आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२३ नोव्हेंबर १६६५*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२३ नोव्हेंबर १६६५*
किल्ले पुरंदरच्या ऐतिहासिक तहामध्ये ठरल्याप्रमाणे विजापूरच्या मोहीमेसाठी "छत्रपती शिवराय" मुघलांकडून लढण्यासाठी "मिर्झाराजे जयसिंग" यांच्या सोबत विजापूरच्या दिशेने निघाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२३ नोव्हेंबर १६८१*
छत्रपती संभाजीराजांच्या आदेशाने स्वराज्याचा धाक मुघल सैन्यावर ठिकठीकानी सुरुच होता.
आजच्या दिवशी तर चक्क औरंगजेब बादशाह मुक्कामी असलेल्या बुऱ्हाणपूर बालेकील्ल्याजवळील दारुगोळ्याच्या दोन कोठारांना आग लावून मुघलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण करण्याची संभाजीराजेंची चाल यशस्वी झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२३ नोव्हेंबर १६८३*
छत्रपती संभाजीराजे यांनी गोव्याची हद्द सोडून रायगडास परतले व कवी कलश आणि अकबर यांस पोर्तुगीजांशी तह करण्यास मागे ठेवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२३ नोव्हेंबर १७४०*
चिमजीआप्पांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांनी उत्तररेत चार मोहिमा केल्या. त्यापैकी पहिली स्वारी म्हणजे धवलपूरची स्वारी तारीख २३ नोव्हेंबर १७४०. पेशवे गोपिकाबाईसह पुण्याहून निघून त्यानी उत्तरेस प्रयाण केले. धवलपूर येथे तारीख १२ ते १९ मे १७४१ ह्या मुदतीत सवाई जयसिंगास भेटून ते ७ जुलैस पुण्यास परत आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२३ नोव्हेंबर १७४६*
तेरेखोल किल्ला (Terekhol Fort) पोर्तुगीज्यांच्या ताब्यात
तेरेखोल नदीच्या उत्तर किनाऱ्यावर १७ व्या शतकात सावंतवाडीचे महाराजा खेम सावंत भोसले यांनी बांधला होता. तेरेखोल नदीतील जहाजांच्या वाहतुकीला अभय देण्यासाठी हा किल्ला वापरात होता. किल्ल्यावर सुरुवातीला सावंतवाडीचे महाराजा खेम सावंत भोसले यांनी १२ तोफा संरक्षण करण्यासाठी ठेवल्या होत्या तसेच एक बरॅक सैनिकांन साठी बांधली होती.
१७४६ मध्ये गोव्याचा ४४ वा व्हाईसरॉय याच्या निगराणी खाली पेड्रो मिगेल डी आल्मेडा, मार्किस डी अल्लेना, कंडे डी असुमार यांनी सावंतवाडीचे महाराज खेम सावंत भोसले यांच्या विरुद्ध युद्ध पुकारले. १६ नोव्हेंबर १७४६ रोजी पेड्रो मिगेल डी आल्मेडा याने त्यांचे जहाज हे कैसुवा नदी पर्यत आणले. त्या वेळी सावंतवाडीचे महाराज खेम सावंत भोसले यांचे नौदल व पोर्तुगीज नौदल यांच्यातील लढाईत सावंतवाडीचे महाराज खेम सावंत भोसले यांच्या नौदलाच पराभव केला. हे युद्ध चालू असताना जमिनीवर सुद्धा चकमकी चालू होत्या. शेवटी २३ नोव्हेंबर १७४६ रोजी सावंतवाडी सैन्याने पराभव मान्य करून किल्ला पोर्तुगीज्यांच्या ताब्यात दिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२३ नोव्हेंबर १७६२*
दिनांक १३ नोव्हेंबर १७६२ रोजी दोन प्रहरी दादाच्या व पेशव्यांच्या भेटी पारगांवावर झाल्या. उभयताच्या भेटी मल्हारराव होळकराने घडवून आणिल्या. “भेटीत रावसाहेबांनी चार किल्ले मात्र मागून घेतले. वरकड दादाचे मर्जीप्रमाणे जाबसाल करून आपली काबू साधिली. दादानी मुद्दे लिहून दिले. त्यावर त्यांनी करार याद लिहून दिली. मल्हारराव दरम्यान होऊन सल्ला ठरला.” माधवराव आपण होऊन चुलत्याचे स्वाधीन झाल्याने मुत्सद्दी व लढवय्ये विरोधी पक्षात सामील झालेले फशी पडल्यासारखे झाले. या संघर्षात दादास मदत करण्यास निजामअली आला होता. त्यास दादानी मेजवानीस दिनांक २३ नोव्हेंबर रोजी बोलावून स्नेह राखिला. पेशजी उदगीरवर घेतलेली ८५ लक्षाची जहागीर व दौलताबाद किल्ला परत देऊन सल्ला केला. ही जणू दादानी निजामास पुढील सहाय्यार्थ दिलेली लाचच होय. तेथे एकमताने असे ठरले की, मराठे व निजाम यांनी एकत्र होऊन निजामअल्लीचा कांटा काढावा.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२३ नोव्हेंबर १७५९*
गाजीउद्दीनखानाने नोव्हेंबर महिन्याचे १६ तारखेस शुक्रतालकडे मराठ्यांच्या मदतीस जाण्यासाठी बादशहाचा निरोप घेतला. परंतु अब्दालीने मराठ्यांना पंजाबातून काढून, तो प्रांत काबीज केला, ही बातमी त्यास कळताच त्याने अलमगीर बादशहास ठार मारले आणि दुसऱ्या दिवशी इन्तिजामउद्दौलाचीही तीच गत केली. बादशहाचा खून केला, ही वार्ता अब्दालीस समजताच बंडखोर व राजद्रोही वजीर गाजीउद्दीनखान याच पारिपत्य करण्यासाठी अब्दालीने दिल्लीवर चालून येण्याचे ठरविले मुलतान येथे ठाण्याचे बंदोबस्तासाठी जी सहा हजार मराठे फौज ठेविली होती त्या लोकांवर अब्दालीने हल्ला करून पांचशे सैनिक खेरीज सर्व फौज गारद केली. हे जीव बचावून आलेले पाचशे सैनिक देखिल उघडे बोडके अशा परिस्थितीत दत्ताजी शिंदेंच्या छावणीस २३ नोव्हेंबर १७५९ रोजी आले तेव्हा दत्ताजी शिंदेंस शुक्रतालचा वेढा उठविणे भाग पडले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२३ नोव्हेंबर १७७८*
इंग्रजांनी बेलापूर किल्ला जिंकून घेतला.
पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला त्यावेळी किल्ल्याला ५ बुरुज व भक्कम तटबंदी होती. गडाचा बालेकिल्ला ७५ फूट उंचीवर होता. गडावर २० तोफा होत्या. ३१ मार्च १७३७ रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व २२ एप्रिल १७३७ रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला. पानिपत युध्दानंतर सदाशिवभाऊच्या तोतयाला मानाजी आंग्रेनी बेलापूरच्या किल्ल्यात पकडले. इंग्रज कर्नल के याने २३ नोव्हेंबर १७७८ रोजी बेलापूर किल्ला जिंकून घेतला. १७७९ मध्ये वडगावच्या तहानुसार इंग्रजांना किल्ल्याचा ताबा मराठ्यांना परत द्यावा लागला. १२ एप्रिल १७८० रोजी कॅप्टन कॅम्बेलने बेलापूरचा किल्ला परत जिंकला; पण १७८२ च्या तहानुसार इंग्रजांना परत हा गड मराठ्यांना द्यावा लागला. २३ जून १८१७ रोजी कॅप्टन चार्ल्स ग्रे याने हा किल्ला जिंकून इंग्रज साम्राज्यात समाविष्ट केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२३ नोव्हेंबर १८०३*
आडगांवची लढाई - शिंद्याच्या वकीलानें वेलस्लीशीं युद्धतहकुबीचा ठराव केला.
२९ नोव्हेंबर १८०३ रोजीं एका बाजूस इंग्रज आणि दुसऱ्या बाजूस नागपूरकर भोसले व शिंदे यांच्या फौजा यांच्या दरम्यान झाली (इंग्रज मराठे युद्ध, दुसरें पहा) आडगांवची लढाई होण्याच्या पूर्वी रघूजी भोसल्याच्या सैन्याची छावणी गाविलगडानजीक आडगांव येथें पडली असून शिंद्याची फौज त्यांच्या छावणीपासून पांच मैलांच्या आंतच सिरसोली येथें होती. रघूजीच्या सैन्याचें आधिपत्य त्याचा भाऊ वेंकाजी उर्फ, मन्याबापू याजकडे असून त्याजवळ या वेळीं रघूजीचें सर्व पायदळ, कांहीं फौज व बऱ्याचशा तोफा होत्या. स्टीव्हन्सन यास जनरल वेलस्लीचा गाविलगडास वेढा देण्याचा हुकुम झाला असल्यामुळें तो तेथून जवळच येऊन पोहचला असून जनरल वेलस्ली हा त्याला मदत करण्याकरितां दक्षिणेकडून येत होता.
तारीख २३ नोव्हेंबर रोजीं शिंद्याच्या वकीलानें वेलस्लीशीं युद्धतहकुबीचा ठराव केला. परंतु भोसल्यानें अद्याप इंग्रजाकडे आपला वकील पाठविला नसल्यामुळें स्टीव्हन्सन हा भोंसल्यांशीं लढाई देण्याच्या तयारींत होता शिंद्याच्या वकीलानें इंग्रजांनीं भोसल्याशीं लढाई करूं नये म्हणून वेलस्लीपाशीं पुष्कळ रदबदली केली, परंतु वेलस्लीनें त्यास साफ सांगितलें कीं, युद्धतहकुबीचा ठराव भोंसल्याशीं झाला नसून तो फक्त तुमच्या आमच्यामध्यें आहे, एवढेंच नव्हे तर तुम्ही कबूल केलेल्या सर्व अटी पूर्ण केल्याशिवाय तुमच्याशीं चाललेलें युद्ध देखील तहकूब झालें असें समजण्यांत येणार नाहीं.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment