आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१ डिसेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ डिसेंबर १६६१*
छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन १ डिसेंबर १६६१ ला जव्हारचे पहिले विक्रमशहाराजे यांना भेटावयास आले होते. विक्रमशहा राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना मानाचा शिरपेच दिला. ज्या ठिकाणी छत्रपतींना शिरपेच दिला. त्या ठिकाणाला 'शिरपामाळ' असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जव्हार भेटीच्या वार्तेने दिल्लीच्या सत्ताधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. सुरतेच्या या छाप्यानंतर दिल्लीच्या मोगलांमध्ये आणि जव्हारच्या संबंधांमध्ये वितुष्टता निर्माण झाली होती. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ डिसेंबर १६६३*
छत्रपती शिवरायांच्या भीतीने व दहशतीने घाबरून मुघल सरदार शाहीस्तेखान औरंगाबाद सोडून बंगालकडे रवाना झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ डिसेंबर १६६४*
छत्रपती शिवरायांनी कोकणातील राजापूर व दाभोळ जिंकले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ डिसेंबर १६७५*
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये अजिंक्यतारा स्वराज्यात सामील करून घेतला. १ डिसेंबर १६७५ ते २५ जानेवारी १६७६च्या डिसेंबर-जानेवारीमध्ये छत्रपती शिवराय अजिंक्यतारावर आजारी पडले होते. त्यावेळी तब्बल दोन महिने त्यांनी येथे विश्रांती घेतली होती. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ डिसेंबर १६८३*
छत्रपती संभाजी महाराजांची सालशेतला धडक पोर्तुगिजांचे धिंडवडे काढले. पोर्तुगिजांचे धर्मांधतेचे वेड फारच वाढले होते. त्याबरोबर स्त्रियांवरचे अत्याचार ननरीज व मोनेस्टीजमध्ये पोर्तुगिजांचा अत्याचार महाभयानक असाच होता. छत्रपती संभाजी महाराजांची एक तुकडी सालशेतमध्ये घुसली तर दुसरी बारदेश वर चालून गेली. मुळात छत्रपती संभाजी महाराजांचे सैन्य या भागात नवीन त्यात पोर्तुगिजांचा तोफखाना चांगला. शिवाय मजबूत अशी शिबंदी असूनही मराठी सैन्य तटाला भगदाड पाडून घोडदळासकट आत शिरून पोर्तुगिजांना पळवून लावले. पोर्तुगीज सैनिकांची यथेच्छ पिटाई करीत छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने १० दिवसाच्या प्रयत्नानंतर थिव्हीमचा किल्ला घेतला. इतर दोन किल्ले पोर्तुगीज सैन्य न लढल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात आले! पुढील २ ते ३ दिवसांत चापोरा गड देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात गेला. या चारही गडावरील अत्याचारी १४० पोर्तुगीज फादर्सना मराठी सैन्याने त्याच्या अंगावरील झगे काढून हात मागे बांधून उघड्या पाठीवर कोरडे काढत जेवढी करता येईल तेवढी मानखंडना करून कैदेत ठेवले. महाराजांनी साधारणततः महिण्याभरात सालशत व बारदेश प्रांत लुटून जाळून फस्त केला. या संबंध धामधुमीत छत्रपती संभाजी इतकी दहशत निर्माण केली की या संपूर्ण कालावधीत छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्यापुढे उभे राहण्यासही कोणी धजावला नाही. सोबत बारदेशच्या किल्ल्यांतून तब्बल ४६ तोफा छत्रपती संभाजी महाराजांनी नेल्या...!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ डिसेंबर १६९७*
संताजींच्या मृत्यूनंतर झुल्फिकार खानाच्या सैन्याने इ. स. १६९७ व्या पावसाळ्यात जिंजीस वेढा घातला. यावेळी राजाराम महाराजांकडे सैन्य नव्हते म्हणून रामचंद्रपंतास धनाजींस सैन्यासह ताबडतोब पाठविण्यास लिहिले. नंतर आणखी आणीबाणीची पत्रे पाठविली. परंतु महाराष्ट्रातून सैन्य लवकर येण्याची शक्यता न वाटल्यामुळे राजाराम महाराजांनी झुल्फिकार खानाबरोबर तहाचे बोलणे लाविले. बोलणी करण्यासाठी आपला दासीपुत्र कर्ण यांस कारकुनासह वांदिवाशला रवाना केले. २ ऑगस्ट १६९७ रोजी राजा कर्ण व कारकून मंडळी बांदिवाशला गेली. त्यांचे बोलणे ऐकून घेऊन झुल्फिकार खानाने ते बादशहास कळविले. ह्या बोलण्यात राजाराम महाराज मोगलांचे स्वामित्व पत्करण्यास तयार असून त्याप्रमाणे तह घडून यावा असा आशय त्यांत होता. परंतु औरंगजेबाने तहास मान्यता न देता जींजी काबीज करण्याचाच कडक आदेश दिला. तेव्हा झुल्फिकार खानाने कर्ण यांस परत पाठविले. यानंतर ८ नोव्हेंबर १६९७ त झुल्फिकार खानाने जिंजीचा वेढा कडक केला. किल्ल्याभोवती ठाणी बसवून ती सरदारांत वाटून दिली. दाऊदखान चिखली दुर्गाच्या पायथ्याशी ठाणी बसवून होता. त्याने धाडसाने चमार टेकडीवर हल्ला चढविला आणि एका रात्रीत त्याने किल्ला जिंकून घेतला. झुल्फिकार खानाने मनात आणले असते तर तो जिंजीला ज्या दिवशी पोचला त्याचदिवशी तो किल्ला हस्तगत करू शकला असता पण राजारामास सुखरूपपणे जिंजीहून पळून जाण्यासाठी त्याने मुद्दाम मोहीम लांबविली. राजाराम महाराजांपाशी युद्धसामग्री पुरेशी नव्हती. चमार टेकडी हातची गेली होती हे सर्व पाहून राजाराम महाराज घाबरले. त्यांनी खंडोबल्लाळ यांजला खानाकडे बोलणी करण्यास पाठविले. आपण कोणत्या बाजूने हल्ले करणार, तुम्हास बाहेर निघून जाण्यास कोणीकडुन कशी संधी ठेविली आहे इत्यादी प्रकार खानाने खंडोबल्लाळ मार्फत राजाराम महाराजांस कळविले. खानाच्या सैन्यांत गणोजी शिर्क सरदार होते. त्यांजला खंडोबल्लाळ भेटले आणि छत्रपतींच्या आणि त्याच्या कुटुंबीयांचा बचाव करण्याविषयी त्यांस त्यांनी गळ घातली. गणोजी शिर्के यांना दाभोळीच्या देशमुखीचे वतन हवे होते ते राजाराम महाराजांनी खंडोबल्लाळास दिले होते.खडोजींनी ते वतन लगेच गणोजींच्या हवाली करण्याचे कबुल केले आणि छत्रपतीकडून त्याच्या लेखी सनदा लिहून घेऊन शिरक्यांच्या हवाली करण्याचे कबूल केले. नंतर शिर्के यांनी राजाराम महाराजांस बुरख्याच्या पालखीत बसवून आपल्या आप्तांच्या बायका असे सांगून स्वतःच्या गोटांत आणिले. दुसरे दिवशी शिकारीचे निमित्त सांगून शिर्के राजाराम महाराजांस बरोबर घेऊन बाहेर पडले. जवळच धनाजींची फौज आली होती, तिच्या हवाली राजाराम महाराजांस केले तेथून राजाराम महाराज वेलोरास दि. १ डिसेंबर १६९७ रोजी गेले. वेलोरचा किल्ला मराठयांच्या ताब्यात होता. मानाजी मोरे नावाच्या किल्लेदाराने राजाराम महाराजांची सर्व व्यवस्था नीट ठेवली. अशा रीतीने राजाराम महाराजांची सुटका करवून झुल्फिकार खानाने राजाराम महाराजांशी मैत्री जोडण्यात त्याचा अंतिम हेतू बादशहाच्या मृत्यूनंतर गोवळकोंड्याचे राज्य घ्यावयाचे व राजाराम महाराजांस विजापूरचे राज्य द्यावयाचे हा होता किंवा काय हे समजण्यास पुरेसा पुरावा उपलब्ध नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४