आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२८ डिसेंबर १६५९*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२८ डिसेंबर १६५९*
मिरजेनजीक छत्रपती शिवाजी महाराजांनी रूस्तुमेजमान व फाजलखान यांचा सणसणीत पराभव केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२८ डिसेंबर १६६८*
शिवछत्रपतींच्या नंतर प्रकाशित झालेले एक पत्र
हे पत्र मोरोपंत पेशव्यांना २८ डिसेंबर १६६८ रोजी लिहिलेले आहे. हे पत्र पंताजी गोपीनाथ बोकील यांना मांडकी आणि भवाळी या गावांमध्ये असणारे इनाम सुरु ठेवण्याबाबत आहे. रोजी लिहिलेले आहे. हे पत्र पंताजी गोपीनाथ बोकील यांना मांडकी आणि भवाळी या गावांमध्ये असणारे इनाम सुरु ठेवण्याबाबत आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२८ डिसेंबर १६७८*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक मंत्री दत्ताजी पंत वाकनिस हे मृत्यू पावले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२८ डिसेंबर १६७८*
"महाराजा जसवंत सिंह" यांचा पेशावर येथे मुत्यु.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२८ डिसेंबर १६८२*
ऑक्टोबर १६८२ मध्ये मुघल सैन्याने कल्याण भिवंडीला वेढा दिला होता. मुघलांनी सर्वत्र आक्रमक पवित्रा घेतला होता. अश्या वेळी जर सिद्दी, मुघल आणि इंग्रज एक झाले तर स्वराज्याला धोका निर्माण झाला असता, त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंनी आपले वकील प्रल्हादपंतांना इंग्रजांशी मैत्री राखण्यासाठी त्यांच्याकडे पाठवले होते. पण २ महिने मुंबईत मुक्काम करूनही सुरतकर इंग्रजांनी आपला वकील आणि शंभुराजेंच्या साठी भेटवस्तू न दिल्यामुळे प्रल्हादपंत तिथे अडकून पडले होते. याच सुमारास मुंबईत असलेल्या सिद्दीची मराठी मुलखात लूटमार सुरूच होती. मुघल आरमार मुंबईत येणार असल्याने सिद्दीने आपले आरमार मुंबईकरांच्या तोफांच्या टप्प्याबाहेर नांगरले होते. याच काळात "सिद्दीने पेन येथे लूटमार करून २०० माणसांना कैद केले होते,व जखमी लोकांना माजगाव येथे टाकले होते. सुरतकर इंग्रज या गोष्टीचा काहीच बंदोबस्त करत नव्हते.अश्या परिस्थितीत संभाजीराजेंकडून चांगली मैत्रीची वागणूक मिळणार नाही असे मुंबईकरांनी सुरतकराना बजावले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२८ डिसेंबर १९२६*
बालक्रांतिवीर हुतात्मा शिरीषकुमार जन्मदिन
नंदुरबारमध्ये बाळा शंकर इनामदार नावाचे एक व्यापारी होते. त्यांचा तेलाचा व्यापार होता. त्यांना मुलगा नसल्याने ते काहीसे दु:खी होते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी दुसरा विवाह केला. त्यांना कन्याप्राप्ती झाली. ही कन्या त्यांनी पुष्पेंद्र मेहता यांना सोपवली. १९२४ ला पुष्पेंद्र व सविता यांचा विवाह झाला. २८ डिसेंबर १९२६ ला या दांपत्याच्या पोटी, मेहता घराण्यात शिरीषकुमारचा जन्म झाला. या काळात देशातील अन्य गावे व शहरांप्रमाणेच नंदुरबारचेही वातावरण स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेने भारलेले होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सामान्यांनी काय करायचे तर हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रभातफेरी, मशाल मोर्चे काढायचे. देशप्रेमांनी ओतप्रोत घोषणा द्यायच्या! नंदुरबारमधील अशा कामात मेहता परिवाराचा सहभाग होता.
९ सप्टेंबर १९४२ ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवीत शिकत असलेला शिरीष सहभागी झाला होता. गुजराथी मातृभाषा असलेल्या शिरीषने प्रभात फेरीत घोषणा सुरू केल्या, "नहीं नमशे, नहीं नमशे', "निशाण भूमी भारतनु'. भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. शिरीषकुमारच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन झुगारले आणि "भारत माता की जय', "वंदे मातरम्'चा जयघोष सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एका पोलिस अधिकाऱ्याने मिरवणुकीत सहभागी मुलींच्या दिशेने बंदूक रोखली. तेव्हा त्या अधिकाऱ्याला एका चुणचुणीत मुलाने सुनावले, "गोळी मारायची तर मला मार!'. ती वीरश्री संचारलेला मुलगा होता, शिरीषकुमार मेहता! संतापलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या, एक, दोन, तीन गोळ्या शिरीषच्या छातीत बसल्या आणि तो जागीच कोसळला. त्याच्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्यामदास शहा हे अन्य चौघेही शहीद झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment