हिंदवी स्वराज्याचे अखंड मराठा साम्राज्यात रूपांतर करणारे, साताऱ्यात बसून दिल्लीचा बादशहा ठरवणारे, ज्यांच्या काळात मराठा साम्राज्याने त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ पाहीला असे छत्रपती शाहू महाराज (सातारा संस्थान) यांच्या स्मृतिदिनानिमित्त मानाचा मराठी मुजरा"🙏🏻🙏🏻🙏🏻⚔️⚔️⚔️🚩🚩🚩

"छत्रपती शाहू महाराज (सातारा संस्थान)"
१८ मे १६८२ रोजी या स्वराज्याचे राजपुत्र जन्माला आले. आपल्या वडिलांप्रमाणेच म्हणजे छत्रपती शंभूराजांप्रमाणे मोगली गोटात राजधानी रायगडाच्या पाडावानंतर कैद भोगली. १२ जानेवारी १७०८ रोजी शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक झाला. पण याच शंभूपुत्राचे इतिहासाला कलाटणी देणारे वर्ष ठरले १७१८ साल कारण यांनी दिल्ली सल्तनत या साली नामोहरम केली.
आपल्या बेचाळीस वर्षांच्या कारकिर्दीत मोगलशाहीचा दोनदा दारूण पराभव केला. हिंदुस्थानचा तीनचतुर्थांश भाग मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली आणून सातारा हे केंद्रस्थान बनवले.
१५ डिसेंबर १७४९ रोजी छत्रपती शिवरायांचे नातू आणि छत्रपती शंभूराजांचे पुत्र अखंड मराठा साम्राज्याचे सम्राट अजातशत्रू छत्रपती शाहूराजे शंभूराजे भोसले यांचे निधन झाले.
"हिंदवी स्वराज्याचे अखंड मराठा साम्राज्यात रूपांतर करणारे, साताऱ्यात बसून दिल्लीचा बादशहा ठरवणारे, ज्यांच्या काळात मराठा साम्राज्याने त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ पाहीला असे छत्रपती शाहू महाराज (सातारा संस्थान) यांच्या स्मृतिदिनानिमित्त मानाचा मराठी मुजरा"
🙏🏻🙏🏻🙏🏻⚔️⚔️⚔️🚩🚩🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...