सलग 65 वर्ष लोकप्रिय कीर्तनकार म्हणून समाज प्रबोधन करत अखंड वारकरी वारकरी संप्रदायाला नित्य नियम सेवेचे व्यसन लावणारे पूजनीय ह भ प ज्येष्ठ कीर्तनकार नामदेव आप्पा शामगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
अखंड वारकरी सांप्रदायाला नित्यनियमाचं व्यसन लावनारे पुज्य श्री नामदेव आप्पा शामगांवकर हे वारकर्यांचे वैभव होते.
याचा जन्म खटाव तालुक्यातील शामगाव येथे झाला 1930 च्या आसपास चा असावा. अवघी तिसरी शाळा शिकलेले आप्पा.
म्हजे त्या काळी गुरे ढोरे शामगावच्या घाटाच्या परिसरामध्ये राखत होते. हा शामगावं चा घाट म्हजे पुसेसावळी वरून कराड जाताना लागतो तो. पुढे आणि पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीमध्ये आप्पा गुर सोडून शिरले आणि पंढरपूरला गेले.
जे गेले ते कीर्तनकार होऊनचं गावी परतले.
तिकडं कीर्तन ऐकली. आणि जे काही वारकरी संप्रदायाशी एक रूप झाले.खूप ग्रंथ वाचने केली,पारायणे केली,हरिपाठ केले.आणि तिसरी शिकलेला माणूस स्वतः अभ्यासाच्या जोरावर कीर्तनकार होऊनचं घरी आले. अशी साधारण त्यांच्या सुरवातीच्या आयुष्याची कथा आहे.
साधारण 70 वर्षांपूर्वी मराठी भाषा कशी होते. या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी कमवलेली भाषा शिक्षण येवडं कमी असेल असं वाटत नाही. कीर्तने youtube च्या माध्यमातून उपलब्ध आहेत. जरूर प्रत्येकाने एकदा तरी शांतपणे कीर्तन ऐकावं.
त्याची अभ्यासपूर्ण मांडणी, गावरान भाषेचा त्याठिकाणी शब्द मारा,कथनशैली हा एक अभ्यासाचा स्वतंत्र विषय असू शकतो.
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली सुद्धा हरिपाठात म्हणतात '' नित्यनेम नामे तो प्राणी दुर्लभ लक्ष्मीवल्लभ तया जवळी '' नित्यनेम करणारा मनुष्यप्राणी दुर्लभ आहे असं माऊली म्हणाले पण पुज्यश्री आप्पांनी दुर्लभ कार्य सहज करून दाखवले.
शुद्ध सांप्रदायिक कराडकर भजनी मालिका सांप्रदायात प्रमाण मानली जाते.निष्ठावंत वारकरी रोज याच भजनी मालिकेच्या नियमाने आपल्या दिवसाची सुरूवात करत असतात.
सन 1972 साली ह. भ. प नामदेव आप्पांनी शामगावकर या मालिकेचे प्रथम प्रकाशन करून महाराष्ट्रातील वारकरी समाजात वाड्मयसेवेचे नविन पर्व सुरू केले होते.
नवीन म्हणायचे कारण हे की पुज्यश्री आप्पांनी हे व्रत व्यावसाईक भुमिकेने न घेता समाजसेवा या माध्यमांत हे कार्य सुरू केले.
सन 1987 साली पुज्यश्री आप्पांच्या सत्कार निधीतून या मालिकेच्या कायम प्रकाशनासाठी प्रकाशन निधी उभारण्यात आला व त्याचे नियोजनार्थ '' संत वाड्मय प्रसारक मंडळ '' या संस्थेचा जन्म झाला.
तेव्हापासुन गेली ३५ वर्षे ना नफा ना तोटा या तत्वांवर अखंडितपणे हे व्रत ही संस्था चालवित आहे.
एकतत्व नाभ द्रिडधरी मना तयांची करूना येईल हरि खरंच एकविधभावाने या मालिकेचा नित्यनेम करणार्यां वारकर्यांला वैकुंठप्राप्ती होईल यावर शंकाच नाही.
आप्पानी गेले अखंड 65 वर्ष महाराष्ट्राच्या हजारो गावातून हजारोच्या संख्येने कीर्तनसेवा केली. वॉटर स्टेशन सातारा या ठिकाणी कीर्तनकार करत असताना त्याच्या वय 93वर्ष होत.. आणि माझ्या वयाचा बुवा कीर्तन करणारा अखंड महाराष्ट्रात कुठं नाही असं ते बोललेलं होते...तेव्हा कीर्तन करताना उभराण्यासाठी खुर्ची किंवा टेबल चा ते आधार घेऊन एक ते दीड तास वयच्या 94वर्षा पर्यत अखंड कीर्तन सेवा त्यानी केली...
शतका पूर्वीच्या या भागातील नोंदी पहात असताना पुसेसावळे येथील शाहिरांच्या डफावरील थाप, चोरडांच्या कलाकारांचा कलंगी तुरा, त्यानंतर कित्येक वर्षानंतर शामगांवकर आप्पांची कीर्तनं अखंड महाराष्ट्रभर गाजवून लोकप्रिय झालीत. आर्थिक परिस्थितीने थोडं नाजूक परंतु समृद्ध सांस्कृतिक परंपरा निर्माण करणारा हा परिसर राहिलेला आहे....
वै.नामदेव आप्पां शामगांवकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत.
वारकरी सांप्रदायातील थोर तपस्वी
श्री ह भ प नामदेव आप्पा शामगावकर
भावपूर्ण श्रद्धांजलि
गेले दिंगम्बर ईश्वर विभूति राहिल्या त्या किर्ति जगामाजीं 🙏🏻
@नितीन घाडगे
Comments
Post a Comment