आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१६ डिसेंबर १६६५*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ डिसेंबर १६६५*
"सरसेनापती नेताजी पालकर" यांनी विजापूरच्या आदिलशहाकडून "खटाव" हे ठाणे जिंकले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇


*१६ डिसेंबर १६६८*
कारवारकर इंग्रजांनी आपल्या बातमीपत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोवा जिंकण्याच्या योजनेची दिलेली बातमी
या नोंदीची तारीख आहे १६ डिसेंबर १६६८.
निरनिराळ्या सबबीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे चार पाचशे लोक गोव्यात घुसून दिले होते. थोड्याच वेळात ही संख्या दुप्पट झाली असती आणि त्यानंतर एका रात्री त्यांनी एकदम उठाव केला असता तर कोणताही दरवाजा ताब्यात घेऊन पोर्तुगीजांनी पुरेसे सैन्य रणांगणावर उभे करण्यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक आज फिरून त्यांनी गोवा काबीज केला असता यात शंकाच नव्हती. परंतु छत्रपती शिवाजी महाराज गोव्यापर्यंत आल्यावर आपला कट उघडकीस आला, आपली लोक पकडले गेले आणि पोर्तुगीज लोकही सज्ज होऊन राहिले हे पाहून मुळचा बेत बदलून त्या भागातील आपल्या किल्ल्यांची तो पाहणी करू लागला. इकडील सर्व मुर्खात सर्व ठिकाणी कडेकोट बंदोबस्त झाला असून आपल्याला प्रवेश मिळणे शक्य नाही असे पाहून रायगडला काही जरुरीचे काम आहे असा बहाणा करून आपले सैन्य घेऊन छत्रपती शिवाजी महाराज परत वळले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ डिसेंबर १६८३*
गोव्याचा व्हॉइसरायचे पोर्तुगलच्या राजास पत्र
मराठ्यांनी चौलासही, रेवदांडा वेढा घातला आहे आणि हा वेढा एवढा जिद्दीने मराठे घालत आहे तो आता जवळ जवळ सहा महिने चालू आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत मराठ्यांनी सहा ते सात हजर शिपाई आणि दोन हजार घोडेस्वार रेवदांडास येऊन वेढा घातला. जुलै १६८३ च्या महिन्यात रेवदांड्यावर हल्ला केला. पण पोर्तुगीजांनी तो उधळून लावला तरीपण मराठे मागे हटले नाही त्यांनी झुंज व लढा चालू ठेवला. यावेळी रेवदांडा येथे पोर्तुगीजांच्या मदतीस सिद्धीचे ४०० लोक आले होते. मराठ्यांनी रेवदंड्यास परत वेढा घातला आणि हि नोंदणी गोव्याचा व्हॉइसराय पोर्तुगलच्या राजास १६ डिसेंबर १६८३ रोजी पत्र लिहिले. 
रेवदंडयाचा वेढा उठावा म्हणून पोर्तुगीजांनी फोंड्यावर स्वारी केली आणि तेव्हा छत्रपती संभाजी राजे फोंड्याच्या मदतीस तातडीने धावून गेले होते. अखेर मराठ्यांनी वेढा उठविला आणि सन १७२३ मध्ये पोर्तुगीजांनी रेवदंडाची दुरुस्ती केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ डिसेंबर १६८६*
१६ डिसेंबर इ.स १६८६ रोजी औरंगजेब गोवळकोंड्याकडे रवाना.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ डिसेंबर १६८७*
सरसेनापती हंबीरराव मोहीते स्मृती दिन
वाई(सातारा) येथे मुघलांसोबत झालेल्या युद्धात हंबीररावांना गोळी लागून ते धारातिर्थी पडले.
मुघल सरदार सर्जाखानासोबत झालेलं हे युद्ध मराठ्यांनी जिंकले होते, त्यानंतर मराठा सैन्याचा आनंदोत्सव सुरू असताना एका लपून बसलेल्या मुघल बारगीरने गोळी झाडली व ती हंबीररावांना लागली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ डिसेंबर १६९१*
स्वराज्यज्योती पेटवण्यास छत्रपती राजाराम महाराज यशस्वी झाले. परिणामी हे मराठा सरदार मोगली छावणी सोडून आपल्या लष्करासह जिंजीत राजेंकडे दाखल झाले हा मोगलांना बसलेला जबरदस्त धक्का होता तरी जुल्फिकार
खानाने जिंजीचा वेढा चालूच ठेवला. तीन किल्ल्यांचा मिळून बनलेला एक अजस्त्र किल्ला जिंजी (कृष्णगिरी, चंद्रगिरी व राजगिरी) जिंकणे सोपी बाब नाही हे खान उमगला आणि बादशहाच्या कानाला लागून त्याने वजीर आसदखान आणि व पुत्र शहजादा कामबक्ष यांच्या समवेत फौजफाटा पाठवून दिला. १६ डिसेंबर १६९१ ते छावणीत दाखल झाले देखील. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ डिसेंबर१६९३*
छत्रपती राजाराम महाराज जिंजीत (कृष्णगिरी, चंद्रगिरी व राजगिरी) होते. जुल्फिकार खानाने जिंजीचा मोर्चा उठवून 
औरंगजेब पुत्र कामबक्ष याला कैद केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ डिसेंबर १७३७*
डिसेंबरचा मध्य चिमाची आपांचे शाहू महाराजांना पत्र आले -
"रायाची पत्रे ४ रमजानची (१६ डिसेंबर) आली. नबाब (निजाम) भूपाळगडी कोंडला आहे. दाणावैरण बंद. असा समय त्यास कधी घडला नाही. अतिसंकटी पडला आहे. त्याचे साहीत्यास औरंगाबादची फौज येणार ती तिकडे गोवून पडावी म्हणजे नबाबाचा पाडाव ऊत्तम होतो. ३ रमजानी एक युद्ध झाले. दुसरे कालही एक जाले. बरासा तमाशा नबाबाने पाहीला. महाराजांचे प्रतापे नबाबावर सलाबत चढली. करोलचा मारा देत आहो. मोगलांचा आरगानरगा (पूर्ण वेढा) केला आहे. दाणा, गल्ला, वैरण, काडी कूल बाद झाली आहे. बंगसाचीच गत यास जाली आहे. स्वामींच्या आशिर्वादे निजाम या ठिकाणी बुडत आहे. अगर सुटका झाली तरी उत्तमच होईल. किल्लेबंद झाल्यामुळे अब्रू राहीली नाही."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ डिसेंबर १९७१*
विजय दिवस
भारत-पाकीस्तान यांच्यात झालेल्या युद्धात भारताने पाकीस्तानला चारीमुंड्या चीत करून सपशेल शरणागती पत्करायला लावली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...