आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२४ नोव्हेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ नोव्हेंबर १६७२*
अली आदिलशहा द्वितीयचा मृत्यू 
विजापूरचा आली आदिलशहा ह्याच्या मृत्युनंतर (२४ नोव्हेंबर १६७२) आदिलशाहीचे सारे वैभव संपुष्टात आले. होते. त्याच्या नंतर त्याचा वारस सिकंदर हा वयाने लहान असलेला गादीवर आला. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ नोव्हेंबर १६८३*
!! शंभू ने सुरु केले तांडव रुद्राचे तांडव !!
"छत्रपति शंभूराजे" केवळ ४० मराठे सैन्यासह स्टीफन उर्फ जुवे बेटावर उतरले. मराठ्यांच्या तोफांच्या आवाजाने गोव्यातील लोक व शस्त्र हाती धरलेले ख्रिश्चन लोक "पादरी" शहराच्या तटबंदीकडे पळत सुटले. ४०० फिरंग्यांपैकी ३०० जण जवळच्या टेकडीपर्यंत जाईपर्यंत जिवंत राहिले. टेकडीवरचे मराठे मागे फिरले व थोड्याच वेळात मराठ्यांची नवी तुकडी फिरंग्यांवर तुटून पडली. सर्वत्र अंदाधुंदी माजली.
धीर खचलेले फिरंगी सैन्य सैरावैरा पळत सुटले. ४ मराठा घोडेस्वारांनी फिरंगी व्हाइसरॉय चा पाठलाग सुरु केला पण त्यांच्या तावडीतून तो जखमी होऊन वाचला आणि कसाबसा खाडीपर्यंत जाऊन पोचला. त्याला व कॅप्टनला एका जहाजात बसून पळून जाताना "छत्रपती शंभूराजें"नी पहिले व संतापाने बेभान झालेल्या छत्रपती शंभूराजेंनी त्यांचा पाठलाग करण्यासाठी आपला घोडा पाण्यात घातला. "खंडोबल्लाळ चिटणीस" यांनी पाण्यात उडी मारून राजांना आडवले आणि राजांचा घोडा तीरावर आणला. छत्रपती शंभूराजेंच्या या रौद्र तांडवामुळे व्हाइसरॉयचे आणि फिरांग्यांचे धाबे दणाणले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ नोव्हेंबर १६९९*
स्वत: औरंगजेब बादशहा दख्खन काबीज करण्यासाठी प्रचंड फौजेनिशी आला व आजच्या दिवशी २४ नोव्हेंबर १६९९ रोजी त्याने साताऱ्यातील "किल्ले वसंतगड" ताब्यात घेतला व नंतर त्याचे नामकरण "किली-द-फतेह" केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...