आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१३ डिसेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ डिसेंबर १६७८*
कुरकुंभ येथे संभाजीराजे व दिलेरखान यांची भेट
छत्रपती संभाजी राजे मोगलांना जाऊन मिळाले. {हा प्रकार म्हणजे एक डावपेचाचा भाग होता असे काहींचे मत आहे.}
दिलेरखानाने एक हत्ती, तीन घोडे, सात हजारी मनसब, आदी देऊन सत्कार केला. दिलेरखानाला छत्रपती संभाजी राजे मिळाल्यानंतर त्याचे बळ दुणावले. त्याने विजापूरकर, स्वराज्य आदी मुलखात यथेच्छ लूट आरंभली. याबरोबरच त्याची मुजोरीही वाढू लागली. खुद्द बादशहा पुत्र मुअज्जम व दिलेरखानात बेबनाव वाढला. इतका वाढला की औरंगजेबाने छत्रपती शिवाजी माहाराजांनी जालन्यावरील छापा घातल्यानंतर या गोष्टीचे निमित्त साधून त्याचा ठपका दिलेरखानावर ठेवून त्याची कानउघडणी केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ डिसेंबर १६८०*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या शत्रूंचा या मृत्यूवार्तेवर विश्वास बसत नव्हता. या वारंवार येणार्‍या मृत्यूवार्ताच्या संदर्भात हुगळीच्या इंग्रजांची सहजगत्या व्यक्त झालेली प्रतिक्रिया फारच मार्मिक आहे. दिनांक १३ डिसेंबर १६८० च्या पत्रात ते लिहीतात, Sevagie had died so often that some begin to think him immortal.
छत्रपती शिवाजी महाराज आजपर्यंत इतक्या वेळा मेलेले आहेत की काही लोकांनी त्यांना आता अमर समजायला सुरूवात केली आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ डिसेंबर १६८३*
 डिसेंबर १६८३ च्या अहवालात "पोर्तुगीज नावे निशाणी आणि ख्रिश्चन लोक गोव्यात शिल्लक ठेवणार नाही" असे शत्रूने (छत्रपती संभाजीराजांनी ) म्हणल्याचे व्हाइसरॉयने नमूद केले आहे. थिवीम किल्ल्यावर हल्ला चढवला आणि मराठ्यांनी किल्ल्याला पुरवठा होणारे पाणी दुषित केले. किल्ल्याची सर्व रसद तोडण्यात आली. जीव मुठीत धरून फिरंग्यानी माघार घेतली. साष्टी आणि बारदेशात तब्बल २६ दिवस मराठ्यांचे भगवे वादळ घोंगावत होते. या काळात मराठ्यांनी ४६ तोफा आणि प्रचंड खजिना स्वराज्यात लुटून आणला.


🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ डिसेंबर १६९२*
बेळगाव - धारवाडच्या प्रदेशात धुमाकूळ माजवून संताजी आणि आधी धनाजी जिंजीकडे रवाना झाले, जिंजीला पडलेले वेडे उठविण्यासाठी त्यांनी कूच केली, झंझावाताप्रमाणे त्यांच्या फौजा जिंजीचा आसमंतात आल्या आणि पाहता पाहता त्यांनी इस्माईलखानास लोळवले, इस्माईलखान मखा या सेनानीस कैद करून जिंजी किल्ल्यात नेहले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ डिसेंबर १६९९*
शत्रू अजिंक्यताऱ्याचा गळा आवळू पाहात होता आणि आतमधील मूठभर मावळे किल्लेदार प्रयागजी प्रभूंच्या नेतृत्वाखाली त्यांना रोखून होते. दगडगोटय़ांनी झुंजत होते.
गडाच्या वाटेवर मोगल गस्त घालू लागले. मराठ्यांचे गडावर येणे जाणे कठीण होउन बसले. गडावर तोफांचा मारा सुरु झाला, औरंगजेबास जास्तीत जास्त आठवडाभरात गड ताब्यात येइल, असे वाटत होते. पण महीने गेले तरी सुद्धा गडावरचे मराठे काही दाद देई नात. एकदा तर बादशाही सैन्याने गडावर सुलतानढावा सुद्धा केला पण मराठ्यांच्या तिखट प्रतिकारा समोर मोगली सैन्याला माघार घ्यावी लागली.  औरंगजेबाचा एक सरदार १३ डिसेंबर १६९९ रोजी एका पत्रात कळवतो, 
“आमच्याकडे सैन्य आहे, तोफा आहेत, आमचे मोर्चे गडापर्यंत पोहोचू पाहात आहेत, पण किल्ल्यातून होणाऱ्या दगडांच्या वर्षांवापुढे आम्हाला पुढे सरकता येत नाही. रात्री-अपरात्री मराठे बाहेर येत आणि औरंगजेबाच्या वेढ्यात घुसून हल्ले करत, त्यांची रसद लांबवत असत."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ डिसेंबर १७२४*
व्हिसेरेईने आपल्या राजास पाठविलेल्या पत्राची नोंद!
"मराठा सरदारांनी उत्तरेकडून वसईमध्ये व दक्षिणेकडून गोव्यामध्ये सैन्य घुसविण्याची तयारी केली आहे. परंतु या स्वारीला तोंड देण्याची आमची तयारी नाही. उत्तरेकडील प्रदेशाच्या सेनापतीने मराठ्यांशी हंगामी तह केला होता. तो कायम करून घेण्यासाठी आम्ही छत्रपती शाहु महाराज यांच्याकडे नजराणा देऊन वकील पाठवावा. अशी मागणी आमच्या कडे मराठा सरदारांनी केली होती. परंतु ती मान्य करणे आमच्या दृष्टीने लांच्छणास्पद असल्याने वकील पाठविण्यात आला नाही". पोर्तुगिजांच्या मनात छत्रपती शाहू महाराजांकडे नजराणा देऊन वकील पाठवायचा नाही. त्यांचे हे धोरण काळ काढुपणाचे आहे हे मराठ्यांच्या ध्यानी आल्यावाचून राहीले नाही. म्हणून त्यांनी ठरलेल्या योजनेप्रमाणे ठाणे जिल्ह्याप्रमाणे गोव्याकडेही सैन्य धाडले. ती बातमी गोव्याचा हंगामी गव्हर्नरला साष्टीच्या सेनापती कडून कळाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇



*१३ डिसेंबर १७२८*
बाजीराव पेशव्यांनी उज्जैन जिंकले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ डिसेंबर १७७२*
थोरल्या माधवराव पेश्व्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात धाकटे बंधू नारायणराव यांस १३ डिसेंबर १७७२ ला सातारा इथे छत्रपती रामराजांनी पेशवाई ची वस्त्रे दिली. नारायणराव ३१ डिसेंबरला पुणे मुक्कामी परत आले व कारभार बघू लागले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ डिसेंबर १८२४*
इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव' युद्ध 
 जे १ जानेवारी १८१८ च्या युद्धात मारले गेले. त्यांच्या स्मरणार्थ स्तंभ बांधून पूर्ण झाला. १३ डिसेंबर १८२४ रोजी मुंबई सरकारकडून कोरेगावच्या स्तंभाची देखभाल करण्यासाठी ट्रस्ट बनवले गेले. कोरेगावच्या लढाईत हवालदार म्हणून लढताना अपंगत्व आलेल्या खंडूजी मुळोजी नावाच्या व्यक्तीची तेथे देखरेखीसाठी नेमणूक झाली. त्याला जमादाराची पदोन्नती देण्यात आली. स्तंभाजवळ एक जमीनीचा छोटासा तुकडाही त्याला घर बांधण्यासाठी सरकारकडून देण्यात आला. हे काम त्याला वंशपरंपरागत सांगितले गेले. त्याच्या घराण्यात पुढे वारस नसल्यास सरकारचा निर्णय अंतिम राहील असेही कलम टाकण्यात आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...