आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२९ डिसेंबर
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२९ डिसेंबर १६६५*
छत्रपती शिवराय मिर्झाराजे आणि सैन्यासह विजापुरापासून
५ कोसांवर पोहचले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२९ डिसेंबर १६६९*
छत्रपती शिवरायांची मुरूड जंजिऱ्याच्या सिद्दी जौहर विरूद्ध मोहीम. पण यात मराठ्यांना अपयश आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२९ डिसेंबर १६७६*
१६७६ मध्ये मोरोपंत पिंगळेच्या नेतृत्वाखाली १०,००० फौज देऊन महाराजांनी जंजिरा किल्ला घेण्याची मोहीम आखली.
लढाऊ नौकांनी जंजि-यावर लहान तोफांनी मारा केला, पण उपयोग झाला नाही. तेव्हा मोरोपंतानी हवालदार सुभानजी मोहिते, सरनोबत सुभानजी खराडे व कारकून मल्हार नारायण सबनीस यांच्या करवी अष्टागरातील कोळीवाडीचा प्रमुख लाय पाटील व त्याच्या पद्मदुर्गावर चाकरी करणा-या काही शूर सोनकोळ्यांना पद्मदुर्गावर बोलावून जंजिरा घेण्याची मोहीम सांगितली. शूर लाय पाटलाने ८-१० सहका-यांसह रात्री दोरखंडाच्या शिडय़ा बांधून जंजिरा तटावर प्रवेश मिळविला.
हबशांना त्याचा पत्ताही लागला नाही. मोरोपंताच्या सैन्याच्या तुकडीची लाय पाटील आणि त्याचे सहकारी पहाट फुटायच्या वेळेपर्यंत वाट पाहून थकले. सैन्य आले नाही म्हणून निराश होऊन दोराच्या शिडय़ा कापून त्यांनी माघार घेतली.
मोरोपंतांनी ह्या मोहिमेच्या अपयश स्वतः स्वीकारले. महाराजांना ही घटना कळताच त्यांनी लाय पाटलाचा सन्मान करण्यास त्याला बोलावले व त्यास पालखीचा बहुमान देऊ केला. पण त्या स्वराज्याच्या इमानी सेवकाने नम्रपणे तो बहुमान नाकारला. हे पाहून कौतुकाने महाराजांनी लाय पाटलासाठी गलबत बांधण्याचे फर्मान सोडले व त्यास "पालखी" असे नाव दिले. एका दर्यावीराचा यथोचित सत्कार महाराजांनीच करावा.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२९ डिसेंबर १७६१*
माधवरावांनी ऑगस्ट १७६१ ला निजामावर स्वारी करायचे ठरले. परंतु नुकत्याच पानिपतच्या युद्धात झालेल्या सैन्याच्या भयंकर नुकसानीमुळे माधवरावांनी निजामाशी थेट न भिडता आपले सैन्य निजामाच्या मुलुखात घुसवले. निजामाचा भाऊ सफदरजंगही फितूर होऊन मराठ्यांच्या मदतीला आला होता. या मोहिमेत आजारीपणाचे निमित्त करून रघुनाथराव सामील झालेले नव्हते. ते शनिवारवाड्यातच होते. निजाम मार्गावरची मंदिरे फोडत, जाळपोळ करत पुण्याच्या आग्रेयेस असलेल्या 'उरूळी- कांचन' या गावापाशी येऊन पोहोचला. निजामाच्या या हल्ल्यामुळे राघोबादादा गांगरून गेले. कारण यावेळेस निजामाला तोंड देण्याकरता पुण्यात फारशी फौजच नव्हती. आता लवकर हालचाल केली नाही तर निजाम पुणेही जाळेल, ही भीती वाटल्याने दि. २९ डिसेंबर १७६१ या दिवशी रघुनाथरावांनी निजामाशी घाईघाईने तह केला व त्या अन्वये २७ लक्ष रुपये वार्षिक उत्पन्नाचा मुलुखही तोडून देण्याचे कबूल केले. जानेवारी १७६२ मध्ये माधवरावांना या तहाची बातमी मिळाली. आता काहीही करता येऊ शकत नव्हते. शेवटी नाईलाजाने माधवराव पुण्यास परतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment