आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*४ डिसेंबर १६७३*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ डिसेंबर १६७३*
छत्रपती शिवाजी महाराजांनी कारवार जिंकले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ डिसेंबर १६७९*
शंभूराजे अखेर पन्हाळ्याला परतले.
औरंगजेबाने दिलेरखानाला गुप्तपणे निरोप पाठविला की, "शंभूराजेला कैद करुन दिल्लीला पाठवा...!" अन् ही बातमी खुद्द संभाजीराजांना समजली...! संभाजीराजांनी ठरवलं इथून निसटायचं. अखेर येसूबाईसाहेबांनी पुरुषाचा पोषाख केला आणि रात्रीच्या अंधारांतून शंभूराजे सहकुटुंब पळाले (दि.२० नोव्हेँबर १६७९). त्यांनी तडख विजापूर गाठले. तिथून पुढे महाराजांकडून न्यायला आलेल्या मंडळींस येऊन सामील झाले (दि.३० नोव्हेंबर १६७९). तेथून तडक लांबच्या दौडी मारत दि.४ डिसेंबर १६७९ ला शंभूराजे अखेर पन्हाळ्याला येऊन दाखल झाले. संभाजीराजे परत आलेले ऐकून महाराजांस अत्यंत आनंद झाला. ते युवराजांना भेटायला पन्हाळगडास निघाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ डिसेंबर १६८०*
सुरतेहून इंग्रजांच्या दुसऱ्या एका वखारीला लिहिलेल्या पत्रातून संभाजीच्या सैन्याचा त्यांनी धस्का घेतल्याचे दिसते. बहादुरखानचे मुघल सैन्य ह्या काफिल्याजवळपास असल्याने बहुदा माल सुरक्षितपणे पोहोचेल असे त्यांनी म्हटले आहे.
२५ नोव्हेंबरचे तुमचे पत्र आम्हाला प्राप्त झाले. बहादुरखान तुमच्या जवळपास असल्यामुळे संभाजीच्या सैन्यापासून तुमचे संरक्षण होईल हे वाचून बरे वाटले. तरी तुम्ही घाई करून तुमचे काफिले लवकरात लवकर पाठवण्याचा प्रयत्न कराल ह्याची खात्री आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ डिसेंबर १६८२*
रणमस्तखानाने कल्याण काबीज केले. मराठ्यां जवळ १०,००० घोडेस्वार आणि १२,००० पायदळ असल्याची बातमी रणमस्तखानाला समजली. पुन्हा ४ डिसेंबर, १६८२ रोजी मराठयांशी सामना झाला मोघलास विजय मिळाला, तसेच मराठ्यांचा वितंगा या गडाच्या वाडीला खानाच्या सैनिकांनी आग लावली… असे तो आपल्या बातमी पत्रातून औरंगजेबास कळवितो. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ डिसेंबर १७२७*
थोरला बाजीराव पूर्णा परळी प्रांतात आले. पुढे ६ डिसेंबर पौष शु. ५ कसबे नरसीक, ८ डिसेंबरला वाशिम जिल्हा अकोला, ९ डिसेंबरला तालुका मंगळूरपीर जिल्हा अकोला, १० डिसेंबर ला हातगाव, ११ डिसेंबर ला मांजराखेड. तालुका चांदूर जिल्हा अमरावती हे सगळे प्रांत लुटून उध्वस्त केले. म्हणजे डिसेंबर च्या ह्या प्रारंभीच्या काळात राऊ नी तुफानी घोड-दौड करून वाशीम,माहूर, मंगळूरपीर तालुके धुळीस मिळवले. मग अचानक वायव्येस शिरले आणि चोपड्यानजीक तापी उतरून १८ डिसेंबर १७२७ रोजी पौष वद्य प्रतिपदेला कुकरमुंड्या जवळ कुसुंबी प्रांतात आले. तेथून निजामाच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या हेतूने बऱ्हाणपूर जाळण्याची हूल उठवून दिली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ डिसेंबर १७४८*
पोर्तुगीजांनी निवतीवर हल्ला.
निवती गड तसा छोटा आहे. उंचीनेही छोटा आहे, पण छान आहे. गडासंबंधी जास्त काही ऐतिहासिक माहिती वाचायला मिळत नाही. शिवकाळानंतर हा किल्ला १८ व्या शतकामध्ये सावंतवाडीच्या सावंतांकडे होता. ४ डिसेंबर १७४८ रोजी पोर्तुगीजांनी निवतीवर हल्ला चढवला. पोर्तुगीजांच्या पदरी नोकरीस असलेल्या इस्माइल खान नावाच्या कॅप्टनने शौर्याची कमाल करून सावंतांकडून हा किल्ला जिंकून घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ डिसेंबर १७९१*
बिजेसिंगाने इस्माईल बेगास वेगवेगळ्या ठिकाणाहून खंडणी गोळा करण्यास पाठवले. त्याने गायकवाडांच्या मुलखात धुमाकूळ घातला नाना फडणिसाने बेगाचा बंदोबस्त करण्या विषयी महादजीस लिहिले. इ.स.१७९१ च्या पावसाळ्यात महादजी बेगाच्या पाठी पार नाथद्वार चित्तोड पर्यंत चालून गेले... बेग पळून जयपुरास गेला. महादजींनी बिजेसिंगास दरडावून इस्माईल बेगाचा एक आधार तोडला खंडेराव हरी या शिंद्यांच्या एका सेनापतीने कानोडच्या किल्ल्याला मोर्चे लावले होते किल्ल्यात नजफकूली खानाची बेगम होती
इस्माईल बेग हा पहाडी बाजुने कानोडच्या किल्ल्या जवळ आला ४ डिसेंबर १७९१ रोजी खंडेराव हरी आणि बेगाची फौज यात मोठी लढाई झाली त्यावेळी खंडेराव हरी ला कुमक मिळाली बेग कानोडच्या किल्ल्यात जाऊन लढाई करू लागला...
एप्रिल १७९२ ला लखबादादा लाड याने इस्माईल बेगास कैद केले आणि कानोडचा किल्ला ही ताब्यात घेतला. इस्माईल बेग पुढे १७९९ मध्ये मरण पावला...

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ डिसेंबर १९२४*
मुंबईतील ’गेटवे ऑफ इंडिया’चे उद्‍घाटन झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ डिसेंबर १९७१*
आज भारतीय आरमार दिन
४ डिसेंबर इंडियन नेव्ही डे म्हणजे भारतीय नौदल दिन म्हणून ओळखला जातो. १९७१ साली भारताच्या नौदलानं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात आला , विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीचं नाव होतं ऑपरेशन ट्रायडण्ट. ४ डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. या कामगिरीला सलाम म्हणून भारतीय नौसेना नेव्ही डे साजरा करते.
भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज.
"आरमार उभारणी"
इ.स. १६५९ पासुन छत्रपती शिवरायानी आरमार तळ उभारण्यास सुरूवात केली. पश्चिम किनारपट्टीवर विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग बांधले. मालवणचा सिंधुदुर्ग तर जलदुर्गाचे आश्चर्य म्हणावे लागते कारण तो एवढा अचुक व मजबुत बांधला आहे.
आरमाराची यादी चित्रगुप्ताच्या बखरीत दिली आहे त्यात
"थोर गुराबा ३०, गलबते १००, महागिर्या १५०, लहान गुराबा ५०, होड्या १०, लहान होड्या १५०, तारवे ६०, पाल १५, जुग १५, मचवे ५०. एवढी होती.
इंग्रजानीही स्वराज्याच्या आरमाराच्या याद्या वेळोवेळी लिहुन ठेवलेल्या आढळतात. त्यावरून स्वराज्याचे आरमार कारवार पर्यंत गेले तेंव्हा त्यात एका डोलकाठीची ३० टनापासुन १५० टनापर्यंत वजनाची ८५ जहाजे व तीन अतिमोठी जहाजे होती. म्हणून आधुनिक भारताशी अनुबंध असणारा, समुद्र व आरमाराचा गंभिरपणे विचार करणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच म्हणावे लागेल.
तसेच पहिले आरमारप्रमुख सरखेल "कान्होजी आंग्रे" होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४