महाराज - मल्हार रामराव चिटणीस ४) छत्रपती थोरले शाहू महाराज - आसाराम सौदाणे
- छत्रपती थोरले शाहूमहाराज यांचे चरित्र ( चीं ग गोगटे )
५) शाहू गौरवग्रंथ
Comments
Post a Comment