⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष 🚩🏇*३ नोव्हेंबर १६७८*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ नोव्हेंबर १६७८*
छत्रपती शिवरायांनी छत्रपती संभाजी महाराजांना परळी उर्फ सज्जनगडावर पाठवले. पण पुढे ३ डिसेंबर १६७८ रोजी छत्रपती संभाजी महाराज सज्जनगडावरून दिलेरखानाला म्हणजेच मुघलांना जाऊन मिळाले. इतिहासातील हा एक पितापुत्रात प्रदिर्घकाळ शिजलेला कट होता. याला एक प्रकारचा गनीमी कावाच म्हणता येईल.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ नोव्हेंबर १६७९*
खांदेरीची रणसंग्राम
इंग्रजांची अधिक कोंडी करण्यासाठी महाराजांनी पनवेल जवळ सैन्य गोळा करायला सुरुवात केली. लवकरच शिवाजी मुंबईवर चाल करून येणार अशा बातम्या थेट सुरत पर्यंत गेल्या. तिथल्या इंग्रज अधिकाऱ्याने मग ३ नोव्हेंबर १६७९ ला मुंबईकरांना या मोहिमेवरील खर्च खूप वाढल्याची आणि पदरी यश येत नसल्याची जाणीव करून दिली. त्यांच्या पत्रातून लिहिले की, ”शिवाजीराजांशी तहाची बोलणी चातुर्याने करावीत. चौलच्या सुभेदारामार्फत तहाची बोलणी करावी. शिवाजीचे लोक बेटाला सहज मदत करू शकतात, बेटावर किल्ल्याचे बांधकाम करू शकतात आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला दोन गलबते दिली मात्र तुम्हाला यश येत नाही. आता चिडून शिवाजी खुद्द मुंबईवर हल्ला करेल, तेंव्हा मुंबईचे चांगले रक्षण कसे करावे याचा विचार करावा... इत्यादी...

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ नोव्हेंबर १६८८*
अम्बर संस्थानचे राजा सवाई जयसिंग (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १७४३)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ नोव्हेंबर १६८९*
रायगड मुघलांच्या ताब्यात गेला
महाराष्ट्रात मोगल मराठा संघर्ष तीव्र झाला होता. रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी एकदिलाने लढा देऊन चिवट प्रतिकार करत होते. तिकडे इतिकदखानाने रायगडाचा वेढा चोख ठेवला होता. रायगडही मोगली वेढ्याला दाद देत नव्हता. पण तुंगभद्रा नदीकाठी झालेल्या संग्रामानंतर राजाराम महाराजांच्या अटकेच्या अफवेने सर्व नूर पालटला. रायगडावर भीतीचे ढग जमा होऊ लागले. दक्षिणेतून उलटसुलट बातम्या येत होत्या. त्यामुळे रायगडावरून येसूबाईंच्या सुटकेची आशा मावळत चालली होती. मोगलांची सरशी झाल्यास गडावरील राजकुटुंबास धोका होता. मोगली आक्रमणात त्यांची हत्या झाली असती किंवा कैदेत विटंबना झाली असती. त्यामुळे मोगलांशी सन्मानपूर्वक बोलणी करून वाटाघाटी करण्याकडे येसूबाईंचा कल झुकू लागला. त्याप्रमाणे त्यांनी इतिकदखानकडे निरोप पाठवला. इतिकदखानाने आलेल्या संधीचा फायदा उठवला. रायगड आपल्या ताब्यात आल्यास आपण संभाजी महाराजांच्या कुटुंबास सन्मानाने वागवू असा निरोप त्याने पाठविला. वाटाघाटींना हळूहळू यश येऊ लागले. ३ नोव्हेंबर १६८९ रोजी रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. योगायोगाने याच्या एकच दिवस अगोदर राजाराम महाराज सुखरूप जिंजीत पोहोचले होते. येसूबाईसाहेबांचा धोरणीपणा पुन्हा एकवार दिसून येतो. स्वराज्याचे जास्त नुकसान होऊ नये म्हणून त्या स्वतःहून कैदेत गेल्या. यावेळी त्यांच्या बरोबर युवराज शाहू, शिवरायांच्या पत्नी सकवारबाईसाहेब व रायगडावरील इतर प्रमुख अधिकारी व त्यांचे कुटुंबकबिले मोगलांच्या कैदेत गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४