आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१० नोव्हेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० नोव्हेंबर १६५३*
स्वराज्य संकल्पक शहाजी राजे यांचे एक अस्सल पत्र
प्रस्तुत पत्र शहाजी राजांनी १० नोव्हेंबर १६५३ रोजी लिहिलेले असुन सदर पत्र कौलनाम्याचे आहे.
या पत्रावर शहाजी महाराजांचा फारसीतील अष्टकोनी शिक्काही आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० नोव्हेंबर १६५७*
विजापूरच्या अदिलशाही दरबारात खान महम्मद यास अफजलखानाने ठार मारले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० नोव्हेंबर १६५९*
दिलेरखान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला. या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेले होते. त्यातीलच कण्हेरा गड या नावाचा डोंगरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. दिलेरखान हा कण्हेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर हा अत्यंतकडवा आणि हट्टी असा सरदार होता.
कण्हेऱ्याच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या सातशे मराठी पायदळानिशी तळ ठोकून होता. कारण मोगलांच्या फौजा केव्हा स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता. म्हणून ही सातशेची तुकडी गस्तीवर राहिली होती.या तुकडीचा नेता होता रामाजी पांगेरा. हा रामाजी विलक्षण शूर होता.
दि. १० नोव्हेंबर १६५९ त्याने पराक्रमाची शर्थ केली. तो हा रामाजी पांगेरा कण्हेऱ्यापाशी हो एक दिवस दिवसाउजेडी त्याला हेरांनी खबर दिली की, औरंगजेबाचा खासा सरदार दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळ घेऊन कण्हेऱ्यावर चालून येत आहे. दिलेरची फौज खरोखरच मोठी होती. त्याच्यापुढे रामाजीची फौज चिमूटभरच होती. ही खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामाजीने आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कण्हेरा गडावर जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि निर्धास्त ठरले असते. पण रामाजी पांगेऱ्यातला वाघोबा चवताळून उठला. तो आपल्या चिमूटभर मावळ्यांपुढे उभा राहीला. दिलेरखान मोठ्या फौजेनिशी चालून येतोय हे त्या चिमुकल्या मराठी तुकडीला समजलेच होते. रामाजी आपल्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि मोठ्या आवेशाततो गरजला,
"मर्दांनो , खानाशी झुंजायचंय , जे जातीचे असतील म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील ते येतील. मर्दांनो, लढाल त्याला सोन्याची कडी, पळाल त्याला चोळी बांगडी" असे बोलून रामाजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासेही फेकले. अन्दोन्ही हातात हत्यारे घेऊन त्याने एकच हरहर केला. साक्षात जणू भवानीच संचरली.
अवघ्या मराठी सैन्यानेही तसेच केले. मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठी सैन्य भयभयाट करू लागले. अन् दिलेरखान आलाच… वणव्यासारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने दिलेरखान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड अन् मुरारबाजी देशपांडा आठवला. झुंज शथीर्ची चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामाजीचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता. अखेर हट्टी दिलेर हटला. त्याचे सैन्य पळत सुटले. दिलेरलाही माघार घ्यावी लागली. रामाजी पांगेऱ्याने दाखवून दिले की, मराठीयांची पोरे आम्ही, भिणार नाही मरणाला. चिमूटभरांनी परातभरांचा पराभव केला.
कण्हेरा गडाला दिलेरखानची सावलीही स्पर्श करू शकली नाही. अशी माणसं महाराजांनी मावळ मुलखातून वेचून वेचून मिळविली होती. त्यातलाच हा रामाजी पांगेरा.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० नोव्हेंबर १६५९*
शिवप्रताप दिन
छत्रपती शिवाजी महाराज आणिअफझलखान यांच्यात प्रतापगडाचे युद्ध झाले. अफझलखानाच्या वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खर्‍या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला. इ.स.१६५९ ते इ.स.१८१८ या प्रदीर्घ कालावधीत इ.स.१६८९ मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही.
थोरले महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांना अटक करून त्यांची "विजापूर" शहरात धिंड काढणारा आणि छत्रपती शिवरायांचे सख्खे थोरले बंधू संभाजीराजे यांच्या मृत्यूस कारणीभूत असणारा क्रूर "अफझलखान" याचा छत्रपती शिवरायांनी वाघनखे आणि कट्यारीच्या साहाय्याने कोथळा बाहेर काढला.
पण त्यानंतर शिवरायांच्या अंगावर धावून आलेला अफझलखानाचा वकील गद्दार "कृष्णा भास्कर कुलकर्णी" याला सुद्धा महाराजांनी कापून काढला.
हाच तो हरामखोर कृष्णा भास्कर कुलकर्णी ज्याने छत्रपती शिवरायांवर वार केला, तो वार महाराजांच्या डोळ्याच्या वरती लागला. छत्रपती शिवरायांच्या अखंड आयुष्यात त्यांच्यावर झालेला हा एकमेव वार होय आणि तो केला "कृष्णा भास्कर कुलकर्णी" या गद्दाराने...
पण या दोघांनांही ठार करून छत्रपती शिवरायांनी खरा धार्मिक आणि सांस्कृतिक दहशतवाद संपवला...
१० नोव्हेंबर १६५९ च्या शिवप्रतापदिनाचे नायक...
१) संभाजी कावजी ,२) सिद्दी इब्राहीम , ३)काताजी इंगळे , ४)कोंडाजी कंक , ५) येसाजी कंक , ६) कृष्णाजी गायकवाड , ७) सुरजी कटके , ८) विसाजी मुरंमबक ,९) जिवाजी महाला १०) संभाजी करवार हेच ते दहा बेडर आणि दिलेर नरवीर ज्यांना १० नोव्हेंबर १६५९ रोजी अफजलखानाच्या भेटीस जाताना छत्रपती शिवरायांनी आपले शरीर रक्षक म्हणून सोबतीस घेतले होते..छत्रपती शिवरायांचे प्राणपणे रक्षण ह्या १० महान नरवीरांना शतकोटी प्रणाम,
आमचे कर्म शिवराय...आमचा धर्म शिवराय..

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० नोव्हेंबर १६५९*
सुपे, शिरवळ व सासवड परत शिवरायांकडे
१० नोव्हेंबर १६५९ ला शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाचा वध केला. त्याच दिवशी शिवरायांच्या मावळ्यांनी सुपे, शिरवळ व सासवड जिंकले. प्रतापगडापासून ह्या ठिकाणांचे अंतर पाहता ही आक्रमणे निर्धारित योजनेनुसार केली गेली होती व ती छत्रपती शिवाजीराजा-अफजलखान भेटीच्या परिणामावर अवलंबून नव्हती.
ह्या प्रकरणात छत्रपती शिवरायांनी आदिलशाही सैन्य व विशेषकरुन अफजलखानला ज्या प्रकारे भुलविले ते अभ्यास करण्याजोगे आहे. शिरवळ, सुपे व सासवड परत जिंकून घेणे ही निश्चितच आक्रमक चाल होती. भेटीच्या योजनेच्या सफलतेवर शिवरायांना किती दृढ विश्वास होता हे त्यातून दिसते. जरी अफजलखानला मारता आले नसते तरी ह्या तीन जागा घेतल्याने त्याला एक कणखर संदेश मिळाला असता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० नोव्हेंबर १६६५*
कोहिनूर हिरा
औरंगजेबाच्या आज्ञेप्रमाणे मोगल दरबारातील जवाहीरखान्यात बघितलेल्या अमूल्य रत्नांचे त्याने वर्णन केले आहे. रत्ने, मोती, दागिने यांचे वजन किती होते, ते ही लिहून ठेवले आहे. त्याने विविध देशांची चलने, तत्कालीन प्रचलित वजनेमापे, अंतरे, हिऱ्यांच्या खाणीं यांबद्दलही लेखन केले आहे. प्रसिद्ध ‘कोहिनूर’ हिऱ्याबद्दल तो लिहितो की, हा हिरा कोलारच्या खाणीत १६५६ किंवा १६५७ मध्ये मिळाला. त्याचे मूळ वजन ७८७.५ कॅरेट होते. हा मूळ हिरा त्याने औरंगजेबाच्या जवाहीरखान्यात १६६५ मध्ये बघितला होता. तेव्हा त्याचे वजन फक्त २८० कॅरेट होते; पण पुढे १७३८ मध्ये दिल्लीवर केलेल्या आक्रमणात नादिरशाहने केलेल्या लुटीत ‘कोहिनूर’ इराणमध्ये गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० नोव्हेंबर १६७९*
खांदेरी जिंकण्यासाठी सिद्दीचे सागरी आरमार मुंबईला पोचले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० नोव्हेंबर १६८०*
खालील पत्रावरून इंग्रजांना वाटणाऱ्या भितीचा दुजोरा मिळतो कारण हे पत्र सुरतेलाच उद्देशून आहे पण वेगळ्या ठिकाणून लिहिले गेले आहे. मराठ्यांच्या तीन तुकड्या मुघलांच्या मुलुखात वेगवेगळ्या दिशांना पाठवल्या आहेत असे त्यावरून कळते.
आमच्या शेवटच्या पत्रात आपल्या दिशेने येणाऱ्या काफिल्यांबद्दल आम्ही लिहिले होते. ते आपल्यापर्यंत सुखरूप पोहोचतील अशी आम्ही प्रार्थना करतो कारण त्यानंतर शिवाजीचे सैन्य देशावर आल्याची बातमी आम्हाला मिळाली आहे. त्यावरून असे कळते की घोडदळ व पायदळाच्या तुकड्या सुरत व बऱ्हाणपूरकडे निघाल्या आहेत व तिसरी तुकडी दख्खनकडे असलेल्या बहादुरखानला झुलवण्यासाठी पाठवली आहे. ह्या संकटापासून दूर राहण्यासाठी आम्ही सामानाची बांधाबांध करून ते शक्य तितक्या लवकर पाठवण्याची व्यवस्था करू.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० नोव्हेंबर १६८३*
याच दिवशी फोंड्याच्या मदतीस आलेल्या संभाजी महाराजांनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे जवळपास दोन महिने पोर्तुगीजांची अवस्था फार दयनीय करून टाकली होती. संभाजी महाराजांच्या धास्तीने शेवटी सेंट झेवियरच्या मृत शरीरास शरण जाऊन पोर्तुगीजांनी प्रार्थना केली. तरीही पोर्तुगीजांना शेवटची आशा होती ती मोघल राजपूत्र शहा आलम याच्या सैन्याच्या कोकणातील आगमनाची.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० नोव्हेंबर १७०३*
औरंगजेबाने पुणे सोडले. राजगडाला जाण्यासाठी त्याने सिंहगडावरून जाण्याचा मार्ग पत्करला. सिंहगड आिण राजगड याच्यामधील घाटाचा मार्ग नीट होण्यास वळे लागू
लागला, तसे बादशहाला सिंहगडच्या जवळ मुक्काम करावा लागला. बादशहाच्या छावणीत त्याच्याबरोबर शाहूराजे, रायभान भोसले ही मंडळीही होती. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० नोव्हेंबर १९२५*
राजेंद्रनाथ लाहिरी बनारस हिंदू विद्यापीठात एम.ए.चे शिक्षण घेत असताना क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. प्रसिद्ध क्रांतिकारक जोगेश्चन्द्र चटर्जी त्यांचे गुरु होते. क्रांतीकार्यासाठी लागणारा पैसा सरकारी खजिने लुटून गोळा करण्याचे काही क्रांतिकारकांनी ठरवले होते. ९ ऑगस्ट १९२५ ला दहा क्रांतिकारक ज्यांत अश्फाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी आणि सचिंद्र बक्षी हे क्रांतिकारक पण होते. काकोरी स्टेशन सोडून रेल्वे गाडी लखनौ कडे निघताच गाडीत विविध डब्यात आधीच बसलेल्या क्रांतिकारकांनी विशिष्ठ जागी गाडी पोचताच साखळी ओढून गाडी थांबवली व त्या गाडीतील सर्व खजिना घेऊन सर्व क्रांतिकारक पसार झाले. ह्या संबंधी जो खटला चालला तो काकोरी कट खटला म्हणून प्रसिद्ध आहे.
काकोरी कटाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश व बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी शोध मोहीम चालू केली होती. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी १० नोव्हेंबर १९२५ ला कलकत्ता येथील दक्षिणेश्वर भागातील दोन घरांवर छापे टाकले ज्यात पोलिसांना बोंब बनविण्याचा कारखानाच सापडला. ह्यावेळी एकूण ९ जणांना पकडण्यात आले ज्यात काकोरी कटात फाशी गेलेल्या राजेंद्रनाथ लाहिरी पण होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४