सातारा येथील करंडी-झेरवाडी कर जाधवराव इनामदार-*
*सातारा येथील करंडी-झेरवाडी कर जाधवराव इनामदार-*
मूळपुरुष
तुकोजीराव
पुत्र दोन
१) चंदाजीराव करंडीकर घराणे
आणि,
१) येसाजीराव झरेवाडीकर
यास तीन पुत्र व एक कन्या
१) भवानराव
२) यशवंतराव
3) रामराव... यांचे पुत्र भिवराव होय यास तीन पुत्र
१) भवानराव
१) माधवराव
३) नारायणराव
यातील भवानराव यांचे उल्लेख सदर पत्रातून आले आहे
__________________
पत्र चिटणीशी
इ. स. १७६३-६४
आर्या सितैन मया अलफ रबिलावल१४
श्री
जानोजी भोसले सेनासाहेबसुभा हे परराज्यात गेले होते याजकरितां यांची वतने वगैरे गांव जप्त केले होते;त्यास मशारनिले सरकारांत येऊन भेटले,
याजकरितां यांची वतने वगैरे मोकळी करून सुदामा प्रमाणे चालवणै म्हणोन
पत्रे ३परळीचे देशमुखी विशी पत्रे
१अवचितराव गणेश
१व्याकाजी माणकेश्वर व विष्णू नरहर
१ भावनी जाधव व कारकून किल्ले सजणगड
____
३
सदर जाधव घराणे हे किल्ले सज्जनगड येथे तत्कालीन काळापासून रामदासी नवमी उत्सवात धनुष्य बाणा चे मान या करंडीकर-झेरवाडीकर जाधव घराण्यात आहे आजपण दरवर्षी झेरवाडीतील जाधव घराणे येथे रामनवमी उत्सवा साठी जातात सदर घराण्यातील अभ्यास करताना आढळल्या मुळे येथे दिले आहे
झरेवाडी, सज्जन गड येथील जाधव इनामदार!!!
जाधव यांचे सज्जन गडावर मानकरी असलेले ची नोंद .मानकरी जाधव गडावर हा धनुष्य बाण घेऊन दासनवमी रोजी जातात .१०० वर्षांअगोदरच्या या घराण्यातील भांडयांवर जाधवराव इनामदार असे उल्लेख आहेत .
तर करंडीकर जाधव यांकडे मुळ पाटीलकी असुन झेरवाडी येथे पाटीलकी वतन आढळून आले नाही अथवा आमच्या पर्यतं नोंदी आले नाही कारण सदर दोन्ही गावातील अंतर खुप कमी आहे व छत्रपती थोरले शाहू महाराजांनी आपल्या राज्याभिषेक नंतर जो इनाम दिले त्याठिकाणी करंडीकर-झेरवाडीकर जाधव घराण्यातील लोकांना लोकवस्ती केले आहे
फोटो तील वास्तू आम्ही स्वतः बघितली आहे,
या दोन्ही गावातील अनेक सरदार छत्रपती सातारकर महाराजांच्या हुजूर कडे व खाजगी कडे होते व शिलेदार म्हणून अनेक लढवय्या वीर या दोन्ही गावातील जाधव-जाधवराव इनामदार घराण्यात झाले आहेत याबद्दल उल्लेख पून्हा कधीतरी देऊ
.............
तळटीप:
मागील अनेक अभ्यासदौर्यात या घराण्याच्या वंशजां कडून १०० वर्षे अगोदरच काही जुन्या काळातील वस्तू
दाखवण्यात आल्या होत्या, त्यावर जाधवराव असे उल्लेख आढळतात ।
पण अजुनही कागदपत्रे उल्लेख जाधव आहेत
आपले
मा श्री. संतोष झिपरे
अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष
९०४९७६०८८८
Comments
Post a Comment