आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*११ नोव्हेंबर
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*११ नोव्हेंबर १६५७*
औरंगजेबची पत्नी दिलरास बानूचे निधन
औरंगजेबाने तख्त काबीज करण्याचा जणू चंगचं बांधला. तो बिदरहून उत्तरेकडे झेपावण्याकरिता संधी शोधत होता आणि त्याला ती मिळाली. ११ नोव्हेंबर, १६५७ रोजी त्याची पत्नी दिलरास बानू त्याच्या पाचव्या मुलास जन्म देताना मरण पावली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*११ नोव्हेंबर १६५९*
छत्रपती शिवरायांनी अफझलखानाला ठार मारले आणि नंतर लगेच त्यांनी "वाई" सोडली. त्यांच्या घोड्यांच्या टापा वळाल्या त्या थेट कराडच्या दिशेने.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*११ नोव्हेंबर १६७५*
छत्रपती शिवरायांनी "सातारा" प्रांत जिंकला.
११ नोव्हेंबर १६७५ रोजी सातारा काबीज झाला. महाराज साताऱ्यात गेले आणि गंभीर आजारी झाले. या आजराचे स्वरूप एवढे भयंकर होते की, त्यांच्या मृत्यूची अफवा झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*११ नोव्हेंबर १६७५*
विजापूरचा सरसेनापती बहलोलखान खवासखानाचे कोणतेच हुकुम पाळीत नव्हता. खावासखानाने अफगाण गटाचा बिमोड करण्यासाठी गुप्तपणे मोगलांचा दक्षिण सुभ्याचा सुभेदार बहादुरखान यास मदत मागितली. तसे बहादूरखान १९ ऑक्टोबर १६७५ रोजी भिमातीरास खवासखानाच्या भेटीसाठी आला. त्यालाही महाराजांविरुद्ध युद्ध करायचे होते व आदिलशाहीतून लाभ मिळवायचा होता. झालेल्या भेटीत त्याने वझीर खवासखानाला मदत देण्याचा व त्या बदल्यात महाराजांविरुद्ध मोहीम काढण्याचा करार केला. बहलोलखानास या हालचालींचा सुगावा लागला. त्यानेही एक गुप्त योजना आखली. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी बहालोल्खानाने खवासखानाला भोजनास बोलावून भरपूर मद्य पाजले आणि बेहोशीत कैद करून आपली जहागीर बंकापुर येथे कैदखान्यात टाकले. पश्चात लगेच विजापुरी जाऊन त्याने आदिलशहाकडून वझिरी प्राप्त केली.
बहादुरखानाने महाराजांविरुद्ध खवासखानाशी केलेली राजनीती अशारीतीने फसली. बहलोलखानाने वजीर बनताच दक्षिणी गटाचा सफाया करणे सुरु केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*११ नोव्हेंबर १६७९*
मराठ्यांनी खांदेरी येथील इंग्रजांविरूद्धचे युद्ध जिंकले.
डोव्ह नावाचे इंग्रजी गलबत आणि अनेक देशीविदेशी कैदी म्हणून ताब्यात. इंग्रजांना मराठ्यांच्या सागरी आरमाराचे सामर्थ्य पटले आणि पुढे २४ नोव्हेंबरला त्यांनी मराठ्यांशी तह केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*११ नोव्हेंबर १६८३*
पोर्तुगीजांनी फोंड्याचा वेढा उठवला.
५ दिवस सतत तोफा मारून सुद्धा यश येत नव्हते, विरजई निराश झाला होता, त्याला पादऱ्याांनी सावरले व सांगितले किल्ला पडल्यावाचून राहणार नाही, किल्लेदार येसाजी कंक आणि त्यांचे पुत्र कृष्णाजी कंक व मावळे अतिशय चिवटपणे लढा देत होते, त्यांना छत्रपती संभाजी महाराजांची कुमक मिळाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. जीव वाचवण्यासाठी विरजई ने माघार घेण्याचा निर्णय घेतला, मराठे खाडीची जागा ताब्यात घेतील व आपली वाट बंद होईल तेव्हा त्वरित माघार घेण्याचे ठरले. ११ नोव्हेंबर, १६८३ रोजी वेढा उठविला, परत फिरत असताना मराठ्यांनी तोफांवर छापा घातला पण त्या पोर्तुगीजांनी मिळवून दिला नाही आणि वाटेत दारुगोळा नष्ट केला पण तरी किल्लेदाराने ३०० पोती तांदूळ, २०० बैल आणि काही चीजवस्तू पळवल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*११ नोव्हेंबर १८१८*
शनिवारवाडा पुर्णपणे इंग्रजांच्या ताब्यात.
पेशवाईचा अंत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment