आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१४ डिसेंबर
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ डिसेंबर १६८२*
शहाबुद्दीनखान व मराठ्यांचा किल्ले लोहगडाजवळ सामना!
शहाबुद्दीनखान ९ डिसेंबर इ.स.१६८२ मराठ्यांच्या प्रदेशात आला. त्याने जवळ जवळ २० गावे लुटली. आणि १४ डिसेंबर इ.स.१६८२ सुमारास किल्ले लोहगडाजवळ त्याचा व मराठ्यांचा सामना झाला. मराठ्यांचे ६० लोक म्रृत्यू पावले. मराठे विसापूर व कुसूर येथे चौथ वसुली करीत असताना बहुतेकांना मोगली सैन्याने मारले. मराठी प्रदेशातील १८ खेडी लुटली. शहाबुद्दीनखानाला बढती मिळाली व खिल्लत, विजयाबद्दल फर्मान व तलवार बादशहाने पाठविली. शेवगाव भागात थाकू वंजारी बादशाही सैन्यास हैराण करीत होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ डिसेंबर १६८४*
कोथळागड मोगलांनी घेतला
"मुहर्रम महिन्याच्या १७ तारखेस म्हणजेच १४ डिसेंबर इ.स.१६८४ मुखलीसखान याचा जावई अब्दुल कादिर याने शत्रुकडून कोथळा किल्ला जिंकला होता. त्याला ५००, पाचशे चा मनसबदार करण्यात आले."
काजी हैदर याने कोथळा किल्ल्याचे वर्णन केल्याप्रमाणे, कोथळा किल्ला आहे किंवा कसे? अशी शंका बादशहास आली असावी. त्याला "तो खरोखरच कोथळा किल्ला आहे," असे अतिशखानाने कळविले आणि किल्ल्याचा नकाशा काढून पाठविला. बादशहाने कोथळागडास "मिफ्ता हुलफुलफुजुल" हे नाव दिले आणि महरमखानाकडून कोथळ्यास पक्के ठाणे केले आणि सावधगिरीने रहावे अशी ताकीद दिली. कोथळा किल्ला घेण्यासाठी गोविंदराव वगैरे मराठे मावळ्यांनी मदत केली. त्याबद्दल त्यांना २५०० होन देण्यात आले. कोथळा किल्ल्याच्या दुरुस्तीकरिता अतिशखानाने पाथरवट पाठविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ डिसेंबर १६८८*
डिसेंबरात छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर प्रांती असताना दि. १४ डिसेंबर १६८८ रोजी औरंगजेबाने विजापूरचा तळ उठवून अकलूजकडे कूच केले. औरंगजेबाची नव्या जोमाने स्वराज्यावर स्वारी करण्याची तयारी सुरू.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ डिसेंबर १६९२*
सेनापती संताजी घोरपडे यांनी जिंजीच्या पायथ्याशी मोगल सैन्याचे पराभव करुन औरंगजेबाच्या छावणीत गोंधळ निर्माण केला होते व मराठे छत्रपती राजाराम महाराज यांच्या सरंक्षण करण्याचे काम तरबेज आहेत हे बादशहा ओळखून होते तर १६ डिसेंबर १६९२ रोजी झुल्फीकारखान यांना औरंगजेबच्या पुत्राशी नजरकैदेत ठेवले म्हणजे १३/१४/१५/१६ या चार दिवसांत मुघलांच्या ६० हजार सैन्याचे छत्रपती राजाराम महाराज, सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांना मोगलांची काय अवस्था बिकट केली आहे हे लक्षात घेतली तर भरपूर झाले कारण औरंगजेबनंतर सर्वात जास्त फौज वजीर आसदखान, शहजाद कामबक्ष व झुल्फीकारखान याचा कडे जिंजी वेढ्यात होते. हे सर्वात मोठा पराभव पत्करावा लागल्याने औरंगजेब यांना हाय खाल्ली. विशेषतः सेनापती संताजी घोरपडे यांनी मोगली सैन्याचे अशी कत्तल केली की झुल्फीकार खान पुन्हा संताजीचे आले हे समजल्यावर पळता भूई थोडे होई. हाच तो झुल्फीकारखान ज्यानी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुत्र बाल शिवाजी व महाराणी युसेबाई यांना कैद केले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ डिसेंबर १७३१*
मराठ्यांच्या उत्तरेकडील चढाईस निजामाची मूक संमती मिळून मराठ्यांनी माळवा आपल्या ताब्यात आणिला, बुंदेलखंडातही आपले पाय रोविले. १४ डिसेंबर १७३१ ला बुंदेलखंडाचा छत्रसाल मरण पावल्यावर त्यांच्या राज्याचा तिसरा हिस्सा त्यांनी ठरल्याप्रमाणे बाजीराव पेशव्यास मिळाला. पेशवे प्रदेशाचा कबजा घेण्याकरिता उत्तरेत असता सैन्यासह मराठ्यांना मदत करण्याचे बुंदेल्यांना मान्य केले, “पुढे स्वामी (पेशवे) ज्या मुलुखावर चालतील त्या मुलुखावर समागमे चालावे; दिल्लीवर चाल कराल तेव्हाहि समागमे चालावे, प्रयागास स्वामी चालतील तेव्हाहि समागमे चलावे; जो मुलुख जप्त करावा त्यात अर्धा-अर्ध प्रमाणे घ्यावे. असे छत्रसालचे ब्रीद होते. १७३३ च्या एप्रिल पर्यंत चिमाजी आप्पांचा मुक्काम बुदेलखंडात होता. त्यांनी छत्रसालच्या राज्यालगत असलेल्या दतिया, ओडसा, नरवर या संस्थानिकांकडून खंडण्या वसूल केल्या व आपले सैन्य ग्वाल्हेर पर्यंत नेऊन पावसाळा समीप आला म्हणून दक्षिणेकडे कूच केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ डिसेंबर १७३७*
निज़ामापुढे आता एकच मार्ग होता. काहीतरी करुन बाजीरावांचा वेढा फोडायचा आणि सरळ दिल्लीकडे चालू पडायचे. दि. १४ डिसेंबर १७३७ निज़ामाने राजपूत आणि बुंदेल्यांच्या जोरावर वेढा फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांना बंदुकधारी गजभाराची साथ होती. परिणाम? मल्हाररावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी एवढ्या त्वेषाने हल्ला चढवला की, सर्वांना पळता भुई थोडी झाली. रणमदाने न्हाऊन निघालेले मराठ्यांचे भालाईत हत्तींवर चढले आणि एकेका बंदुकधाऱ्याला भोसकून काढले. बंदूका आणि तोफ़ा तोडून टाकण्यात आल्या. निज़ामाच्या उपासमारीत अजूनच भर पडली. घाबरलेल्या निज़ामाने आपली खाज़गी छावणी दूर जंगलात हलवली. मराठ्यांनी त्याला तिथेही हैराण करुन सोडले. एकदा तर मराठ्यांनी त्याच्या २ तोफ़ाच उचलून आणल्या. भुकेलेल्या, खचलेल्या निज़ामाने बाजीरावांकडे शिष्टमंडळ पाठवले. तहाची बोलणी आरंभली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ डिसेंबर १७४९*
शाहूछत्रपतींची स्वदस्तुराची मृत्यूपत्रे
१६७१ म्हणजेच दि. १४ डिसेंबर १७४९ रोजी छत्रपतीशाहू महाराजांनी स्वहस्ताक्षरात दोन याद्या केल्या.
या दोन याद्या म्हणजे शाहूछत्रपतींची स्वदस्तुराची मृत्यूपत्रेच आहेत. या मृत्यूपत्रानुसार शाहूछत्रपतींनी राज्यकारभाराची जबाबदारी नानासाहेबांकडे सोपवली. शाहूराजे बाळाजी पंडित प्रधान उर्फ थोरल्या नानासाहेबांना काय म्हणतात, त्यांचा दोन्हीही याद्यांमधील सारांश असा- "राजमान्य राजेश्री बाळाजी पंडित प्रधान यांस आज्ञा केली जे सगळ्यांना आज्ञा केली पण त्यांच्या दैवी नाही, तेव्हा तुम्ही फौज सांभाळून, राज्यकारभार चालवायला हवा तर त्याकरीता गादीवर वंश बसवणे, पण कोल्हापूरच्या गादीपैकी न घेणे! चिटणीस आमचे विश्वासू, त्यांना सर्व सांगितले आहे. राज्यकारभार तुम्ही चालवाल हा भरवसा स्वामींस (शाहूराजांना) आहे.
तुमच्याविषयीची खातरजमा चिटणीसांनी अढळ केली. तुमच्या मस्तकी आमचा वरदहस्त आहे. जो वंश होईल तो तुमचे प्रधानपद चालवेलच, तुमची घालमेल करणार नाही, त्यात अंतर करेल तर त्यास शपथ असे. त्याच्या आज्ञेत चालून राज्य राखणे."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ डिसेंबर १७५०*
जयपूर संस्थानातील बागरु गावाजवळ राजे ईश्वरसिंह व पेशवे यांच्यात ३ अॉगस्ट ते ८ अॉगस्ट १७४८ असे ६ दिवस लढाई झाली. त्यात ईश्वरसिंहाचा पराभव झाला. तरीही तो एकही परगाणा देण्यास तयार होईना. तथापि आपले काही चालत नाही असे पाहुन ईश्वरसिंहाने १४ डिसेंबर १७५० रोजी विष पिऊन आत्महत्या केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र*.
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment