अखंड हिंदुस्थानात आपला भगवा ध्वज गाजवणारे,स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर करणारे,कुशल प्रशासक,शंभूपुत्र'छत्रपती थोरले शाहू महाराज' यांना स्मृतीदिनी मानाचा मुजरा...!#दिनविशेष#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा

अफगाणिस्तान मधील अटक पासून बंगाल मधील कटक पर्यंत, काश्मीर पासून तामिळनाडू तील तंजावर पर्यंत असा स्वराज्य विस्तार करणारा महाप्रतापी राजा आजोबा छत्रपती शिवरायांच्या कडून संयमित वडील छत्रपती संभाजी यांच्याकडून आक्रमक व स्वराज्य विस्तारक असे गुण घेऊन महाराणी येसूबाई व छत्रपती संभाजी याच्या पोटी 18 मे 1682 साली जन्म जन्मास आलेले राजपूत्र शिवाजी उर्फ छत्रपती शाहू महाराज याच्या विषयी भरपूर गोष्टी लिहल्या गेल्या नाही.


अधिकारारोहण:- सम्राट पदाभिषेक

राज्याभिषेक:-जानेवारी १७०८


        औरंगजेब च्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा बादशहा आज्जीम हा महाराष्ट्र सोडून दिल्लीकडे स्वतःचे दिल्ली साम्राज्य सांभाळणे करीता निघून गेला.परंतु जाताना त्याने त्यांच्या नजरकैदेत असणारे मराठ्यांचे युवराज शाहूराजे यांची सुटका केली.परंतु महाराणी येसूबाई यांची सुटका केली नाही.बादशहा आज्जीम व बहीण झीनतनुसा याचेंबरोबर युवराज शाहूराजे यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे उत्तरेकडे दिल्लीचा कारभार बादशहा आज्जीम याने सांभाळणे व दक्षिणेकडे महाराष्ट्र मद्धे छ.शाहूराजे यांनी कारभार सांभाळून राज्य करणे व एकमेकांवर आक्रमण न करण्याचा करार करूनच युवराज शाहूराजे यांची कैदेतून सुटका केली गेली होती.मराठ्यांनी व छ. शाहूराजे यांनी करार मोडू नये म्हणून महाराणी येसूबाई यांना कैदेतच ठेवले होते.

       

    ...युवराज शाहूराजे यांची सुटका झाले नंतर लोखंडे पाटलांचा पराभव करून ते पुढे  भोपाळ,दारोहा,सुलतानाबाद,शिवणे,पारद,चाकण,पुणे, खेडशिवापुर, खंडाळा,या मार्गे  वाई,सातारा येथील चंदन-वंदन किल्ला येथे येऊन त्यांनी तेथे मुक्काम केला आणि येथून नंतर अजिंक्यतारा किल्ला जिंकून घेतला.अजिंक्यतारा जिंकल्यावर युवराज शाहूराजे यांनी सन.12 जाने.1708 रोजी स्वतःचा मराठ्यांचे 5 वे छत्रपती म्हणून राज्याभिषेक करून घेतला.छ.शाहूराजे यांना महाराष्ट्र मधील बहुतेक सर्व सरदार येऊन मिळाले व स्वराज्याच्या विस्ताराच्या कार्याचे सहभाग घेतला.छ.शाहूराजे यांनी तेंव्हा सरदार धनाजी जाधव यांची स्वराज्याचे सरसेनापती म्हणून नेमणूक केली.छ.शाहूराजे यांना महाराणी राजसबाई( राजे जाधवराव-सिंदखेडराजा) व महाराणी अंबिकाबाई ( राजे शिंदे-कण्हेरखेड )या दोन पत्नी होत्या, तरीही त्यांच्या दासी बिरुबाई साहेब यांना त्यांच्या थोरल्या महाराणी म्हणूनच दर्जा व मान होता.याच महाराणी बिरुबाई साहेब यांनी फत्तेसिंगराजे भोसले या छ.शाहूराजे यांच्या मानसपुत्रास दत्तक पुत्र मानले होते.महाराणी बिरुबाई साहेब यांची सर्व जहागिरी पुढे फत्तेसिंह राजे भोसले यांना मिळाली.फत्तेसिंगराजे भोसले हे अक्कलकोट संस्थान चे राजे झाले.छ.शाहूराजे यांनी महाराणी ताराराणी यांना कोल्हापूर वरून अजिंक्यतारा येथे आणले व स्वतःच्या मातेसमान मानून त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार केला व स्वराज्याचे साम्राज्य उभारले.

         छ.शिवाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करताना सम्राट छ.शाहूराजे भोसले यांनी सरसेनापती धनाजी जाधव, सरसेनापती खंडेराव दाभाडे, सरसेनापती त्रिम्बकराव दाभाडे,सरसेनापती श्रीमती उमादेवीराजे दाभाडे, या शूरवीर महान सरसेनापती/ सेनानायकांचा आणि महादजी राजे शिंदे,राजे होळकर,राजे गायकवाड, राजे भोसले,इत्यादी शेकडो सेनापती सरदारांचा मोठ्या कौशल्याने उपयोग करून घेतला होता.सम्राट छ.शाहूराजे यांचे महान शूरवीर अपराजित असे मानसपुत्र फत्तेसिंह राजे भोसले व वीरांगना महाराणी ताराराणी साहेब यांच्या शौर्याचा सुद्धा सम्राट छ.शाहूराजे यांना मराठा साम्राज्य विस्तारासाठी फार मोलाचा सहभाग लाभला होता.सन.1707 ते 1749 या 42 वर्षाच्या त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सम्राट छ.शाहूराजे भोसले हे एकही युद्ध हरले नाहीत.

     सम्राट छ.शाहूराजे यांनी सन.1719 ला राजमाता येसूबाई यांची दिल्लीहून सुटका करण्यासाठी मोठी खेळी खेळली होती.त्यांनी सय्यद बंधूंना मदत करण्यासाठी मराठा सेना दिल्लीत पाठवली.सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली सरदार राणोजी शिंदे,सरदार संताजी भोसले, सरदार उदाजी चव्हाण, सरदार जाधवराव इत्यादीसह मोठी मराठा सेना पाठवली होती.सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचेसोबत मराठ्यांचा वकील,लेखनिक,दिवानजी,दुभाशी म्हणून  करार लिहिण्यासाठी  बालाजी विश्वनाथ पेशवे हे बरोबर होते.सरसेनापती खंडेराव दाभाडे व सर्व मराठा सरदारांनी मोठे शौर्य गाजवून दिल्लीच्या बादशहा व मोघल सैन्याचा पराभव केला.सम्राट छ.शाहूराजे यांचा व मराठ्यांचा हा पहिला मोठा विजय होता.या विजयाने सम्राट छ शाहूराजे भोसले यांचा दबदबा भारतभर पसरला.महाराणी येसूबाई यांच्या सुटकेसह मराठ्यांना  सय्यद बंधुकडून युद्धखर्च म्हणून मोठा खजिना प्राप्त झाला.या पैशातूनच सम्राट छ.शाहूराजे यांनी सन.1725-30 दरम्यान अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी  "सातारा" " या नवीन शहराची स्थापना केली !...सन.1749 ,पर्यंत सम्राट छ.शाहूराजे यांनी सातारा येथून संपूर्ण भारतावर 42 वर्षे राज्य केले आणि त्या काळात अजिंक्यतारा,सातारा शहराला हिंदुस्थान च्या राजधानीचा दर्जा प्राप्त करून दिला होता.

     .


अफगाणिस्तान मधील अटक पासून बंगाल मधील कटक पर्यंत, काश्मीर पासून तामिळनाडू तील तंजावर पर्यंत

 स्वराज्याचे विस्कटलेली घडी व्यवस्थित बसवण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी सन 1708 मध्ये राज्याभिषेक करून घेतला. स्वराज्याची चौथी छत्रपती झाले. हिम्मत आणि परक्रमाच्या जोरावरती, धाडसा मुळे छत्रपती पद मिळवले. छत्रपती शिवरायानंतर संभाजी महाराजांनी प्रधानमंडळ नेमला होत. अष्टप्रधान मंडळ त्यांनी पुन्हा स्थापन केल.

 

 ऐतिहासिक साधनांच्या आधारे असे दिसते की त्यांनी सर्व सूत्र नंतर स्वराज्य विस्तार होण्यासाठी धाडसी  निर्णय घेऊन मोहिमा आखल्या. अगदी महाराष्ट्राच्या बाहेर स्वराज्य विस्तार करण्यामध्ये शाहू महाराजांची रणनीती सफल झाल्यामुळेच. अफगाणिस्तान मधील अटक पासून ते बंगालमधील कटक पर्यंत. व कश्मीर पासून तमिळनाडूतील तंजावर पर्यंत स्वराज्य विस्तार करण्याचं त्यांचं ध्येय त्यांनी पूर्ण केल. पूर्ण भारतभर महापराक्रमी  मराठ्यांच्या घोडदौडी चालू झाल्या.

 

 स्वराज्याचा केंद्रबिंदू असलेल्या रायगड हा मुघलांच्या ताब्यात गेला होता. छत्रपती शाहू महाराजांनी रायगड ताब्यात घेण्यासाठी रणनीती आखून 8जून 1733साली रायगड ताब्यात घेतला.

 

 छत्रपती शाहू महाराजांनी स्वराज्याची घडी पुन्हा बसवण्यासाठी त्यांचे सहकारी जमा करण्यास सुरुवात केली. ऐतिहासिक दस्तावेजमधून छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे बाराशे सरदार होते  असे उल्लेख आहेत. होळकर, गायकवाड, शिंदे, थोरले बाजीराव, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर, पिलाजीराव जाधवराव, सरदार आंग्रे,सरदार दाभाडे, नागपूरकर भोसले असे अनेक बलाढ्य  सेनानी होते.

 छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्य सांभाळते छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांसारखाच शूर वीर असणारे छत्रपती शाहू महाराज पहिले अखंड भारतभर हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला.

 महाराजांनी तब्बल 42 वर्षे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती पद सांभाळले. हिंदवी स्वराज्याचा साम्राज्यामध्ये रूपांतर करणारा हा राजा. अगदी कलाप्रेमी सुद्धा होता. हिंदवी स्वराज्याची थोरली गादी म्हणून सातारला ओळख निर्माण झाली ती छत्रपती शाहू महाराजांमुळे.

 छत्रपती शाहू महाराजांची युद्धनीती, संघटन कौशल्य, नेतृत्वगुणामुळेच  पेशवे असतील, होळकर असतील, शिंदे असतील, दाभाडे असतील जाधवराव असतील  असे अनेक शूरवीरांना संघटित करून छत्रपती शाहू महाराज याच्याकडे तब्बल बाराशे पेक्षा जास्त सरदर होते या सर्वांना मार्गदर्शनाने नेतृत्व करून अखंड भारतभर मराठ्यांचा झेंडा फडकाऊन हिंदवी स्वराज्याचे हिंदवी साम्राज्यामध्ये विस्तार केला. शांत स्वभाव मुळे त्यांना पुण्यश्लोक सुद्धा म्हटले जाते. अजातशत्रुत्वाचा मूर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांच्या स्वभाव पाहून.  शत्रूला सुद्धा घात करण्याची इच्छा होऊ नये असा राजा. म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय.

©®नितीन घाडगे 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...