आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१५ डिसेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१५ डिसेंबर १६३८*
कोकणातील बंदरे विजापूरच्या आदिलशहाच्या अधिसत्तेखाली होती. पोर्तुगिजांनी १५ डिसेंबर १६३८ त विजापूरकरांशी तह केला होता. या तहनाम्यास एकंदर बारा कलमे आहेत. अकराव्या कलमान्वये विजापूरकर व पोर्तुगीज यांच्यामध्ये असे ठरले होते की जहाजे, गलबते व होड्या राजेसाहेबांच्या शाही बंदरातून सफर करतील त्यांस पोर्तुगिजांनी मलबारी व इतर यांच्यापासून संरक्षण दिले पाहिजे व त्यास सोबत दिली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी
सर्व प्रकारच्या सवलती दिल्या पाहिजेत आणि ज्या अर्थी पोर्तुगिजांना या तहनाम्याचे पालन करणे अपरिहार्य होते, त्या अर्थी पोर्तुगिजांनी राजेसाहेबांच्या जहाजांना संरक्षणाच्या दृष्टीने अभय दिले व चाच्यांच्या भीतीने विजापूरकरांना सवलत म्हणून आपली जहाजे त्यांच्या प्रदेशात पाठविण्याचे सोडून दिले. विजापूरकर व शिवाजी महाराजांचा यांच्यामध्ये तद्नंतर झालेल्या शांतता करारानुसार (१९ सप्टेंबर १६६१) पोर्तुगिजांचे समुद्रमार्गे त्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या जहाजांना मुक्त वाट द्यावी असे ठरले.


🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१५ डिसेंबर १६६३*
त्र्यंबकेश्वरला दर्शन घेण्यासाठी चाललोय अशी अफवा पसरवून शिवरायांचे राजगडाहून सुरतकडे प्रस्थान
औरंगजेबाच्या फौजेने ३ वर्षे रयत नासवली होती नागवली होती ह्याची भरपाई म्हणून आपल्या राज्याच्या राजधानीपासून ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मोगल साम्राज्याच्या आत घुसून त्यांचे प्रमुख शहर लुटण्याची ही धाडसी मोहीम विजयी करण्यासाठी अतिशय वेगवान व अचूक हालचाली करणे अत्यावश्यक होते. यासाठी मराठ्यांनी फक्त घोडदळ सज्ज केले. १५ डिसेंबर इ.स. १६६३ रोजी ८,००० शिबंदी राजगडावरून सुरुवातीस ईशान्येकडे निघाली. मोगलांच्या ठाण्यांपासून दूर रहात खानदेशातून हे सैन्य तापी खोर्‍यात उतरले. तुफान वेगाने वाटचाल करीत २० दिवसांत मराठे ५ जानेवारी रोजी १० वाजण्याचा सुमारास सुरतेजवळील गणदेवी गावाजवळ आले. तेथून त्यांनी मोगलांच्या सुरतेतील सुभेदार इनायतखान याच्याकडे वकील पाठवून "इनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापार्‍यांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही." असा संदेश पाठवला व त्याच्या उत्तराची वाट न पाहता सुरतेच्या हद्दीवरील उधना गाव गाठले. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१५ डिसेंबर १६८२*
सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि शहजादा आज्ज्म यांच्यात पन्हाळ्याजवळ लढाई.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१५ डिसेंबर १७२०*
निजामाने मराठ्यांच्या प्रदेशात घुसखोरी करून कुरापती काढायला लागला. अखेर मराठे व निजाम यांच्यात औरंगाबाद (म्हणजेच दख्खन मधील मोगली सुभेदाराचे ठाणे) यांच्यात दिनांक १५ डिसेंबर सन १७२० रोजी युद्ध झाले. या युद्धात मराठ्यांनी निजामाचा दारूण पराभव करून निजामास दाती तृण धरावयास लावले. दिनांक ४ जानेवारी सन १७२१ रोजी निजामाने चिखलठाण येथे श्रीमंत पेशवा बाजीराव यांची भेट झाली. निजामाने श्रीमंत पेशवा बाजीराव यांच्या सर्व अटी मान्य करून स्वराज्याचा जिंकलेला सर्व प्रदेश परत केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१५ डिसेंबर १७३७*
मराठ्यांचे आक्रमण हाणून पाडण्याकरता मोठी फौज, जंगी तोफखाना आणि भरपूर खजिना निजामाच्या स्वाधीन करण्यात आला. निजामाची स्वारी पेशव्यांशी निकराचा सामना घेण्याच्या इराद्याने निघाली. पेशव्यांनीही भोपाळनजीक निजामास गाठले. १५ डिसेंबर १७३७ रोजी निजामाचा पराभव झाला. तो भोपाळच्या किल्ल्याच्या आश्रयाला गेला. पेशव्यांच्या फौजेने शत्रूची नाकेबंदी केली. निजामाचे प्रयत्न निष्फळ ठरले. तेव्हा त्याने पेशव्यांच्या मागण्यांस दरबाराकडून मान्यता मिळवून देऊ, या अटींवर संमती देऊन ७ जानेवारी १७३८ रोजी समेट केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१५ डिसेंबर १७४९*
छत्रपती थोरले शाहू महाराज भोसले स्मृतिदिन
(जन्म १८ मे १६८२)
छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता, मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला. सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले. मध्य भारत, उत्तर भारत, माळवा, गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले, मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१५ डिसेंबर १७५९*
अब्दाली सरहिंदहून पुढे सरकल्याचे समजल्यावर दत्ताजीने आपला मुक्काम आटोपता घेत दिल्लीकडे प्रस्थान ठेवले. सरहिंद ते कुंजपुरा हे अंतर सुमारे १२५ - १५० किमी आहे तर शुक्रताल ते कुंजपुरा हे अंतर शंभर - सव्वाशे किमी आहे. अब्दाली कुंजपुऱ्याजवळ यमुना पार करण्याचा प्रयत्न करणार हे दत्ताजीने ताडले व त्या दृष्टीने त्याने आपल्या सैन्याची मांडणी केली. १५ डिसेंबर रोजी त्याने आपल्या लष्कराचे दोन भाग केले. निवडक सडी फौज त्याने आपल्या सोबत ठेवून बाकीचे जड सामान, बुणगे व उर्वरीत पथके जनकोजी सोबत दिल्लीला ठेवले. जनकोजी सोबत गोविंदपंत बुंदेले, सुरजमल जाटाचा सरदार रुपराम कोठारी मोगल वजीर गाजीउद्दिन हे देखील होते. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१५ डिसेंबर १८०३*
१५ डिसेंबर रोजी गाविलगडाचा प्रचंड असा दिल्ली दरवाजा उघडून सरदार बेणिसिंह स्टिव्हनसनवर तुटून पडला. सरदार बेणिसिंह उत्तरेकडे गुंतल्याचे पाहून गव्हर्नर वेलेस्लीने धडक मारली. आणि इंग्रज सैन्य किल्ल्यात घुसले. पराक्रमाची शर्थ करून लढणाऱ्या बेणिसिंहला या लढाईत वीरगती प्राप्त झाली. मात्र उत्तरेकडून नाजूक असलेल्या गाविलगडात, बेणिसिंहला मरण येईपर्यंत स्टिव्हनसनचे सैन्य गडाच्या पायथ्याशी पोहोचू शकले नाही.
अशाही परिस्थितीत बेणिसिंहाच्या कर्तृत्वाचा आणि स्वामीनिष्ठेचा कळस म्हणजे एवढय़ा घनघोर लढाईत गुंतला असतानाही, भोसल्यांचा संपूर्ण खजिना आणि दौलत वस्तापूरमार्गे किल्ले नरनाळ्यावर पोहोचवला. लढाईत कसलेल्या सुमारे १६० स्वामीनिष्ठ भोयांनी हा खजिना तीन रात्रींतून नरनाळ्यावर पोहचवला. एवढे असूनही ताब्यात आल्यानंतर इंग्रजांना गाविलगडावरील तळघरातून ५०० कोटींची लूट मिळाली. शिवाय सुवर्ण पत्रावर लिहलेली कुराणाची प्रतही त्यांनी ताब्यात घेतली. फितुरीचे आर्थिक बक्षिस म्हणून ही कुराणाची प्रत अचलपूरच्या नबाबाला भेट देण्यात आली

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१५ डिसेंबर १८३१*
उमाजी नाईकांच्या जीवनातील काळा दिवस
नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी झाला. इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात उमाजी नाईक यांनीच सर्वप्रथम क्रांतीची मशाल पेटवली. त्यांचे हे पहिले बंड मानले जाते. इंग्रजांची आर्थिक नाडी आवळण्याचा त्यांनी सर्वप्रथम प्रयत्न केला. २४ फेब्रुवारी १८२४ या दिवशी इंग्रजांचा ‘भांबुडा' येथील कडेकोट बंदोबस्तात असणारा खजिना उमाजींनी आपल्या सशस्त्र साथीदारांच्या साहाय्याने लुटला आणि इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले.
याच काळात इंग्रजांनी उमाजी नाईक यांना पकडण्याचा आदेश दिला. उमाजी नाईक यांना पकडून देणार्‍यास १० सहस्र रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले. लोकांना एकत्र करून आणि गनिमी काव्याने युद्ध करत इंग्रजांसमोर मोठे आव्हान उमाजींनी निर्माण केले. १५ डिसेंबर १८३१ हा उमाजींच्या जीवनातील काळा दिवस ठरला. भोरमधील एका खेडेगावात त्यांना पकडून इंग्रज सरकारने उमाजींच्या विरोधात न्यायालयात खटला भरला. राजद्रोह, देशात बंडाळी माजवणे, असे दोषारोप ठेवून त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१५ डिसेंबर १८५७*
 कोल्हापूरकरांचे १८५७ मधील बंड
उत्तरेत जसा इंग्रजांविरूध्दच्या बंडाचा रेटा अधिक होता त्या प्रमाणे दक्षिणेत ही बंड चालूच होते. 
कोल्हापूरच्या राजापेक्षा त्यांचा धाकटा भाऊ चिमासहेबाने बिघडलेली घडी पुन्हा बसविण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या खाजगी सैन्यात इतर लढ्वय्यात फारच कसोशीने गुप्त तयारी चालविली व ता.१५ डिसेंबर १८५७ च्या पहाटे कोल्हापूर शहर पुन्हा एकदा बंड करून उठले. शहरातील तोफा मोर्चावर उभारल्या गेल्या. दरवाजे बंद झाले व जिकडेतिकडे स्वातंत्र्याची नौबत धडाडली. जेकबने आपल्या हाताखालील लोकांस सज्ज करून शहरातील एका कच्च्या दरवाजाने जेव्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून तो इंग्रजी सैन्य राजवाड्याच्यापाशी लगटेपर्यंत लढाई चालू होती. पराजय होताच नेहमीच्या डावाप्रमाणे छत्रपतीने सांगितले की फौजेने व लोकांनी मला न जुमानता बंड उभारले होते. बंडाचे पुढारी कोण हे कळण्यासाठी जेकबने वाटेल तितके प्रयत्न केले;परंतु जो कोणी धरला जाई त्याने त्याच्या पलीकडे कधीही मागमूस लागू दिला नाही. एका पुढाऱ्याने तर त्याला पकडण्यात आल्यावर आपल्याजवळ असलेले आक्षेपार्ह पत्र अधिकाऱ्यांच्यासमक्ष फाडून गिळून टाकले. दुसऱ्या एकाला तोफेच्या तोंडी बांधीत असता त्याने चुकून नाव घेतले,ते ऐकताच जवळ असलेल्या नेटिव्ह सरकारी नोकरांपैकी एक नाहीसा झाला व त्याने त्या पुढाऱ्याला ही वर्दी दिली तेव्हा तो पुढारी फरार झाला. चिमासाहेबाला मात्र एकटे गाठून हद्दपार करण्यात आले. अशा परस्परविश्वासाने क्रांतिकारक,कटवाले एकमेकांशी बांधलेले असत आणि याच पध्दतीने निरनिराळ्या गटांना एकत्रित करण्यात येत होते. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४