श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाची* 🔱 *दत्तगुरुंच्या चरणाशी* 🔱 *श्री क्षेत्र कारंजा येथून*

🚩⚜🚩🔆🕉🔆🚩⚜🚩

           🌻 *आनंदी पहाट* 🌻

  *श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाची*

      🔱 *दत्तगुरुंच्या चरणाशी* 🔱
           *श्री क्षेत्र कारंजा येथून*

⚜🌹⚜🌹🙏🌹⚜🌹⚜

        *विश्वाव्यापक तूंचि होसी ।*
        *ब्रम्हा विष्णू व्योमकेशी ॥*
        *धरिला वेष तू मानुषी ।*
        *भक्तजन तारावया ॥*
        *.. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज*

        *कारंजा हे विदर्भातील तीर्थक्षेत्र. श्री दत्तगुरुंचा श्रीपाद श्रीवल्लभ यानंतरचा अवतार म्हणजे नृसिंह सरस्वती, कारंजा हे त्यांचे जन्म स्थळ.*
        *केवळ दुःखातच नाही तर सुखाचाही अतिरेक झाला की समाजात स्पर्धा वाढते.. कलह वाढतात.. विवेक बुद्धी नष्ट होत मानवी मन भरकटू शकते. पण भारतीय संस्कृतीत मानवी मन संसारात कधीच विमनस्क.. उदास.. सैरभैर होत नाही..भरकटत नाही. याउलट ते प्रफुल्लीत असते ते ईश्वरी भक्तीत रममाण असल्याने. मनात हा भक्तीभाव रुजविण्याचे.. दिशा देण्याचे कार्य श्री गुरुदेव दत्तांच्या अवतारांनी केलेय.*
        *जन्मताच ॐ चा उच्चार करणारे नरहरी.. नृसिंह सरस्वती. जे आठव्या वर्षी तीर्थाटनाला निघाले आणि काशीहून सन्यस्त होवून आले. सात शिष्यांना दिक्षा दिली. त्यांनी वास्तव्य करुन लोकांचा उद्धार केलेल्या कारंजा.. औदुंबर, नरसोबावाडी.. गाणगापुर येथे भक्त दत्त दर्शनार्थ.. अनुष्टान.. जप तप.. उपासना.. पारायण यासाठी मोठ्या संख्येने येतात. ७५ वर्षे नृसिंह सरस्वतींनी देशभर जी भक्ती मार्गाची शिकवण दिलीय त्याचे प्रत्यंतर या भक्तांकडे बघून येते.*
        *नृसिंह सरस्वतींची भगवी वस्त्र.. गळ्यात रुद्राक्ष माळा.. हातात कमंडलू.. कपाळावर भस्म.. मुखावरचे स्मितहास्य.. ते तपश्चर्येचे तेज असे शांततामय आश्वासक भाव बघून बघणाऱ्याचे सात्त्विक भाव जागृत होतात. प्रसन्न मन भक्तीत एकाग्र होते.*
        *औदुंबर वृक्ष, जो उग्रता.. दाह नष्ट करणाऱ्या २१ औषधी गुणांसाठी प्रसिद्ध आहे.. ज्याला विष्णूंच्या आशीर्वादाने बारा महिने फळे येतात.. ज्या वृक्षा खाली नृसिंह यांनी मंत्र उपासना केली म्हणून त्यांचे अस्तित्व असलेला दर्शनासाठी.. प्रदक्षिणेसाठी पवित्र वृक्ष.*
        *दया, क्षमा, शांती आणि औदार्याचे प्रतिक म्हणजे श्री दत्तगुरु. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या औदुंबरात वास करतात, त्या वृक्षाच्या केवळ दर्शनानेही मन प्रसन्न होते कारण त्यात दत्त दर्शन होते. मग ती श्यामल मूर्ती बघून भक्त सुखावतो. अपार विश्वासाने त्याचेच चरण धरावे. या दयाधनाच्या कृपेचे वर्णन करावे तेवढे कमीच.*
        *भगवंत दर्शनासाठी जीव कासावीस असा की जसा मासा पाण्यावाचून तडफडावा, तसा मी या श्रीदत्तगुरुंच्या दर्शनासाठी व्याकूळ झालो आहे. मला त्या ब्रह्मा.. विष्णू.. महेश स्वरुप श्रीदत्तगुरुंचीच आठवण अस्वस्थ करीत आहे. मी सतत त्याचेच नाम घेत आहे.. "श्रीगुरुदेव दत्त.. !!"*
     
🌷🌿🌷🔱🙏🔱🌷🌿🌷

  *_दत्तराज पाहुनी आज_*
  *_तुष्टलो मनी_* 

  *_औदुंबरी नित्त्य वसे,_*
  *_भक्तकाम पुरवितसे_*
  *_कमलनयन श्याम दिसे,_*
  *_धन्य तो जनी_*

  *_अनुसूया ज्याची माय,_*
  *_दृढ धरिले ज्याचे पाय_*
  *_त्याचे चरित्र वर्णू काय,_*
  *_सकळ तो जनी_*

  *_विनायक दास दीन,_*
  *_जळाविणा जैसा मीन_*
  *_ब्रह्मा-विष्णु-महेश तीन_*
  *_आठवी मनी_*

🌸🍃🥀🌿🌸🌿🥀🍃🌸

  *गीत : पारंपारिक*  ✍
  *स्वर : आर. एन्. पराडकर*

  🎼🎶🎼🎶🎼   🎧

  *!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!*

    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
                *०४.१२.२०२२*

🌻🍃🥀🔆🌸🔆🥀🍃🌻

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४