Posts

Showing posts from November, 2022

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१ डिसेंबर

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ डिसेंबर १६६१* छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन १ डिसेंबर १६६१ ला जव्हारचे पहिले विक्रमशहाराजे यांना भेटावयास आले होते. विक्रमशहा राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना मानाचा शिरपेच दिला. ज्या ठिकाणी छत्रपतींना शिरपेच दिला. त्या ठिकाणाला 'शिरपामाळ' असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जव्हार भेटीच्या वार्तेने दिल्लीच्या सत्ताधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. सुरतेच्या या छाप्यानंतर दिल्लीच्या मोगलांमध्ये आणि जव्हारच्या संबंधांमध्ये वितुष्टता निर्माण झाली होती.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ डिसेंबर १६६३* छत्रपती शिवरायांच्या भीतीने व दहशतीने घाबरून मुघल सरदार शाहीस्तेखान औरंगाबाद सोडून बंगालकडे रवाना झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ डिसेंबर १६६४* छत्रपती शिवरायांनी कोकणातील राजापूर व दाभोळ जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ डिसेंबर १६७५* छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये अजिंक्यतारा स्वराज्यात सामील करून घेतला. १ डिसेंबर १६७५ ते २५ जानेवारी १६७६च्या डिसें

श्रीगुरु चरित्र पारायण कसे वाचावेआणि नियम माहिती लवकरच श्रीदत्त जयंती येत आहे

Image
श्रीगुरु चरित्र पारायण कसे वाचावे आणि नियम माहिती  लवकरच श्रीदत्त जयंती येत आहे  दिनांक ०७/१२/२०२२ रोजी बुधवार मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमाला श्रीदत्तात्रेय जयंती आहेत  आपण या वेळी दरवर्षी प्रमाणे सात किवा तीन दिवसाचे श्रीगुरु चे चरित्र पठण करणार असाल तर आपण श्रीगुरु चरित्र विषयावर माहिती पाहू आणि याच बरोबर श्रीदत्त अवतारी श्रीगुरु बद्दल पुढील लेखात माहिती   घेऊ... श्री गुरुचरित्र हा श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीगुरूनृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांच्याबद्दलचा श्रीगुरूचरित्रग्रंथ आहे. श्री सरस्वती गंगाधर हे श्रीगुरूनृसिंहसरस्वतींचे एक शिष्य सायंदेव यांच्या पाचव्या पिढीतील होते. नृसिंहसरस्वतींच्या सात प्रमुख शिष्यांमध्ये सायंदेव यांचा समावेश होतो. सायंदेव -> नागनाथ ->देवराव -> गंगाधर -> सरस्वती गंगाधर अशी वंशावळ गुरुचरित्र देते. सरस्वती गंगाधरांना चरित्र लिहिण्याचा आदेश स्वतः श्रीनृसिंहसरस्वतींनीच दिला अशी माहिती श्रीगुरुचरित्रात दिली असून परंपरेनेही तशी श्रद्धा दत्त संप्रदायात आहे.  श्रीगुरुचरित्र लिखाण संपूर्ण माहिती:- (वेदतुल्य श्रीगुरुचरित्र हा कोण

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३० नोव्हेंबर १६४९* युक्तीने कार्य होतसे !...  इ.स. १६४९ च्या सुरुवातीपासून छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजीराजेंची सुटकेसाठी खटपट सुरु केली. शाहाजीसारखा मोहरा आपल्याला मिळतोय आणि शिवाजीमुळे दक्षिणेचा दरवाजा खुला होतोय या विचाराने खुष होऊन मुरादबक्षाने मार्च १६४९ आणि ऑगस्ट १६४९ मधे "तुमचा वकील पाठवणे" "तुम्ही हुजूर यावे म्हणजे मनसब व इनाम दिल्हा जाईल" या आशयाची पत्रे पाठवली. मुरादबक्षाने शाहाजीराजांना सोडवण्याचे प्रयत्न केले होते याचा पुरावा ३० नोव्हेंबर १६४९ च्या त्याच्या शाहाजीराजांना पाठवलेल्या पत्रात येतो, शाहजादा त्यात म्हणतो, "तुमची मोकळिक करण्याविषयी शिवाजीने लिहीले आहे. हल्ली आम्ही दिल्लीकडेस जात आहो. हुजूर पावल्यावर तुमचेविषयी अर्ज करून बंदोबस्त करून देऊ. तुमचा इतबारी वकील पाठवावा. तुम्हाकरिता पोषाख पाठवला आहे."  शिवाजी-मुरादचा पत्रव्यवहार आदिलशहाच्या कानी पडला आणि त्याचं धाबं दणाणलं, एकीकडून कर्नाटकातले शाहाजीराजांना मानणारे हिंदू संस्थानिक चिडून जाऊन तिकडे असलेल्या शाहाजीपुत्र संभाजीला

येळकोट येळकोटजय मल्हार! चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी.चंपा आणि षष्ठी दोन शब्द मिळून चंपाषष्ठी असा चंपा म्हणजे दिवशी भगवान कार्तिकेयाला चंपा पुष्प अर्पण केले जाते आणि षष्ठीतिथीमुळे या व्रताला चंपा षष्ठी असे नाव देण्यात आले आहे.

Image
येळकोट येळकोट जय मल्हार! चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी.चंपा आणि षष्ठी दोन शब्द मिळून चंपाषष्ठी असा चंपा म्हणजे दिवशी भगवान कार्तिकेयाला चंपा पुष्प अर्पण केले जाते आणि षष्ठीतिथीमुळे या व्रताला चंपा षष्ठी असे नाव देण्यात आले आहे. असा त्याचा अर्थ आहे. आजच्या पूजेत वांगी अर्पण करण्याचीही परंपरा आहे, म्हणून या व्रताला बैगन छठ सुद्धा काही ठिकाणी म्हणतात. या दिवशी भगवान शंकराच्या खंडोबाच्या रूपाची पूजा केली जाते. विशेषत: महाराष्ट्र, कर्नाटकात हे व्रत पाळले जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात. बैंगन छठाची कहाणी पौराणिक कथेनुसार, महादेव आपल्या भक्तांचे मणि-मल्हा नावाच्या दोन राक्षसांपासून संरक्षण करण्यासाठी प्रकट झाले. मार्गशीर्ष शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी खंडोबा नावाच्या ठिकाणी महादेवाने भैरवाचे रूप धारण करून मणि-मल्हाचा वध केला. त्यामुळे त्यांना खंडोबा म्हटले जाऊ लागले. दरवर्षी

मराठी आडनावे व त्यांची मुळ कूळे इतिहास...*

*☄️मराठी आडनावे व त्यांची  मुळ कूळे इतिहास...* *१) शकपाळ* श्रीनृपसातवाहन कालगणना=शक अनुसरणारे वंशीय. *२) मोरे* चंद्रगुप्त मौर्य कुळवंशीय. *३) चाळके* चालुक्य कुळवंशीय. *४) शेलार* शिलाहार वंशीय. *५) मालुसूरे* मल्ल कुळवंशीय. तान्हाजी मालुसूरे  सरदार. *६) कदम* कदंब कुळवंशीय. *७) साळवी* विजयनगर साळुव कुळवंशीय. जिंजी किल्ला बांधणारा रुद्राजी साळवी. *८) जाधव* श्रीभगवानश्रीकृष्ण यादव कुळवंशीय. *९) पालव* इराणमधील पहलवी  दक्षिणेतील पल्लव कुळ *१०) पवार* परमार कुळ. *११) सिंदे (शिंदे)* नागकूळ सिंद कुळवंशीय. सतारी=वारुळाची जागा पूजक कूळ. *१२) साळूंखे* सोळंकी कुळवंशीय. *१३) राऊळ* बाप्पा रावळ कुळवंशीय. रावळ=लहान राजा.रावळनाथ=राऊळनाथ. *१४) चव्हाण* चौहान कुळवंशीय. *१५) बागल* बागूल कुळ. *१६) राणे* राणा कुळवंशीय.  रामनगरचा राजा. *१७) दळवी* दळभार वाहणारे.सेनापती. पालवणीचा राजा. *१८) सूर्वे* सूर्यराव बिरुद धारण करणारा चव्हाण. शृंगारपुरचा राजा. *१९) सावंत* सा=सह.वंत=युक्त.श्री भवानी तरवार शिवरायांना देणारा "गोवले" चा पवार कुळांतील राजा.भोसले कुळांतील सावंतराय बिरुद धारण करणारा सावंतवाडीचा राजा. *२०

सेनापती बापट यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...।💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Image
सेनापती बापट यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...। 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 पांडुरंग महादेव बापट ऊर्फ सेनापती बापट (नोव्हेंबर १२, इ. स. 1880- नोव्हेंबर28 इ. स. 1967) हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक होते.  मुळशी सत्याग्रहाचे त्यांनी नेतृत्व केले म्हणून जनतेने त्यांना सेनापती ही पदवी बहाल केली महादेव तसेच गंगाबाई बापट यांचे हे पुत्र होत. त्यांचा जन्म पारनेर (जिल्हा अहमदनगर) येथे झाला. [२] त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक आणि बी. ए. पर्यंतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. त्यांनी अहमदनगरला मॅट्रिकची परीक्षा दिली, तेव्हा त्यांना संस्कृतची 'जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती' मिळाली.  त्यांना बी. ए. परीक्षेत इ. स. १९०३ साली उत्तीर्ण झाल्यावर मुंंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून ते इंग्लंडला गेले.  एडिंबरो येथे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पारनेर तालुक्यातील गणेशखिंड येथील गणपती मंदिरात ते राहत असत. या मंदिरापासून सेनापती बापटांचे पारनेर शहरातील मूळ घर यांदरम्यान मोठा भुयारी मार्ग आहे. या मार्गाची सध्या पडझड झाली आहे. त्यांचे पारनेर

वटगाव म्हणजे ‘नेग्रोदग्राम’ आत्ताच जयराम स्वामी वडगाव येथील अप्रचित माहिती पर लेख उपलब्ध करून देताना जयराम स्वामी याच्या कार्याची महती मिळते....ती जास्तीत जास्त लोकांना शेअर करावी

Image
साधारण 600 ते 650 वर्षापासून संतभूमी व व आणि स्वातंत्र सैनिकांची जणू खाणच अशा तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी हे स्थान ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्त्वाचं मानलं जातं.  सातारा सांगलीच्या बॉर्डरवर असणारे खटाव येथील किल्ले भूषण गड पासून जवळच असलेले एक छोटसं गाव परंतु ऐतिहासिक व अध्यात्मिक  दृष्ट्या खूप महत्त्वाचे ठिकाण.  असं सांगण्यात येतं अशी दंतकथा सांगण्यात येते की ह्या वडगावचं पूर्वीचे नाव हे वटगाव असं होतं. म्हजेच वटगाव म्हणजे ‘नेग्रोदग्राम’ होते. या ठिकाणी असणारे  संत शांतीलिंगाप्पा याची यांचे शिष्य कृष्णा स्वामी  यांना उपदेश केला की. वटग्रामी जाऊन या ठिकाणी असणाऱ्या शिवमंदिर हे खूप प्राचीन व भवानी शंकराचा प्रसिद्ध होतं या ठिकाणी उपासना चालू करावी. गुरूंच्या उपदेशानुसार शिव कृष्णा स्वामी यांनी या ठिकाणी येऊन उपासना चालू केली. कासार घाटावर मठश्री जयराम स्वामी वडग्राम या ठिकाणी आल्यानंतर श्री कृष्णाप्पास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपासना करत असताना ग्रंथनिर्मिती करण्यास सुरुवात केली. श्री जयराम स्वामी यांचा संत स्नेह फार होता. भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करत भारत भ्रमण करताना पंढरपूर

राहुल साखवळकरांची पोस्टइतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस यांची आज जयंती (२७ नोव्हेंबर १८७०) , विनम्र अभिवादन

Image
राहुल साखवळकरांची पोस्ट इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस यांची आज जयंती (२७ नोव्हेंबर १८७०) , विनम्र अभिवादन पारसनीस, दत्तात्रेय बळवंत  इतिहाससंशोधक व ऐतिहासिक साधनांचे संग्राहक. जन्म बोरगाव ता. कोरेगाव जि. सातारा येथे. आईचे नाव बयाबाई. पारसनीसांचे घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील मलवडीचे. बळवंतराव महसूल खात्यातील नोकरीनिमित्त सातार्या स आले व तेथेच हे कुटुंब स्थायिक झाले. पारसनीसांचे शिक्षण इंग्रजी सहावीपर्यंत झाले. त्यांच्या पत्नीचे नाव आनंदीबाई. त्यांना सहा मुलगे व दोन मुली झाल्या. पारसनीसांनी १८८७ मध्ये महाराष्ट्र कोकिळ हे मासिक सुरू केले. त्यातून मराठेशाहीतील पराक्रमी प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांच्याशी संबंधित कागदपत्रे प्रसिद्ध होत. १८९२ पर्यंत हे मासिक चालू होते. किर्तीमंदिर (१८९०) व झांशीच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांचे चरित्र (१८९४) ही दोन पुस्तके त्यांनी अस्सल कागदपत्रांच्या आधारे लिहून प्रसिद्ध केली. ऐतिहासिक साधनांचे संशोधन आणि संग्रह करीत असतानाच त्यांतील निवडक व महत्त्वाची कागदपत्रे प्रसिद्ध करता यावीत, म्हणून त्यांनी ह. ना. आपटे यांच्या सहकार्यान

मराठा साम्राज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती #श्रीमंत_उमाबाईसाहेब_खंडेराव_दाभाडे_जी पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजराबसादर (28.11.1753) 🙏चित्रकार © प्रमोद मूर्ती

Image
मराठा साम्राज्याच्या  पहिल्या महिला सरसेनापती  #श्रीमंत_उमाबाईसाहेब_खंडेराव_दाभाडे_जी  पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजराबसादर (28.11.1753) 🙏 चित्रकार © प्रमोद मूर्ती

विनम्र अभिवादन !**आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार , महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री**आदरणीय श्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्य स्मृतीस विनम्र अभिवादन !*🙏

Image
*विनम्र अभिवादन !* *आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार , महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री* *आदरणीय                                                                         श्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्य स्मृतीस* *विनम्र अभिवादन ! 🙏🙏🙏 💐🌹🌸🏵️🌹 *1962 भारत चीन युद्ध* त्यावेळी देशाकडे प्रभावी युद्ध सामुग्री न्हवती ! चीनने हिंदी चिनी भाई भाई म्हणत , भारतावर हल्ला केला ! भारताचे चीनच्या समर्थयापुढे टिकाव लागेना ! त्यावेळी कृष्ण मेनन यांना संरक्षण मंत्री पदावरुन काढुन , पंडित जवाहरलाल नेहरु यांनी , त्यावेळी *महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री , लहानपना पासून स्वातंत्र्य संग्रामात असलेल्या , लढाऊ मराठा वृत्तीच्या*   *श्री यशवंतराव भाऊराव चव्हाण* यांना देशाचे संरक्षण मंत्री केले ! त्यावेळी सर्वत्र *हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला !*  अशी भावना सर्व देशात व्यक्त होत होती ! ते मुख्यमंत्री होते , त्यावेळी *सह्याद्री* हे मुख्यमंत्री निवासस्थानाचे नांव होते ! त्यांना दिल्लीला जाताना मुंबई विमानतळपर्यंत निरोप दयायला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते ! ते पाहून जिकडे तिकडे

मुधोळ,कापशीकर घोरपडे घराणे आणि सावंतवाडीचे सावंत घराणे यांचे मूळचे आडनाव भोसले होते

Image
मुधोळ,कापशीकर घोरपडे घराणे आणि सावंतवाडीचे सावंत घराणे यांचे मूळचे आडनाव भोसले होते.भोसले चे घोरपडे तसेच भोसले चे सावंत कसे झाले हे ग्रांट डफ साहेब लिखित मराठ्यांची बखर यामध्ये पुढील प्रमाणे नमुद केले आहे. (हा ग्रांट डफ साहेब सातारच्या छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या काळात म्हणजे इंग्रजांनी इ.स 1818 साली नेमलेला पहिला पोलिटिकल agent होता तेव्हा त्यांच्या मनात मराठ्यांचा इतिहास जाणून घ्यायची उत्सुकता लागली त्याने अनेक ऐतिहासिक संदर्भ माहिती गोळा करून आपल्या मायदेशी परतल्यानंतर इंग्रजी भाषेत मराठ्यांची बखर हे पुस्तक लिहिले.पुढे त्यांचे इंग्रज अधिकारी कॅप्टन केपन याने बाबा साने यांच्या साहाय्याने मुंबई येथे मराठी भाषांतर केले.इ.स 1829 साली) जय शिवराय 🙏🚩

संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते?ह्याचे उत्तर म्हणून माझ्या वाचनात आलेली माहिती देत आहे.माधुरी दामले ह्यांच्याकडून फॉरवर्ड*संजीवन समाधी*

संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते? ह्याचे उत्तर म्हणून माझ्या वाचनात आलेली माहिती देत आहे. माधुरी दामले ह्यांच्याकडून फॉरवर्ड *संजीवन समाधी* नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था. पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक सदरील लेखात आहे. सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या सा-याच गोष्टी अत्यंत अलौकिक आहेत. जसा त्यांचा जन्म अलौकिक तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीय आहे. आजवर जगात केवळ भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच ही विशिष्ट अशी "संजीवन समाधी" घेतलेली आहे. सामान्यत: लोक जिवंत समाधी व संजीवन समाधी यात गल्लत करतात. त्यामुळे कोणा महात्म्यांनी जिवंत समाधी घेतलेली असेल तर त्याला लोक संजीवन समाधीच म्हणतात. वस्तुत: संजीवन समाधी ही जिवंत समाधी पेक्षा खूपच वेगळी आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचाही कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊनच देहपात होत असतो. परंतु या संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही, देहत्याग घडतच नसतो. या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटिल व विलक्षण

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२४ नोव्हेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२४ नोव्हेंबर १६७२* अली आदिलशहा द्वितीयचा मृत्यू  विजापूरचा आली आदिलशहा ह्याच्या मृत्युनंतर (२४ नोव्हेंबर १६७२) आदिलशाहीचे सारे वैभव संपुष्टात आले. होते. त्याच्या नंतर त्याचा वारस सिकंदर हा वयाने लहान असलेला गादीवर आला.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२४ नोव्हेंबर १६८३* !! शंभू ने सुरु केले तांडव रुद्राचे तांडव !! "छत्रपति शंभूराजे" केवळ ४० मराठे सैन्यासह स्टीफन उर्फ जुवे बेटावर उतरले. मराठ्यांच्या तोफांच्या आवाजाने गोव्यातील लोक व शस्त्र हाती धरलेले ख्रिश्चन लोक "पादरी" शहराच्या तटबंदीकडे पळत सुटले. ४०० फिरंग्यांपैकी ३०० जण जवळच्या टेकडीपर्यंत जाईपर्यंत जिवंत राहिले. टेकडीवरचे मराठे मागे फिरले व थोड्याच वेळात मराठ्यांची नवी तुकडी फिरंग्यांवर तुटून पडली. सर्वत्र अंदाधुंदी माजली. धीर खचलेले फिरंगी सैन्य सैरावैरा पळत सुटले. ४ मराठा घोडेस्वारांनी फिरंगी व्हाइसरॉय चा पाठलाग सुरु केला पण त्यांच्या तावडीतून तो जखमी होऊन वाचला आणि कसाबसा खाडीपर्यंत जाऊन पोचला. त्याला व कॅप्टनला एका जहाजात बसून पळून जाताना "छत्रपती शंभ

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२५ नोव्हेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२५ नोव्हेंबर १६५४* छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतणे उमाजीराजे संभाजीराजे भोसले यांचा जन्म शहाजीराजे आणि मातोश्री जिजाऊ याचे थोरलेसंभाजीराजे हे ज्येष्ठ पुत्र, उमाजी हे थोरल्या संभाजीराजांचे पुत्र. शहाजीराजे इ.स. १६६४ मध्ये वारले तेंव्हा हा उमाजी दहा वर्षांचे होते.  उमाजीस विजापूरकरांतर्फे जहागीर होती. ऐन तिशीच्या सुमारास हे आपल्या तलवारीच्या बळावर पराक्रम गाजवत असल्याचा पुरावा इ.स.१६८३ च्या एका महजरावरून मिळतो. उमाजींना बहादूरजी नावाचा एक पुत्र होता. त्यांचादेखील एक हुकूम उपलब्ध आहे.  मालोजीराजे भोसले यांचे फर्जंद शहाजी संभजी यांचे फर्जंदौमाजी याचे बहादूरजी.....’ सरचा हुकूम १२ डिसेंबर १६८९ चा आहे.  उमाजी शिवाय थोरल्या संभाजीराजांना सुरतसिंग आणि मातोजी असे आणखी दोन पुत्र असल्याचे पुरावे कानडी साधनात मिळतात. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२५ नोव्हेंबर १६५९* अफजलखान मोहीम फत्ते करून रात्री छत्रपती शिवाजी महाराज सैन्यानिशी पुढच्या मोहिमेला निघाले. ११ नोव्हेंबर १६५९च्या पहाटे, म्हणजेच खानाच्या दारुण पराभवानंंतर १५ तासांच्या आत महाराज वाईत ये

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२३ नोव्हेंबर १६६५*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२३ नोव्हेंबर १६६५* किल्ले पुरंदरच्या ऐतिहासिक तहामध्ये ठरल्याप्रमाणे विजापूरच्या मोहीमेसाठी "छत्रपती शिवराय" मुघलांकडून लढण्यासाठी "मिर्झाराजे जयसिंग" यांच्या सोबत विजापूरच्या दिशेने निघाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२३ नोव्हेंबर १६८१* छत्रपती संभाजीराजांच्या आदेशाने स्वराज्याचा धाक मुघल सैन्यावर ठिकठीकानी सुरुच होता. आजच्या दिवशी तर चक्क औरंगजेब बादशाह मुक्कामी असलेल्या बुऱ्हाणपूर बालेकील्ल्याजवळील दारुगोळ्याच्या दोन कोठारांना आग लावून मुघलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण करण्याची संभाजीराजेंची चाल यशस्वी झाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२३ नोव्हेंबर १६८३* छत्रपती संभाजीराजे यांनी गोव्याची हद्द सोडून रायगडास परतले व कवी कलश आणि अकबर यांस पोर्तुगीजांशी तह करण्यास मागे ठेवले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२३ नोव्हेंबर १७४०* चिमजीआप्पांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांनी उत्तररेत चार मोहिमा केल्या. त्यापैकी पहिली स्वारी म्हणजे धवलपूरची स्वारी तारीख २३ नोव्हेंबर १७४०. पेशवे गोपिकाबाईसह पुण्याहून निघून त्यानी उत्तरेस प्रयाण केले. धवलप

ज्ञानदेवांनी नेवासे येथे ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहली तो खांब..

Image
ज्ञानदेवांनी नेवासे येथे ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहली तो खांब..

एकादशीची यात्रा होत आहे. या यात्रेला गेल्या 725 वर्षांपासूनचा इतिहास आहे.

कोरोना व्हायरसमुळे असलेले निर्बंध रद्द झाल्यानंतर आळंदीमध्ये पहिल्यांदाच कार्तिकी एकादशीची यात्रा होत आहे. या यात्रेला गेल्या 725 वर्षांपासूनचा इतिहास आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा 726 वा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी निमित्तानं आळंदींमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलीय. आज (20 नोव्हेंबर) रोजी असलेली कार्तिकी एकादशी आणि मंगळवारी (22 नोव्हेंबर) रोजी होणारा संजीवन समाधी सोहळा या दोन्ही कार्यक्रमानिमित्त अलंकापुरीत अनेक दिंड्या दाखल झाल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे असलेले निर्बंध रद्द झाल्यानंतर आळंदीमध्ये पहिल्यांदाच कार्तिकी एकादशीची यात्रा होत आहे. या यात्रेला गेल्या 725 वर्षांपासूनचा इतिहास आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदी येथील यात्रेचे महत्त्व भाऊ महाराज फुरसुंगीकर यांनी सांगितले आहे. फुरसुंगीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,'संत ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक एकादशीला संजीवन समाधी घेतली होती. त्यानंतर भगवंताने म्हणजे विठ्ठलानं माझी कार्तिकीची एकादशी साजरी केली जाते तसेच तुझी देखील कार्तिक कृष्ण एकादशी साजरी केली जाईल असा आशीर्वाद श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांना दिला. जगदगुर

प्रथम कुलदेवता पुजन का करावे ?

प्रथम कुलदेवता पुजन का करावे ? कुलदेव म्हणजे बाबा व कुलदेवी म्हणजे आई. त्याच प्रमाणे प्रत्येक कुल - घराण्याला कुलदेवता प्राप्त असतात. जसे आई बाबां शिवाय बालकाचा सर्वांगीण विकास व त्याचे संरक्षण होणे कठीण असते, तसेच कुलदेवतां शिवाय एखाद्या कुलाचे रक्षण व पोशण कठीण असते.  प्रत्येक स्थानाची एक उर्जा असते व तसेच त्या स्थानावर उभ्या राहीलेल्या वास्तुची देखील विशीश्ट उर्जा असते. त्या वास्तुत राहणार्या प्रत्येक व्यक्तीचे विचार, आचरण, कर्म, ईत्यादी गोष्टींचा प्रभाव एकत्रीत पणे तेथील वास्तुचे वलय-उर्जेवर होत असतो.  घरात वाईट मनोव्रुत्तीची व्यक्ती असल्यास, तीच्या नकारात्मक ऊर्जेमुळे घरातील वातावरण दुषीत बनते व तसेच घरावर एखाद्याची वाईट नजर असल्यास किंवा करणी-वास्तु अथवा कुलदेवता बंधन सारखे अघोरी द्रुष्ट प्रयोग झाल्यावर देखील घरातील वातावरण कलुशीत होउन उर्जा नकारात्मक जास्त जाणवते.  तर एखादी सकारात्मक व्यक्ती घरात नीयमीत अध्यात्मीक साधना- नामस्मरण करणारी असेल तर त्या एका व्यक्तीच्या साधनेच्या बळाने संपुर्ण घरा भोवती सकारात्मक उर्जेचे कवच तयार होते. जर त्या साधक व्यक्तीस कुलदेवता अथवा सद्गुरू सिद्

सातारा येथील करंडी-झेरवाडी कर जाधवराव इनामदार-*

Image
*सातारा येथील करंडी-झेरवाडी कर जाधवराव इनामदार-* मूळपुरुष तुकोजीराव पुत्र दोन १) चंदाजीराव  करंडीकर घराणे  आणि,  १) येसाजीराव झरेवाडीकर  यास तीन पुत्र व एक कन्या १) भवानराव  २) यशवंतराव 3) रामराव... यांचे पुत्र भिवराव होय यास तीन पुत्र १)    भवानराव १) माधवराव ३) नारायणराव यातील भवानराव यांचे उल्लेख सदर पत्रातून आले आहे __________________  पत्र चिटणीशी इ. स. १७६३-६४ आर्या सितैन मया अलफ  रबिलावल१४ श्री जानोजी भोसले सेनासाहेबसुभा  हे परराज्यात गेले होते याजकरितां यांची वतने वगैरे गांव जप्त केले होते;त्यास मशारनिले सरकारांत येऊन भेटले,  याजकरितां यांची वतने वगैरे मोकळी करून सुदामा प्रमाणे चालवणै म्हणोन  पत्रे ३परळीचे देशमुखी विशी पत्रे १अवचितराव गणेश १व्याकाजी माणकेश्वर व विष्णू नरहर १  भावनी जाधव व कारकून       किल्ले सजणगड ____ ३ सदर  जाधव घराणे हे किल्ले सज्जनगड येथे तत्कालीन काळापासून  रामदासी नवमी उत्सवात धनुष्य बाणा चे मान या करंडीकर-झेरवाडीकर  जाधव घराण्यात आहे आजपण दरवर्षी झेरवाडीतील जाधव घराणे येथे रामनवमी उत्सवा साठी जातात सदर  घराण्यातील अभ्यास करताना आढळल्या मुळे येथे दिले आहे

तीन शिगे व तीन डोळे असलेले बैल आपण कधी पाहिला आहे का?तुम्हांला खोटं वाटेल पण.पण निसर्गाचा चमत्कार कधी कधी पाहायला मिळतो .....असंच जटाशंकर धाम बुंदेलखंड पासून 15किमी अंतरावरती आहे

Image
तीन शिगे व तीन डोळे असलेले बैल आपण कधी पाहिला आहे का?तुम्हांला खोटं वाटेल पण.पण निसर्गाचा चमत्कार कधी कधी पाहायला मिळतो ..... असंच जटाशंकर धाम बुंदेलखंड पासून  15किमी अंतरावरती आहे.  वेदांनी बैलाला धर्माचा अवतार मानले आहे. जेव्हा नंदीबैलाचा विचार केला जातो तेव्हा भगवान शंकराच्या मुख्य गणापैकी असणारा एक नंदीच आहे  बर का?  मध्यप्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यातील  बुंदेलखंड जवळील जटाशंकर धाम, येथील केदारनाथ येतील. बैलाच्या निधनाची बातमी वाचली. टीव्हीवर पाहायला मिळाली.. आणि आश्चर्य मध्ये त्या बैलाला  चक्क तीन सिंगव तीन डोळे होते.  आजारपणामुळे या बैलाचा मृत्यू झाला असला तरी तेथील देवस्थान समितीने. त्या बैलाची हिंदू रिवाजानुसार अंत्यसंस्कार केले. पंधरा वर्षे ज्या ठिकाणी बसत होता त्याच ठिकाणी त्या बैलाने आपला जीव सोडला.आता त्याच जागेवर त्याची समाधी होणार आहे.. आणि त्याच ठिकाणी एक स्मृतीसह बांधून त्याचा विकास करणार आहेत.  साधारण 15 वर्षांपूर्वी हा बैल जटाशंकर या ठिकाणी फिरत फिरत आला. परंतु तीन शिंगे आणि तीन डोळे यामुळे या ठिकाणचा आकर्षण बिंदू ठरला. शिवमंदिर व पर्वतांनी गजबजलेला प्रदेश आहे. या ठिकाण

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१९ नोव्हेंबर

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१९ नोव्हेंबर १६६१* छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमारे २००० स्वार जुन्नर परगण्यात खंडणी वसूल करीत असल्याची खबर शाईस्तेखानाला पुण्यात समजली. म्हणून शाईस्तेखानाने जाधवराव, शेख हमीद, ईस्माईलखान, सैफ खान वगैरे सरदारांस जुन्नर व अंबेगाव परगण्यात रवाना केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१९ नोव्हेंबर १६६५* पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराज सरनौबत नेताजी पालकरांसह ९००० फौज घेऊन मिर्झाराजांच्या कुमकेस विजापूरस्वारी साठी रवाना. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१९ नोव्हेंबर १६६७* १९ नोव्हेंबर १६६७ ते २२ नोव्हेंबर या काळात छत्रपती शिवप्रभुचे वास्तव्य गोमंतक भूमीत कोलवाळ गावात होते. पोर्तुगिजांचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज दोन हजार घोडदळ ३००० पायदळासमावेत कोलवाळ येथे आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे व पोर्तुगिजांचे युद्ध कोलवाळ किल्ल्याच्या परिसरात झाले. पोर्तुगिजांचा विरोध फार वेळ टिकला नाही. मराठे सैनिक बार्देशमध्ये घुसले. बार्देशस्वारी बाबतची दुसरी बाजू महत्त्वाची आहे. सन १६६७ मध्ये असणारा पोर्तुगीज गव्हर्नर साव्हेसेंती याने १