आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*९ नोव्हेंबर १६४८*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*९ नोव्हेंबर १६४८*
मुस्तफाखानचा मृत्यू
शाहजी राजाला पकडल्यावर आदिलशाहने मुस्तफाखानला त्याला विजापूरला पाठवायला सांगितले. पण ते करण्यापूर्वीच मुस्तफाखान आजारी पडला व त्याची प्रकृती खालावत गेली. शाहजी राजाला विजापुरास नेण्याची जबाबदारी त्याने अफझलखानवर सोपवली. त्याच्या अधिकाऱ्यांना वेंकट नाईकशी युद्ध चालू ठेवण्याचे आदेश दिले गेले व ९ नोव्हेंबर १६४८ ला मुस्तफाखान मरण पावला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*९ नोव्हेंबर १६५९*
"किल्ले प्रतापगडावर "अफजलखान भेटीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज "छत्रपती शिवाजी महाराजांनी" आपल्या निवडक मावळ्यांची नियोजन बैठक घेऊन प्रत्येकाला कामाचे वाटप व इशारतीचे कोडवर्क दिले ....!!
राजांनी प्रत्येक योध्याबरोबर वयक्तिक भेट घेतली. रणनीती अशी होती, ठरल्यावेळेप्रमाणे भेट होणार, भेटीच्या खानाला मारल्याच्यानंतर, तोफांना बत्ती दिली जाईल (हीच इशारत होती). आता मुख्य योजना, राजांनी सैन्याचे ४ प्रमुख भाग केले होते, १ ला भाग नेतोजी पालकरांबरोबर ७ हजार घोडदळ दिलं, त्यांनी वाई सांभाळायची, २ रा मोरोपंतांजवळ ५ हजार फौज दिली आणि त्यांना पारघाटमाथा व उतार, ३ रा जेधे व बांदल देशमुखांकडे ३५०० सैन्य देवून, पार छावणीजवलील जंगल आणि ४ था शिळीमकर यांजवळ ३००० सैन्य देऊन वोचेघोळीची नाळ अडवून धरावे, ही मुख्य योजना होती [ ह्यांना इशारा म्हणजे तोफेचा आवाज ], तर त्या दिवशी शिवाजींनी हशमाना मेजवानी द्यायचं ठरलं होतं ती सर्व जबाबदारी तानाजी मालुसरे यांवर होती, आणि तोफेचा आवाज झाल्यावर ह्यांची सुद्धा तिच अवस्था करणे , हे राजांनी बरोबर समजावलं होत, गडावर १५०० फौज होती, तसेच बाजीप्रभूंना १२०० फौज देऊन कामगिरी दिली होती . एकही माणूस जिवंत जाता कामा नये याची तजबीज केली होती. त्यारात्री सर्वांनी एकत्र भोजन केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*९ नोव्हेंबर १६८२*
औरंगजेबाचा अधिकारी अबु मुहम्मद याने दक्षिणेच्या भुगोलाची (सह्याद्रीची) माहिती औरंगजेबास दिली, त्याची नोंद..!
औरंगजेबाचे सैन्य चौफेर मराठ्यांचा बंदोबस्त करीत होते. मराठे औरंगजेबाच्या ठाण्यावर आणि आसपासचे भागातून चौथ वसूल करीत होते. विशेषतः ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, इ.स.१६८२ मध्ये हे हल्ले होत होते असे दिसते. नाशिक, बागलाण, अहमदनगर, पेडगाव, सोलापूर, सातारा, पुरंदर (पुणे-चाकण), शिरवळ या भागात चकमकी चालू होत्या. परकीय प्रदेशात लढाई करणे म्हणजे त्यास भुगोलाचे ज्ञान असणे जरुर असते. बादशाही सैन्यात दक्षिणेचा भुगोल नद्या, डोंगर, दऱ्या, रस्ते, घाट इत्यादी) माहीती असणारा अबु मुहम्मद नावाच्या अधिकाऱ्यास मराठांच्या मुलखातील घोडखिंडीची माहीती करुन घेण्याबद्दल सांगण्यात आल्यावर त्याने मराठ्यांच्या प्रदेशात जाण्यास ३६० घाट व खिंडी आहेत व ६५ घाट असे आहेत की जिथुन हत्ती उंट वैगरे जाऊ शकतात व बाकी खिंडीमधील वाटा अरुंद असल्याची माहिती औरंगजेब बादशहाकडे दिली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*९ नोव्हेंबर १७२८*
गोदावरी ओलांडून चिमाजीअप्पा बागलाण खानदेशमार्गे माळव्याकडे निघाले. त्यांच्याकडे अंदाजे २२००० फौज होती. उदाजी पवार, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, बाजी भिवराव रेठरेकर, अंताजी माणकेश्वर, गणपतराव मेहेंदळे असे ताज्या दमाचे शिपाईगडी होते. हे सर्वजण थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या तालमीतले. त्यामुळे विद्युत वेगाने हालचाली करणे त्यांच्या नसानसात भिनलेले होते. रोज ३०/३० कोसांचे मोठे मोठे पल्ले ओलांडत मजल दरमजल करीत मराठी फौजा बुन्हाणपूरनजीक आल्या. हे कळताच नंदलालने त्याची माणसे भेटीसाठी पाठविली. त्यांच्या मदतीने मराठी फौजांनी धर्मपुरी, महेश्वर, अकबरपुरा या दरम्यान नर्मदा ओलांडली आणि ते माळव्यात शिरले. होळकरांच्या चरित्रात उल्लेख आढळतो की हा नंदलाल, मराठ्यांनी नर्मदा ओलांडल्यानंतर २०० स्वारानिशी मल्हारराव होळकरांना येऊन भेटला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*९ नोव्हेंबर १७३९*
शाहु महाराजांचे संभाजीराजेंना (कोल्हापूर) पत्र
बाजीराव पेशव्याने पोर्तुगीजांशी युद्ध करीत असताना संभाजीराजांच्या मुलूखात धुमाकूळ घालून कारण नसताना संभाजीराजेंची काही ठाणी ताब्यात घेतली. तेव्हा प्रचंड नाराज होऊन राजेंनी शाहू महाराजांकडे त्यांच्या पेशव्याच्या कृत्याचा खुलासा मागितला. यावर दि. ९ नोव्हेंबर १७३९ रोजी महाराजांनी लिहून पाठविले की, " तुम्ही संदेह मानू नये. तुमची आमची भेट व्हावी. तुम्हापेक्षा आम्हास काय थोर
आहे ? "
महाराजांनी संभाजीराजेंना भेटीला बोलाविले आहे हे समजताच आपल्या हातचा प्रदेश जाणार असे वाटून तो प्रदेश आपल्या चिरंजीवाचे नावे करुन द्यावा अशी बाजीरावाने महाराजांकडे मागणी केली. पण बाजीरावाची मागणी धुडकावून संभाजीराजेंना भेटीस बोलावून बाजीराव पेशव्याने घेतलेली राजेंची सर्व ठाणी शाहू महाराजांनी राजेंना परत केली.
"तुम्हापेक्षा आम्हास काय थोर आहे ?" अशी वाक्ये केवळ पत्रात लिहिण्यापुरती नव्हे तर महाराज मनापासून तसे मानित होते, हे यामधून सिद्ध होते. आपल्या आईचे संस्कार व रक्ताची नाती महाराज आयुष्यभर विसरले नाहीत. शिवरायांच्या स्वराज्याची जबाबदारी शाहू महाराजांनी समर्थपणे पेललीच पण त्याचबरोबर आपल्या धाकट्या बंधूप्रती असणारी थोरल्या भावाची जबाबदारी पार पाडण्यातही महाराज कुठेच कमी पडले नाहीत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment