आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२५ नोव्हेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२५ नोव्हेंबर १६५४*
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतणे उमाजीराजे संभाजीराजे भोसले यांचा जन्म
शहाजीराजे आणि मातोश्री जिजाऊ याचे थोरलेसंभाजीराजे हे ज्येष्ठ पुत्र, उमाजी हे थोरल्या संभाजीराजांचे पुत्र.
शहाजीराजे इ.स. १६६४ मध्ये वारले तेंव्हा हा उमाजी दहा वर्षांचे होते. 
उमाजीस विजापूरकरांतर्फे जहागीर होती.
ऐन तिशीच्या सुमारास हे आपल्या तलवारीच्या बळावर पराक्रम गाजवत असल्याचा पुरावा इ.स.१६८३ च्या एका महजरावरून मिळतो.
उमाजींना बहादूरजी नावाचा एक पुत्र होता. त्यांचादेखील एक हुकूम उपलब्ध आहे. 
मालोजीराजे भोसले यांचे फर्जंद शहाजी संभजी यांचे फर्जंदौमाजी याचे बहादूरजी.....’ सरचा हुकूम १२ डिसेंबर १६८९ चा आहे. 
उमाजी शिवाय थोरल्या संभाजीराजांना सुरतसिंग आणि मातोजी असे आणखी दोन पुत्र असल्याचे पुरावे कानडी साधनात मिळतात.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२५ नोव्हेंबर १६५९*
अफजलखान मोहीम फत्ते करून रात्री छत्रपती शिवाजी महाराज सैन्यानिशी पुढच्या मोहिमेला निघाले. ११ नोव्हेंबर १६५९च्या पहाटे, म्हणजेच खानाच्या दारुण पराभवानंंतर १५ तासांच्या आत महाराज वाईत येऊन दाखल झाले. ते आईला आणि कुटुंबियांना भेटायला प्रतापगडावरून राजगडाला गेले नाहीत. विजयदिन साजरा करण्यासाठी आणि अन्य जल्लोष गाजविण्यासाठी क्षणभरही न थांबता पुढील प्रचंड विजय मिळविण्यासाठी ते आदिलशाही मुलुखावर आणि किल्ल्यांवर तुटून पडले.
अवघ्या १५ दिवसांत दि. २५ नोव्हेंबर १६५९ महाराज कोल्हापुरात, नेताजी पालकर विजापुरास, दौलोजी कोकणात राजापुरास आणि इतर चार मावळी सरदार शिरवळ, सासवड, सुपे आणि पुणे या ठाण्यांवर जाऊन धडकले. शिरवळ, सुपे ही चारही ठाणी मराठ्यांनी खानाच्या वधाच्याच दिवशी (दि. १० नोव्हेंबर) काबीज केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२५ नोव्हेंबर १६६४*
सिंधुदूर्गाच्या बांधकामाची मालवण नजिकच्या कुरटे बेटावर सुरूवात.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२५ नोव्हेंबर १६८३*
छत्रपति संभाजी राजांनी पोर्तुगीज विरोधी गोवा स्वारीत कुंभारजुव्याचा किल्ला जिंकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२५ नोव्हेंबर १७४०*
पोर्तुगीजांचा मराठ्यांबरोबर तह
फेब्रुवारी १७३९ मधे गोव्याजवळ आले होते व्हॉईसरॉयने रेवदंडा डच सत्तेला देण्यास कबूल केले व मराठ्यांविरुद्ध मदत मागितली पण डचांनी नकार दिला. मानाजी आंग्रे यांनी २३ फेब्रुवारी १७३९ रोजी रेवदांड्यावर झडप घातली मोर्चे लावले ते पोर्तुगीजांना भारी पडले व उडवून लावले पण मानाजी आंग्रे ह्यांनी जिद्द काही सोडली नाही उलट एप्रिल १७३७ मधे रेवदांडा पडकोट जिंकला व स्वराज्यात आणला आणि मराठ्यांचे वर्चस्व चालू ठेवले हे बघून पोर्तुगीज सत्ता कमजोर झाली व त्यांनी पार वसईच्या शरणागती नतंर हयातीत ठेवलेले किल्ले होते फक्त दिव दमण...

२५ नोव्हेंबर १७४० रोजी तहानुसार मराठ्यांनी पोर्तुगीजांना कुंकळली व असोळणे हि साष्टीतील दोन गावे दिली आणि त्याबद्दल पोर्तुगीजांकडून रेवदांडा कोट ( चौल ) व कोरलाई किल्ला ( castle curlew ) हे समोरा समोर चे दोन किल्ले स्वराज्यात परत शामिल करून घेतले...

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२५ नोव्हेंबर १७५२*
शिंदे-होळकरांसह गाझिउद्दीन
ऑक्टोबरमध्ये औरंगाबादेस येऊन पोहोचला. १६ ऑक्टोबर १७५२ रोजी त्यास निजामअलीच्या आईने
भोजनास बोलावून विषप्रयोगाने ठार मारिले. ही बातमी पेशव्यास समजली. त्यावेळी पेशवे शहागडावर होते. तेथे त्यास शिंदे-होळकर भेटले. त्या सर्वांनी माघार न घेता सलाबतजंगावर चाल केली. यावेळी सलाबतजंगाचा मुकाम भालकीवर होता. तेथे त्यास कोंडून धरले. बुसीने वाटाघाटी करण्यास पुढाकार घेतला. पेशव्यांनी गाझीउदीनने ज्या गोष्टी कबूल केल्या होत्या त्या सर्व कबूल करण्यास सलाबतजंगास भाग पाडले. पेशवे व सलाबतजंग यांची भेट होऊन तारीख २५ नोव्हेंबर इ.स.१७५२ रोजी तह कायम झाला. या तहालाच भालकीचा तह या नावाने ओळखला जातो.या तहाने त्रिंबक किल्ला पेशव्यांकडे राहिला. तेचे मशीद काढून श्रीचे देवालयाचे काम चालीस लाविले. कुशावर्त बांधिले. पेशव्यांनी भालकीच्या तहानंतर व हिंदुस्तान मोगली सत्तेतून हळुहळु सोडविण्याचा संकल्पित केला. या तहाने जुन्नर,नगर,खांदेश इ.ठिकाणचा बराच प्रदेश पेशव्यांस मिळाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२५ नोव्हेंबर १७९०*
अजमेरबरोबर पुष्कर तीर्थसुद्धा महादजीबाबांच्या ताब्यात आले. तेथे त्यांनी लाखो रुपये धर्म करून मोठे देवालय बांधिले. जिंकलेल्या मुलखाचा कारभार लखबादादाकडे सोपविला. जोधपूरप्रमाणे जयपूरचा मामलाही सन १७९० अखेर उरकला. प्रतापसिंगाने पूर्वीच्या मागणीप्रमाणे खंडणी कबूल करून आपला बचाव केला. विजयसिंगाने पुढे महादजीबावांविरुद्ध हालचाल केली नाही. अलवारचा प्रतापसिंग माचेडीकर दिनांक २५ नोव्हेंबर १७९० रोजी मरण पावला. हा बावांचा दोस्त होता. म्हणून त्याचा मुलगा वखावरसिंगास बावानी समाधानाची पत्रे व सरफराजीची वस्रे पाठविली. अलवारचा प्रांत हा खरा जयपूरकरांचा प्रांत. तो पुन्हा जयपूरकरानी हस्तगत करू नये अशी तजवीज महादजीबावानी करून ठेविली. अलवार, धोलपूर व थोडे बहुत भरतपूर ही राज्ये महादजीबावांच्या कर्तृत्वाने आकार घेती झाली. हे इतिहासास विसरता येणार नाही.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...