बाबर घराणे

👉बाबर

👉वंश - सूर्य वश 

गोत्र: - भारद्वाज,

देवक : - सोने, कळंब, हळद, केट्की, कबीले

 देवदेवता: - तुळजापूरची भवानी देवी.

आडनाव: घथोड, चिंचपरे, चिंचधर, चिंचळारे, चिंचुरकर, चिरंजीव, चिरायु, धिमेदे, धोंब, नरे, हिरे, नाट्रेके, नववडे, निकम, निदर, निखेश, निग्र्रुप, पाटणवार, परवल, पगधुणे, पिवल, पोट्ट, बारबुधे, बाबर, बोरुकुट, बोचे, बोधकर, महाकाका, मंडीसुर, रावतकर, वालूवे, वेजोंडे, सेल्कर, पोटनिस, पॉशिंद, जंजीन (एकूण 36)


मराठा बाबर घराणे 


👉छत्रपती शिवराय महाराजांच्या कार्यकालात देखिल बाबर घराण्याच्या पराक्रमाच्या नोंदी आहेत. 

👉सांगोला तालुक्यातील सोनंद व डोंगरगाव या गावातील बाबर घराण्याने मराठा स्वराज्यात १८ व्या शतकात मोठा पराक्रम केला. सतत ३० वर्षाच्या कालात स्वराज्याची सेवाच केली. या घराण्याची पराक्रमाची गाथा सुरु होते पहिले बाजीराव पेशवे यांच्या मृत्युपासुन! पेशवे दप्तर ३८ मध्ये गोविंदराव बाबरांचे एक पत्र ता२५ अॉगस्ट सन १७६१ चे नमुद झाले आहे. हे पत्र गोविंदराव यानी पहिले माधवराव पेशवे याना लिहिले आहे. या पत्रावरुन तसेच पेशवा दप्तर खंड ४५ मधिल माहितीवरुन डोंगरगाव सोनंद घराण्यातील पराक्रमी वीरांची रांगच नजरेसमोर उभी राहते.

1महिपतराव बाबर,

2लिंबाजी बाबर,

3गोविंदराव बाबर, 

4सुलतानजी बाबर,

5गंगाजी बाबर अशी होय. नानसाहेब पेशव्यानंतर पेशवाईचे वस्त्र छत्रपती कडुन माधवरावाना मिलाली. 

   १४ जानेवारी १७६१ चे पानिपत युद्धात सोनंद डोंगरगावचे

1 महिपतराव बाबर,

2.लिंबाजी बाबर,

3.गोविंदराव बाबर आपले पथकानिशी हजर होते.

बाबराचे पथक हे पेशव्यांच्या हुजुरातील महत्वाचे पथक होय.या संग्रामात 1.महिपतराव व 2लिंबाजी बाबर ऐनवेली घोडा ठार झाल्याने पाय उतार होऊन लढताना भाऊसाहेब पेशव्यासोबत शहिद झाले. भाऊसाहेबाच्या बखरीत याचे वर्णन आहे. 


   माधवरावानी पेशवे पद स्विकारल्यानंतर हैद्राबादचा निजाम पुण्यावर चालुन आला त्यासमयी माधवराव पेशव्यानी गोविंदरावास त्यांच्या फौजफाट्यासह पुण्यास येण्यासाठी पत्र पाठवले. या पत्रास गोविंदरावानी २५ अॉगस्ट १७६१ रोजी उत्तर दिले ते मुल पत्रच पेशवे दप्तर खंड ३८ मध्ये आहे. त्यावरुन बाबरांच्या मागिल वीस वर्षाचा इतिहासाचा आलेखच आपले नजरे समोर येतो. इ सन १७४० ते १७६१ दरम्यानचा पराक्रमी लढवय्या पुरुषांचा चालता बोलता इतिहासच म्हणावा लागेल. 

 नानासाहेब पेशव्याच्या उत्तरेत चार वेला स्वार्या झाल्या , या प्रत्येक स्वारीत बाबरांचे पथक होते.शाहु महाराजांच्या आज्ञेप्रमाणे अब्दालीचे दिल्लीवरील संभाव्य स्वारीचे प्रतिकारासाठी पेशवा दिल्लीस गेला. त्या हुजुरातीचे पथकात बाबर होते. 

सांगोला युद्धात देखिल बाबराचे पथक होते.

  गोविंदरावानी पाणीपतवर जण्याअगोदर पेशवे भरपाई करतील म्हणुन ६०००० चे कर्ज घेतले होते,परंतु पेशव्याकडून ती भरपाई झाली नाही.या संदर्भाचा देखिल पत्रात उल्लेख आहे.माधवराव पेशव्यानी पुढील कालात हैदर अलीवर पाच वेला स्वार्या केल्या .फौजेसह पेशवा दक्षिणेत जात असता गोविंदराव बाबरांच्या भावनांची कदर ठेऊन २४मे १७६५ रोजी हे पेशवे सोनंद गावी मुक्कामी असल्याची नोंद मिलते. 

 इ सन १७६९ नतर उत्तरेकडील जाट,रोहिले ,पठाण हे वरचेवर प्रबल होत होते. त्यानी बलकावलेला प्रदेश पुन्हा मिलवण्यासाठी रामचंद्र गणेश कानडे या मराठा सरदाराच्या हाताखाली उत्तरेकडे मराठा फौज रवाना केली. त्यात विसाजी कृष्ण बिनीवाले यांची करभारी म्हणुन नेमणुक केली. तिकडे शिंदे होलकरांची प्रत्येकी १५००० ची फौज होती.या कानडे यांच्या यावेलच्या फौजेत गोविंदरावांचे पथक होते.

 झाबेताखान शुक्रतालच्या किल्लायावरुन पलुन पथ्थरगडावर आला,मराठा सैन्याने या कील्ल्यास वेढा देऊन बसले या वेढ्यात गोविंदराव बाबर,सुलतानजी बाबर व गंगाजी बाबर यांचे पथक होते. या वेढ्यातील खास चौकी ची महत्वाची जबाबदारी गोविंदराव बाबर यांच्याकडे होती. या समयी मराठा सैन्यानी या गडावरील नजिबाची संपत्ती तर घेतलीच,परंतु पानिपतावरुन शत्रुने पलवुन नेलेल्या मराठ्यांच्या काही बायकांची सुटका केली.यात बाबर घराण्याचे महत्वाचे योगदान आहे.

👉 अशा पराक्रमी बाबर घराण्याच्या गावी आज त्यांची ढासलेली गढी,व पानिपतावर शहिद झालेल्या सरदार महिपतराव बाबर व सरदार लिंबाजी बाबर यांच्या समाध्या,सतिशिला मंदिर या ऐतेहासिक वास्तु तग धरुन आहेत...

👉छत्रपती शिवराय महाराजांच्या कार्यकालात देखिल बाबर घराण्याच्या पराक्रमाच्या नोंदी आहेत. 


👉संदर्भ:-

1.पेशवे दप्तर ३८ मध्ये गोविंदराव बाबरांचे एक पत्र ता२५ अॉगस्ट सन १७६१ चे नमुद झाले आहे. हे पत्र गोविंदराव यानी पहिले माधवराव पेशवे याना लिहिले आहे. या पत्रावरुन तसेच पेशवा दप्तर खंड ४५ मधिल माहितीवरुन डोंगरगाव सोनंद घराण्यातील पराक्रमी वीरांची रांगच नजरेसमोर उभी राहते.

2भाऊसाहेब पेशव्यासोबत शहिद झाले. भाऊसाहेबाच्या बखरीत याचे वर्णन आहे. 


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४