प्रथम कुलदेवता पुजन का करावे ?

प्रथम कुलदेवता पुजन का करावे ?

कुलदेव म्हणजे बाबा व कुलदेवी म्हणजे आई. त्याच प्रमाणे प्रत्येक कुल - घराण्याला कुलदेवता प्राप्त असतात. जसे आई बाबां शिवाय बालकाचा सर्वांगीण विकास व त्याचे संरक्षण होणे कठीण असते, तसेच कुलदेवतां शिवाय एखाद्या कुलाचे रक्षण व पोशण कठीण असते. 

प्रत्येक स्थानाची एक उर्जा असते व तसेच त्या स्थानावर उभ्या राहीलेल्या वास्तुची देखील विशीश्ट उर्जा असते. त्या वास्तुत राहणार्या प्रत्येक व्यक्तीचे विचार, आचरण, कर्म, ईत्यादी गोष्टींचा प्रभाव एकत्रीत पणे तेथील वास्तुचे वलय-उर्जेवर होत असतो. 

घरात वाईट मनोव्रुत्तीची व्यक्ती असल्यास, तीच्या नकारात्मक ऊर्जेमुळे घरातील वातावरण दुषीत बनते व तसेच घरावर एखाद्याची वाईट नजर असल्यास किंवा करणी-वास्तु अथवा कुलदेवता बंधन सारखे अघोरी द्रुष्ट प्रयोग झाल्यावर देखील घरातील वातावरण कलुशीत होउन उर्जा नकारात्मक जास्त जाणवते. 

तर एखादी सकारात्मक व्यक्ती घरात नीयमीत अध्यात्मीक साधना- नामस्मरण करणारी असेल तर त्या एका व्यक्तीच्या साधनेच्या बळाने संपुर्ण घरा भोवती सकारात्मक उर्जेचे कवच तयार होते. जर त्या साधक व्यक्तीस कुलदेवता अथवा सद्गुरू सिद्धपुरूषांच्या शक्तीची जोड असली तर त्याच्या परीसरात येणार्या प्रत्येक जीवास सकारात्मक उर्जेचा व अनुभवांची प्रचीती येते. 

कुलातील उर्जा वाढवण्याचे अथवा सकारात्मक ठेवण्याचे मुख्य कार्य कुलदेवतांचे असते. घरावर येणार्या संकटांची चाहुल साधकाला करून देणे, घरातील सदस्यांवर येणार्या द्रुष्ट शक्तींचा-संकटांचा प्रभाव कमी करणे, घरा भोवती संरक्षक कवच - वलय तयार करणे, ईत्यादी कार्य कुलदेवता करत असतात. 

अनेकदा एखाद्याच्या कुटुंबावर अमानवी प्रयोग करायचे झाल्यास प्रथम मांत्रीक त्या घरातील कुलदेवता बंधनात टाकतात ज्यामुळे नंतर घरावर ताबा मिळवने मांत्रीकास सोप्पे जाते कारण कुलदेवता म्हणजे कुलाचे जणु एक प्रकारची रोग प्रतीकार शक्ती असते, एकदा का ह्या कुलदेवता नामक प्रतीकार शक्तीस बंधनात टाकले कि घरावर सहज घात करता येतो. म्हणुन कुलदेवता नीत्य पुजन, अभीषेक, ३ वर्षातनं एकदा तरी कुलदेवता  देवभेटीस मुळ देवस्थानास जाणे, कुलाचार, नामस्मरण, मुख्य देवघरात कुलदेवीच्या नावाने मंगल कलश स्थापन करणे असे कार्य महत्वाचे असतात ज्यामुळे कुलदेवतांची उर्जा सात्वीक राहते. 
 कुलदेवतांना कधीच वीसरू नका, त्यांचे नाम रूप सदैव स्मरा कारण तुमच्या घरात हाकेला ओ देणारे प्रथम तेच आहेत. 

*II श्री कुलदेवताभ्यो नमः II

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४