आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० नोव्हेंबर १६४९*
युक्तीने कार्य होतसे !...
 इ.स. १६४९ च्या सुरुवातीपासून छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजीराजेंची सुटकेसाठी खटपट सुरु केली. शाहाजीसारखा मोहरा आपल्याला मिळतोय आणि शिवाजीमुळे दक्षिणेचा दरवाजा खुला होतोय या विचाराने खुष होऊन मुरादबक्षाने मार्च १६४९ आणि ऑगस्ट १६४९ मधे "तुमचा वकील पाठवणे" "तुम्ही हुजूर यावे म्हणजे मनसब व इनाम दिल्हा जाईल" या आशयाची पत्रे पाठवली. मुरादबक्षाने शाहाजीराजांना सोडवण्याचे प्रयत्न केले होते याचा पुरावा ३० नोव्हेंबर १६४९ च्या त्याच्या शाहाजीराजांना पाठवलेल्या पत्रात येतो, शाहजादा त्यात म्हणतो, "तुमची मोकळिक करण्याविषयी शिवाजीने लिहीले आहे. हल्ली आम्ही दिल्लीकडेस जात आहो. हुजूर पावल्यावर तुमचेविषयी अर्ज करून बंदोबस्त करून देऊ. तुमचा इतबारी वकील पाठवावा. तुम्हाकरिता पोषाख पाठवला आहे." 
शिवाजी-मुरादचा पत्रव्यवहार आदिलशहाच्या कानी पडला आणि त्याचं धाबं दणाणलं, एकीकडून कर्नाटकातले शाहाजीराजांना मानणारे हिंदू संस्थानिक चिडून जाऊन तिकडे असलेल्या शाहाजीपुत्र संभाजीला मिळतील आणि आपल्याविरुद्ध बंड करून उठतील ही भिती त्याला होती, आणि आतातर शाहाजीच्या सुटकेसाठी आदिलशाही गिळंकृत करायला साक्षात मुघल शाहजादा येऊन ठेपेल, या भितीने त्याला ग्रासले. अर्थाचा अनर्थ होऊ नये, म्हणून त्या भित्र्या बादशहाने शाहाजीराजांना इमानेइतबारे सोडण्याचा निर्णय घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० नोव्हेंबर १६५६*
मुअज्जमने दिल्ली सोडली
मुहम्मद आदिलशाहचा मृत्यू झाला त्याच दिवशी त्याचा मुलगा अली याला उत्तराधिकारी घोषित करुन बडी बेगम व वझीर मुहम्मद खानने गादीवर बसवला. त्यावेळी अली आदिलशाह फक्त आठरा वर्षांचा होता. आदिलशाही सरदारांमधे ह्या घटनेनंतर लगेच अंतर्गत कलह सुरु झाला.
कर्नाटकातील छोट्या राजांनी ह्या संधीचा फायदा घेऊन हातून गेलेले काही प्रांत पुन्हा जिंकले. त्याचवेळी मुघलांनाही ह्यात त्यांची पोळी भाजून घ्यायची होती. ९ नोव्हेंबर १६५६ ला औरंगजेबला आदिलशाहच्या मृत्यूबद्दल सांगण्यात आले. त्याने हा निरोप शाहजहानला पाठविला व आदिलशाहीविरुद्ध कारवाईसाठी कुमक मागवली.
२५ नोव्हेंबर १६५६ ला शाहजहानने त्याचा मुलगा मुअज्जम ह्याला वीस हजार सैन्यानिशी औरंगजेबकडे जायला सांगितले. ३० नोव्हेंबर १६५६ ला मुअज्जमने दिल्ली सोडली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० नोव्हेंबर १६५७*
छत्रपती शिवरायांनी कल्याण बंदरा जवळ दुर्गाडी कोटाचे बांधकाम सुरु केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० नोव्हेंबर १६६४*
एक डच व्यापारी आपल्या आधिकार्याला लिहीतो-
"खवासखानाच्या सैन्यास पोचविण्यासाठी कॅपटन घोरपडे ह्याच्या ताब्यांत विजापूरच्या राजानें जी रोकड रक्कम दिली होती तिच्यीवर बालेघाटांत अकस्मात हल्ला करुन व इतर काहीं जहाजें लुटून शिवाजी राजांनी लूट मिळविली, ती ८ लाख होन असावी असा अंदाज आहे आणि खुष्किच्या मार्गाने त्यांनी ह्या शिवाय २० लाखांचा माल लुटला असावा. कॅपटन घोरपडे ह्याला त्या शिवाजीराजांनी आकस्मात गांठून त्याच्यावर जो विजय  मिळविला तो विजय खवासखानाच्या कल्पनेपेक्षां फार निराळ्या प्रकारचा आहे, कारण घोरपडे एक उत्तम सेनापतींपैकी होता. त्याला इतकी जबर दुखापत झाली की, तो लौकरच मेला आणि पैशांखेरीज घोरपड्यांचे दोनशे लोक मारले गेले."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० नोव्हेंबर १६६७*
गोेव्यात हजर असणारा इंग्रजाचा वकील आपल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या मुख्य कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात म्हणतो की, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज बार्देस महालात शिरले व त्यांनी तिथल्या चार पाद्रयांची मुंडकी छाटली. त्यांच्या भयाने गोव्याच्या व्हाईसरायने हिंदू विरूद्ध काढलेला भयंकर हुकूम रद्द केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी संबंध प्रदेशाची जाळपोळ केली. ते १५० लक्ष पागोडा घेवून बार्देसमधून बाहेर पडले. शिवाजी महाराजांनी बार्देसवर जी स्वारी केली त्याला गोव्यातील हिंदूचा धार्मिक खेळ हे मुख्य कारण होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० नोव्हेंबर १६८४*
अकबराने कवी कलश यांना लिहिलेल्या पत्राची नोंद...!
'अकबर राजबारी (राजापुर) हून छत्रपती संभाजी महाराजांच्या भेटीसाठी निघाला. परंतु कवी कलश याने भेटीचा दिवस ३ मोहरम ठरविला. त्या दिवशी "अशुरा असल्याने सुमुहूर्त नाही. धर्माप्रमाणे अशुरात चांगल्या कामास सुरूवात करावयाची नसते तरी ११ किवा १२ मोहरम म्हणजेच ९ डिसेंबर किंवा १० डिसेंबर इ.स.१६८४  हा दिवस मसलतीस ठरविने. त्या दिवशी अकबर निघून शंकरपेठ (संगमेश्वर) वरून मलकापूरला जाईल".

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० नोव्हेंबर १६८६*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दक्षिण जिंकून घेण्यासाठी स्वराज्यावर चालून आला. महाराजांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज राज्यपदावर आल्यापासून त्यांनी मुघलांना सर्वच आघाड्यावर टक्कर दिली होती. पण शंभुराजे स्वराज्यासाठी लढत असतानाच स्वराज्यातीलच काही लोक मुघलांना आणि पोर्तुगीजांना सामील होत होते. इंग्रजांच्या बातमीनुसार फेब्रुवारी १६८५ मध्ये गोव्याजवळ राहणारा देसाई संभाजीराजेंना सोडून पोर्तुगीजाना मिळाला होता. कारवारच्या बाजूलाही देसाई व सावंत यांनी बंडखोरी चालू होती. याच दरम्यान मुघल सैन्य खेळणा, पन्हाळा, मिरज व बेळगाव या भागात शिरण्याचा आक्रमक प्रयत्न करत होते.एप्रिल १६८६ च्या दरम्यान मिरजेचा आदिलशाही किल्लेदार असदखान याने मिरजेचा किल्ला मुघलांच्या हवाली केला. हा किल्ला हाती आल्याने मुघलांना तिथे राहण्यासाठी जागा मिळाली. त्यामुळे मुघलांनी अधिक आक्रमक होत कोल्हापूर, पन्हाळा, बेळगाव या भागात हालचाली सुरू केल्या. याच दरम्यान इंग्रजानी स्वाली मरीन हुन लंडनला पाठवलेल्या पत्रात मुघलांनी पन्हाळा किल्ल्याला वेढा दिल्याचा उल्लेख केला आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० नोव्हेंबर १६८७*
मुंबईकर लिहितात की "या प्रांतात अन्नधान्याची फार टंचाई पडली आहे. त्यामुळे मृत्युसंख्या अतिशय वाढली आहे. जरी ईश्वराने या वर्षी विपुल पाऊस दिला आहे तरी पेरणी व लावणी करण्यांस माणसांचा तुटवडा असल्याने या वर्षीही दुष्काळ भासेल असे वाटते. फार तर थोडी सोडवणूक होईल इतकेच". यावरून २ वर्षे दुष्काळ पडलाच आणि इ.स.१६८८ वर्षेही कठीण जाणार अशी या वेळची अटकळ होती. परंतु मुख्य विचारात घ्यावयाची गोष्ट म्हणजे दुष्काळामुळे सैन्य भरतीला फार मोठा धोका पोहोचला ही होय.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० नोव्हेंबर १६९४*
संताजी घोरपडे शंकराजीपंतांचा निरोप घेऊन जिंजीला जाण्याच्या उद्देशाने प्रथम हैद्राबाद प्रांतात घुसले. पण औरंगजेबने आपल्यावर फौजबंद सरदार रवाना केले आहेत हे समजल्यावर त्या सरदारांस चकविण्यासाठी त्याने हैद्राबाद प्रांतातून जाण्याचे सोडून ते विजापूरच्या भागांत गेले. औरंगजेबने हिंमतखान बहादूर संताजी घोरपडेंच्या पाठीवर सोडला. पण हिंमतखान बहादूर याजपाशी संताजींचा मोड करण्याएवढे सैन्य नव्हते म्हणून त्याच्या मदतीस गाजिउद्दीनखानास पाठविण्यात आले. ३० नोव्हेंबर (१६९४) रोजी हिंमतखानाने संताजी घोरपडेंशी बाणूर गावाजवळ (भूपाळ गडजवळ, खानापूर तालुका, सांगली जिल्हा) लढाई केली. यात संताजींना माघार घ्यावी लागली. जानेवारी १६९५ च्या पहिल्या आठवड्यात रायचूरजवळ हिंमतखान बहादूर आणि संताजींचे युद्ध झाले. त्यांत दोन्हीकडील माणसे जखमी व घायाळ झाली. हिंमतखानाशी संताजींच्या ज्या लढाया झाल्या त्या निर्णायक नव्हत्या. धावपळीच्या लढाया होत्या. गनिमीकाव्यांने शत्रूशी धावत पळत लढत दिल्याचे दिसते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० नोव्हेंबर १७१५*
व्हिसेरेईने सुरत येथील पोर्तुगीज प्रतिनिधीला पाठविलेल्या पत्राची नोंद...!
आंग्रे यांचे पारिपत्य करण्यासाठी मोगल बादशहाने असगरअली खान या नावाच्या सरदाराची रवानगी केली. ही बातमी व्हिसेरेईला कळताच त्याला मोठा आनंद झाला. परंतु असालअली खानाने आंग्रे यांचे पारिपत्य केल्याची माहिती पोर्तुगीज कागद पत्रांत आढळत नाही. उलट हा सरदार लांचलुचपतीला बळी तर पडणार नाही ना अशी शंका व्हिसेरेईने सुरत येथील पोर्तुगीज प्रतिनिधीला पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. तो म्हणतो. "लांचलुचपतीला बळी पडणे हे मानवी स्वभावाला अनुसरून आहे. त्यामुळे सरदार असगरअली खान हा आंग्रे यांच्या लांचेस बळी पडणार नाही असे सांगता येत नाही.आंग्रे यांच्यापाशी सोने विपुल आहे त्याच्या बळावर तो मोगल सरदाराला वश करून घेऊन त्याला बादशहाचे हुकुम तहकूब करून ठेवावयास लावण्यास कमी करणार नाही".

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० नोव्हेंबर १८२७*
उमाजी नाईकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले की, आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील. फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० नोव्हेंबर १८७०*
श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज साहेब (कोल्हापूर) यांचे ३० नोव्हेंबर १८७० रोजी फ्लॉरेंस(इटली)मध्ये निधन झाले त्या वेळी त्यांची फ्लॉरेंस येथे समाधी बांधली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...