विनम्र अभिवादन !**आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार , महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री**आदरणीय श्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्य स्मृतीस विनम्र अभिवादन !*🙏

*विनम्र अभिवादन !*
*आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार , महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री*
*आदरणीय                                                                         श्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्य स्मृतीस*
*विनम्र अभिवादन !
🙏🙏🙏
💐🌹🌸🏵️🌹

*1962 भारत चीन युद्ध*
त्यावेळी देशाकडे प्रभावी युद्ध सामुग्री न्हवती ! चीनने हिंदी चिनी भाई भाई म्हणत , भारतावर हल्ला केला !
भारताचे चीनच्या समर्थयापुढे टिकाव लागेना ! त्यावेळी कृष्ण मेनन यांना संरक्षण मंत्री पदावरुन काढुन , पंडित जवाहरलाल नेहरु यांनी , त्यावेळी *महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री , लहानपना पासून स्वातंत्र्य संग्रामात असलेल्या , लढाऊ मराठा वृत्तीच्या*
  *श्री यशवंतराव भाऊराव चव्हाण* यांना देशाचे संरक्षण मंत्री केले ! त्यावेळी सर्वत्र

*हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला !*

 अशी भावना सर्व देशात व्यक्त होत होती !
ते मुख्यमंत्री होते , त्यावेळी *सह्याद्री* हे मुख्यमंत्री निवासस्थानाचे नांव होते ! त्यांना दिल्लीला जाताना मुंबई विमानतळपर्यंत निरोप दयायला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते !
ते पाहून जिकडे तिकडे लोक म्हणत होते
*हिमालयाच्या रक्षणासाठी 'सह्याद्री' धावला!* 
आणि 
खरोखरच *यशवंतराव चव्हाण* यांच्या सखोल अभ्यासपूर्ण कार्यपद्धतीची माहिती चीनने घेऊन , चीनने ताबडतोब एकतर्फी माघार घेतली ! त्यांनतर *यशवंतराव चव्हाण* यांनी अनेक देशांशी , त्यातल्या त्यात प्रामुख्याने रशियाशी संरक्षण व तंत्रज्ञान करार करून , शस्त्र निर्मितीचे , विमान निर्मिती चे कारखाने , *टाटा उद्योग समूहाच्या ("आर्थिक व तांत्रिक" ) मदतीने* देशात उभे केले ! व देशाला शस्त्र संपन्न करायला सुरुवात केली !(टाटांनीही अणुशक्ती केंद्र , कॅन्सर हॉस्पिटल प्रमाणेच , हेही कारखाने देशासाठी मदत म्हणून देशाला अर्पण केले )

तरीही त्या युद्धात हारल्या मुळे भारतीय सैन्य मानसिक दृष्टीने खचुन गेला होता ! त्यांना धीर देत, आपल्या फौजेमधील जवानांसोबत दिवाळी साजरी करतानाचा हा प्रसंग ! विशेष म्हणजे, ते त्यांच्या सोबत कुठे लांबुन भाषणं देत नाहीत, तर त्यांच्या सोबत मातीत बसुन ,त्यांच्याशी बोलत!
पण याची कधीच आणि कुठेही जाहिरातबाजी केली नाही ! की कुठल्याही निवडणुकीत याचा वापर करत,  प्रौढी मारत , बढाया मारून करून मतं पण मागितली नाहीत !
अशा या महान नेत्याला, महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करून , धरणे , पाणी , शेती , शिक्षण ,उद्योग , साहित्य, नाटक ,कला यासर्व क्षेत्रात संपूर्ण देशात आघाडीवर नेणाऱ्या , ग्रामीण भागातील शेतकरी,  तळागाळातील लोकांपर्यंत सत्तेत सहभागी व्हावं म्हणून देशात *पंचायत राज्य* निर्माण करणारे , 
*आदरणीय यशवंतराव चव्हाण* यांच्या या स्मृतीला *लाख लाख सलाम*

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४