अपरिचित देशभक्त शेषराव घाटगे
👉देशभक्त शेषराव घाटगे यांनी आपल्या पत्नीला लिहिलेल्या पत्रांमधून तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो. त्यातील अनेक प्रसंग समाजाला मूल्यांची शिकवण देतात
👉शेषराव घाटगे यांच्या आयुष्याची चित्तरकथा मोठी रोमांचकारक आहे. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करूनही त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली.
👉 पार्श्वभूमी
घाटगे यांचे घराणे कर्नाटकातील बिदर जिल्ह्याच्या कल्लूर तालुक्यातील उडमनळीचे. शेषराव यांचे पूर्वज प्रारंभी सांगली जिल्ह्याच्या विटा गावाजवळील सोन्याची वाडी येथे स्थलांतरित झाले. पंरतु त्या घराण्यातील दौलतराव अमृतराव घाटगे हे विट्याला दुष्काळामुळे रोजगाराची भ्रांत निर्माण झाल्याने रोजगाराच्या शोधात अमरावतीला गेले.
त्यांच्या तीन पिढ्या मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाईत गेल्या. दौलतराव घाटगे यांचे भाऊ पिराजी हे पुढे मूर्तिजापूरला स्थायिक झाले. पुढील पिढीने धुळे येथे स्थलांतर केले तर शेषराव यांची तिसरी पिढी डॉ. विजय श्रीकांत घाटगे, राजेंद्र श्रीकांत घाटगे हे गंगा-गोदावरीच्या सान्निध्यात नाशिक क्षेत्री 1980 पासून स्थायिक झाले आहेत.
👉शिक्षणासाठी कोलकत्ता येथे गेले
शेषराव यांची चरित्रसाधने काळाच्या ओघात गडप झाली असली तरी त्यांनी पत्नीला लिहिलेली प्रेमपत्रे त्यांच्या वारसांनी जतन करून ठेवली आहेत. त्यातून पत्निवियोगाचे दुःख तीव्रतेने व्यक्त होते. शेषराव तरुण वयात कोलकाता येथे ‘दंतरोग चिकित्सा’ अभ्यासक्रमासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी पत्नीशी पत्ररूप संवाद केला.
👉 कलकत्ता येथे स्वातंत्र्य चळवळीच्या रान पेटले होते.
याच काळामध्ये शेषराव घाटगे यांचा संबंध क्रांतिकारकांशी सर्वांशी आल्यामुळे देशामध्ये परकीय सत्ता राज्य करत असताना. शिकून मोठे होऊन पैसे कमवून काही उपयोग नाही. त्यांनी डेंटल कॉलेज प्रथम वर्ष चांगल्या मार्गाने पूर्ण करून. शिक्षण अर्धवट सोडून गावाकडचा रस्ता धरला. आणि थेट स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला.
👉गावाकडे येऊन स्वातंत्र्य चळवळीत स्वतंत्र प्रेमींचे संघटन करून. गावा गावामध्ये तरुणांचे संघटन केले.हनुमान व्यायाम शाळा. वार्षिक उत्सव लाला लजपतराय स्मृति सभा घेऊन अशा स्वतंत्र प्रेरक कार्यक्रमाचा सपाटाच लावला होता.
👉दरम्यान अशी विविध उपक्रम राबवत असताना 1937साली अचलपूर गिरणी कामगारांसाठी आंदोलन केल्यामुळे यांना या काळामध्ये सहा महिन्याची जेल झाली होती.
👉 महात्मा गांधीच्या मीठाचा सत्याग्रह काँग्रेस पुरस्कृत विदर्भ प्रांतिक शेतकरी परिषदेत ते मंत्री होते.
नगर कांग्रेस कमेटी वर अध्यक्ष होते. पुढे काम करत असताना सत्याग्रहाच्या जनजागृती मोहिमा तसेच प्रचार दौरा. माध्यमातून त्यांनी भाषणांचा सपाटा लावला होता.
👉विदर्भ परिसरामध्ये शेषराव घाटगे यांनी शेतकरी नोकरदाचावर्गाचा मोठा जनाधार निर्माण केला होता.
त्यामुळे इंग्रज सरकारने यांचा धसकाच घेतला होता. इंग्रजांनी पुढे त्यांना तहसीलदारपदी नोकरी देण्याची ऑफर दिली होती. परंतु देशभक्त शेषराव घाटगे यांनी ती झुगारून लावली.
मात्र ऑफर झुगारून लावून त्यांनी इंग्रज सरकारला त्या भागांमध्ये सोळो पळो करून सोडले.
👉देशासाठी हुतात्मा पत्कारले
त्यामुळे 10 ऑक्टोंबर 1945 रोजी येथील राष्ट्रीय परिषदे वरून शेंदुरजना घाटामध्ये जात असताना. इंग्रजांच्या सैन्यांनी सैनिक ट्रक नाही पाटला करून.
जुरड ते वरुड दरम्यान दमणी येथे इंग्रजांनी त्यांच्या अंगावर ट्रक घालून हत्या केली.
👉 उपलब्ध छायाचित्रे आणि प्राथमिक साधने यांतून ते अमरावती जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्यात पुढे आलेले दिसून येतात. महात्मा गांधी यांनी ‘हनुमान व्यायाम शाळे’स भेट दिली, तेव्हा ते अन्य मित्रांसह गांधींजींच्या जवळ उभे होते. शेषराव हे अमरावतीत झालेल्या मिठाच्या सत्याग्रहातही होते.
👉 पत्नीला लिहिलेल्या पत्रांमधून शेषराव यांच्या मनाचे दर्शन घडवते.
शेषरावांच्या पत्राचा प्रारंभ ‘चिरंजीव सौभाग्यवती वज्रचुडेमंडित लाडके’ अशा ऐतिहासिक पद्धतीच्या शैलीने होतो. ते पती-पत्नी संवादाचे महत्त्व पत्नीला सांगत राहतात. पत्रे दीर्घ स्वरूपाची आहेत. मराठी मानसही त्या पत्रांतून समोर येते. त्या काळात व्यक्ती किती प्रमाणात समष्टीचा विचार करत होती हेही दिसून येते.
👉महाराष्ट्रीय समाजावर स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, शरदश्चंद्र बोस, सुभाषचंद्र बोस, अरविंद घोष या बंगाली बाबूंचा जसा प्रभाव त्याकाळी होता तसाच टिळक, आगरकर, महात्मा गांधी, लाला लजपतराय क्रांतिसिंह नाना पाटील यांचाही होता. ते शेषरावांच्या पत्रसंवादातून ठळकपणे दिसते. ते इतिहासकालीन मराठा स्त्रियांचा गौरव करताना कस्तुरीबाई गांधी, रमाबाई रानडे यांचा आदर्श पत्नीसमोर ठेवतात. शेषराव सुधारणा चळवळीला अनुकूल दिसतात. त्यांना क्रांतिकारक आणि सुधारक यांचे आकर्षण होते असेही दिसून येते.
👉शेषराव साम्यवादी चळवळीत असल्याचेही जाणवते, पण ती साधने दुय्यम स्वरूपाची आहेत. त्या काळात विदर्भात साम्यवादी चळवळ नुकती सुरू झाली होती. कम्युनिस्ट पक्षाची शाखा नागपूर येथे 1935 मध्ये स्थापन झाली. कम्युनिस्ट पक्ष अमरावती जिल्ह्यात कायदेशीर 1941 मध्ये झाला. श्रीपाद अमृत डांगे यांच्यापासून अनेक कम्युनिस्ट कार्यकर्ते स्वातंत्र्यलढ्याला अनुकूल होते. अनेक कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी 1942 च्या ‘चलेजाव आंदोलना’त सहभाग घेतल्याचे तत्कालीन पोलिस रिपोर्टवरूनही दिसून येते. साम्यवादी, समाजवादी विचारांची माणसे काँग्रेसअंतर्गत काम करताना दिसतात. शेषराव घाटगे यांचा कल कम्युनिस्ट विचारांकडे काही काळ होता. मात्र ते स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसच्या वीर वामनराव जोशी यांच्याबरोबर दिसतात असे आढळून येते.
👉शेषरावजी घाटगे यांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान प्रशंसनीय आहे.
या कार्यात मोलाची साथ देणारी संसाराचा रथ ( सोबत व ) समर्थपणे ओढणारी अर्धांगिनी श्रीमती लक्ष्मीबाई यांचा वाटा तेवढाच मोलाचा .
👉शेषराव घाटगेंसारख्या स्वातंत्र्यकाळात कार्य करणार्या अनेक नायकांची कथा लोकांसमोर येणे महत्वाचे आहे
लेखन &माहिती संकलन
नितीन घाडगे
👉संदर्भ -1) अमरावती जिल्हा कम्युनिस्ट चळवळीचे सिंहावलोकन, एन.डी. मंगळे, सचिव-भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जिल्हा कमिटी, अमरावती 2) तत्रैव : पृष्ठ-30. 3. देशभक्त शेषराव घाटगे – लेखक : शंकर बोऱ्हाडे
विविध वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्याविषयी अनेक लेख छापून आलेले आहेत.
Comments
Post a Comment