आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२७ डिसेंबर १६

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ डिसेंबर १६८३*
रिचर्ड केंरवीन याने २७ डिसेंबर १६८३ रोजी मुंबईचा प्रेसिडेंटला कैद करून मुंबईचा ताबा घेतला आणि सिद्दी व मोगल यांचे आरमार विनाहरकत मुंबईस येऊन उतरले त्यांस केंरविन्ने हाकलून दिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ डिसेंबर १६८३*
पोर्तुगीज व सावंत संभाजी महाराजांविरुद्ध उठले असता त्याच संधीत उत्तरेकडून महाराजांवर शहाआलंम राम घाटाने कोकणात उतरण्यासाठी निघाला होता तर दुसरीकडे प्रचंड फौज घेऊन शियाबुद्दिन खान पुण्यावर चालून येत होता. त्यावेळी शहाआलमने कोकणात उतरून निजामपूर लुटले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ डिसेंबर १६९९*
२७ डिसेंबर रोजी ब्रह्मपुरी येथील बादशाही छावणीपासून अवघ्या चार मैलांवर हणमंतराव निंबाळकर, नेमाजी शिंदे, परसोजी भोसले यांनी मोगलावर हल्ला चढविला. मोगल सरदार इखलासखान आणि त्याचा मुलगा महंमद या हल्ल्यात ठार झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ डिसेंबर १७०२*
डिसेंबरच्या अखेरीस २७ तारखेस मोगलांनी सिंहगडला वेढा घातला. 
औरंगजेबाची छावणी गडाच्या पायथ्याशी पडली होती. मोगलांचे मोर्चे गडाच्या दिशेने सरकत होते. दरबारातील बातमी पत्रावरून असे दिसते की, शंकराजी नारायण, सचीव हा १ जानेवारीपयȊत सिंहगडवर होता. गडावरील सर्व व्यवस्था  लावून देऊन त्याने सिंहगड सोडले.
किल्ल्या भोवती मोर्चा बसवून औरंगजेबाने किल्ल्या समोरील टेकडीवर तोफा चढिवल्या. वेढ्याचे काम चालिवण्यासाठी बादशहाने निरनिराळ्या ठिकाणाहून तोफा मागीवल्या.. या तोफा वीशालगड, ब्रह्मपुरी, पेडगाव, अहमदनगर येथून आणण्यात आल्या होत्या. 
सिहगडच्या वेढ्याचे  वणर्न करताना भीमसेनने मराठ्यांनी मोगल फौजांची ठीकिठकाणी कशी अडवणूक केली याचे पुढील प्रमाणे वणर्न कले 
आहे :–– 
"बादशहा स्वतः कोंडाणा  जिंकून  घेण्यासाठी निघाला. 
(२ डिसेंम्बर १७०२) या कामासाठी लागणाऱ्या तोफा आणि इतर सामग्री खेळण्याहून (विशालगड) आणण्याचे काम  फत्तेउल्लाखान आलमगीर शाही यास देण्यात आले रहमतपुराच्या जवळ मराठयांनी फत्तेउल्लाखान वर मोठा किठण प्रसंग आणला. बादशहाच्या आदेशाने झुल्फिकारखानाने फत्तेउल्लाखान यास मदत कली."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ डिसेंबर १७१२*
सन १७१०-१२ सुमारास आंग्रे समुद्रावर अशाप्रकारे प्रबळ झाले होते की हिंदुस्थानातीलचं नव्हे तर युरोपियन सत्तांना देखील भारी होऊन राहिले आहेत असे गोव्याचा व्हाईसरॉय पोर्तुगालला आपल्या राजाला लिहिलेल्या पत्रात म्हणतो -
'महाराज,
आग्ऱयांनी सांप्रत उत्तर समुद्र किनाऱ्यावर लुटालूटीची मोहीम सुरु केली आहे. त्यांना ते शक्य आहे, कारण काही बंदरांचा त्यांना आश्रय मिळतो. केवळ हिंदुस्थानातील सत्तांशीच नव्हे तर युरोपियन सत्तांशी देखील त्यांच्या कुरापती चालू आहेत. त्यांनी एवढे मोठे सामर्थ्य संपादन केले आहे, की सगळीकडे त्यांचा दरारा चालू आहे. त्यांच्याशी तह करणे आता केवळ अशक्य झाले आहे असे नाही, तर त्यांची गोष्ट काढणे देखील आता कठीण होऊन बसले आहे. आता फक्त एकच मार्ग उरला आहे आणि तो म्हणजे, त्यांच्याशी युद्ध करून त्यांना नष्ट करण्याचा. न झाल्यास अवघ्याच वर्षांत सर्व राष्ट्रांना ते भारी होऊन राहतील, त्यांना नेस्तनाबूत कसे करता येईल ह्या विचारा शिवाय मला दुसरा कोणताच विचार सुचत नाही. तहाचा विचार तर आता सोडून दिलेला बरा...
गोवा, २७/१२/१७१२

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ डिसेंबर १७३२*
रुई-रामेश्वर येथे मांजरा नदीकाठी पेशवा बाजीराव निजामाची यशस्वी भेट. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ डिसेंबर १७४०*
मराठ्यांची दक्षिण स्वारी : पोर्टो नोवोवर विजय
“ मंगळवार २७ डिसेंबर १७४० , हेरखात्याने सांगितल्याप्रमाणे ६ मराठे घोडेस्वारांची तुकडी कडलोर च्या पश्चिमेला नजरेस पडली. आपल्या सैनिकांची एक तुकडी त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यास पाठवली आहे.
त्याच दिवशी संध्याकाळी ५० ते ६० मराठे घोडेस्वार बहोर गावच्या बाजूला दिसून आले , बंदुकीचे बार उडवल्यानंतर ते माघारी फिरले. परंतु बहोर आणि आसपासचा प्रदेश त्यांनी उध्वस्थ केला.
२८ ला सकाळी मराठे येत असल्याची खबर लागून लोक पोंडीचेरी कडे आश्रयाला येऊ लागले. त्यांची फौज विल्लीनाल्लूर , ओळूकराई पर्यंत पोचली असून वाटेत भेटणाऱ्या सर्वाना लुटत आहेत. सकाळी ९ वाजता गवर्नरने फौजेची एक तुकडी ओळूकराईला पाठवली . बरोबर मुत्तया पिल्लई आणि ५० स्थानिक सैनिकांची एक फळीही दिली. परंतु हे तिथे पोचण्याआधीच मराठे ओळूकराई मधून वळूदावूरकडे निघून गेले होते. पाठवलेली सैनिकांची तुकडी माग्ग पोन्डिचेरी ला माघारी परतली.
पोर्टो नोवो अर्थात आताचे परंगीपेत्ताई येथून आलेल्या पत्रात मराठ्यांचा असा उल्लेख येतो :- २४ डिसेंबर रोजी २००० मराठे तिरुअन्नमलै वरून त्रिचीकडे जाण्यासाठी निघाले. दक्षिणेकडे त्यागदुर्गमपर्यंत येऊन त्यांनी आपली दिशा पूर्वेकडे वृन्दाचालामकडे वळवली. तिरुअन्नमलै ते वृन्दाचालाम हे अंतर ५० मैल आहे, मराठ्यांनी मारलेला दक्षिणेकडचा वळसा पकडून रात्री ६० मैलाचे अंतर कापून ते वृन्दाचालामला मुक्कामी पोचले. दुसऱ्या दिवशी सकाळी वृन्दाचालाम वरून मराठे निघाले आणि दुपारी पोर्टो नोवो ला पोचले. संपूर्ण ११० मैलाचे अन्तर मराठ्यांनी दीड दिवसात पूर्ण केले. मराठ्यांनी पोर्टो नोवो च्या पश्चिमेकडील २ मैलावर असलेले चित्रचावडी हस्तगत केल, ५०० घोडेस्वार त्यानंतर डच वखारीकडे वळले. वाखारीचे प्रवेशद्वार आधीच बंद केले होते. गावामध्ये थांबलेल्या १००० घोदेस्वरांपैकी ५०० उत्तरेकडून वखारीजवळ आले. मराठ्यांनी प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न चालू केला. शिडी लावून वखारीत घुसण्यात काही मराठे यशस्वी झाले. त्यांनी आतून प्रवेशद्वार उघडल्याने १००० मराठ्यांची तुकडी आतमध्ये आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ डिसेंबर १७६०*
नानासाहेबांचा दुसरा विवाह नारायणराव नाईक वाखरे सावकार यांच्या मुलीशी झाला. २७ डिसेंबर सन १७६० रोजी हिरडपूर येथे झाला. या सोयरीकीमुळे मोठ्या प्रमाणावर कर्ज उभारणी शक्य होणार होते. कारण सततच्या मोहिमांतील खर्चामुळे कर्ज वाढले होते. त्यात पानिपत मोहिमेसाठी मोठा खर्च होणार होता. एकंदरच पैसा उभा करण्यासाठीच हा विवाह झाला. पेशवे घराण्यातील व्यक्तींचा विवाह शक्यतो सावकार घराण्यातील व्यक्तींशीच केलेला दिसतो. कारण एकच मोहिमांसाठी उभारावी लागणारी कर्जे.
सोयरीक झाल्यावर सावकार कर्ज उभारणीस मदत करत असत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ डिसेंबर १७६०*
गोविंदपंत यास ठार केल्यास मराठ्यांना रसद पुरवठा होणार नाही हे अब्दालीस लक्षात आले. त्यामुळेच 
अब्दालीस गोविंदपंत हा मोठा अडचणीचा वाटत असल्याने त्याने गोविंदपंतांचा काटा काढण्यासाठी अतईखान, करीमदादाखान यांची त्याने नियुक्ती केली. 
दिनांक २२ डिसेंबर सन १७६० रोजी  मेरठ पासून २४ किलोमीटरवर दिल्लीमार्गावरील जलालाबाद जवळ अतईखान, करीमदादाखान, मुसेखान  अफगाणांनी छावणी न लुटता प्रथम गोविंदपंत बुंदेले यांचा पाठलाग करून त्यांचे शिर कापले. यावेळी गोविंदपंत यांचा पुत्र बाळाजीपंत जवळ नव्हते. शिर कापल्यानंतर अतईखानाच्या सैन्याने मराठ्यांची छावणी लुटली. त्यास मोठा धान्यसाठा मिळाला. अतईखान गोविंदपंतांचे शिर घेऊन अब्दालीच्या छावणीत आला. अब्दालीने ते शिर मराठ्यांना खिजविण्याकरीता भाऊसाहेबांकडे पाठवले. दिनांक २७ डिसेंबर सन १७६० रोजी त्या शिराचे दहन करण्यात आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४