आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*४ नोव्हेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ नोव्हेंबर १६१८*
मुघल सम्राट औरंगजेब याचा जन्म दाहोद, गुजरात येथे झाला.
(मृत्यू: ३ मार्च १७०७)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ नोव्हेंबर १६५६*
बादशहा "मुहम्मद आदिलशाह" मरण पावला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ नोव्हेंबर १६६७*
औरंगाबाद (संभाजीनगर) येथे "छत्रपती संभाजीराजे" आणि "जसवंतसिंग राठोड" यांची भेट.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ नोव्हेंबर १६७९*
छत्रपती शिवरायांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या "जालना शहरावर" हल्ला करून खंडनी वसुल केली. तेथुन पुढे छत्रपती विश्रामगडाकडे गेले. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ नोव्हेंबर १६८०*
सवलती चालू ठेवण्याची इंग्रजांची मागणी छत्रपती संभाजी महाराजानी नाकारल्या नंतर त्यांचे धाबे दणाणले व त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. मराठ्यांचे सैन्य मुंबई जवळील कल्याणला होतेच व त्यांचे आरमारही राजापूरला होते.
मुंबईच्या इंग्रजांनी सुरतेतील त्यांच्या वखारीला लिहिलेल्या पत्रावरून स्पष्ट होते की त्यांना संभाजीच्या सैन्याची व नौदलाचा चांगलाच धाक वाटत होता. दौलतखानच्या हाताखाली संभाजीचे पाच हजार लोक राजापूरला असून उत्तरेकडे निघायच्या तयारीत आहेत असे ह्या पत्रातून त्यांनी कळवले आहे.
आम्हाला निश्चित बातमी मिळाली आहे की [संभाजी] राजाचे आरमार चार ते पाच हजार लोकांनिशी दौलतखानच्या हाताखाली राजापूरकडे आहे ज्यात सुमारे पन्नास गुराबा व गलबते आहेत. हे आरमार कधीही उत्तरेकडे येऊ शकते. त्यांचा हेतु काय आहे ते आम्हाला ठाऊक नाही परंतु आम्ही सिद्दीला बंदरात गलबते नांगरायला परवानगी देतो ते [संभाजी] राजाला अजिबात पसंत नसल्याचे कळते. ह्या धोक्यापासून सावध राहण्याची आम्ही पुरेपूर काळजी घेत आहोत जेणेकरून आमच्यावर अचानक आक्रमण होणार नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇


*४ नोव्हेंबर १७१२*
कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राऊन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇


*४ नोव्हेंबर १७३१*
शाहूमहाराजांनी पेशवे बाजीराव आणि उमाबाई यांची प्रत्यक्ष भेट घडवून आणली. 'श्रीमंतांचे बोलणे बहुत मिठास. हरप्रकारे करून उमासाहेबांची मर्जी राखली. वर कटकट न जाहली.' उमाबाईनीही मोठ्या मनाने बाजीरावांना माफ केले. बाजीरावानी निजामाची सारी लबाडी उमाबाईंना समजावून सांगितली. उमाबाईंनाही ते पटले. अन् सलूख होऊन उमाबाईंनी शाहूमहाराजांना आणि बाजीरावांना भोजनासाठी तळेगावात येण्याचे आमंत्रण दिले. उभयतांनी हे आमंत्रण आनंदाने कबूल केले. या काळात एक गोष्ट फार चांगली झाली. दाभाड्यांकडचे पिलाजी गायकवाड है अत्यंत शूर सरदार बाजीरावांनी आपल्या बोलण्यानेच जिंकून घेतले. शाहूमहाराजांनी उमाबाईच्या वतीने पिलाजी गायकवाडांना गुजरातच्या सुभ्यावर नेमले. पुढे बडोद्याचे गायकवाडच गुजरातचे सत्ताधीश बनले व स्वराज्याशी निष्ठेने राहू लागले. दाभाड्यांचा प्रश्न मार्गी लागला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ नोव्हेंबर १८४५*
वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म, भारतीय क्रांतिकारक
हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४