*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२ नोव्हेंबर
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ नोव्हेंबर १६७७*
छत्रपती शिवरायांनी तंजावरची ठाणी जिंकली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ नोव्हेंबर १६८९*
छत्रपती राजाराम महाराज जिंजीत दाखल
हरजीराजे महाडिकांच्या निधनानंतर जिंजीचा सर्व कारभार शिवरायांची कन्या अंबिकाबाई यांच्याकडे आला. राजारामांचे दक्षिणेतील आगमन त्यांच्या अधिकारावर गदा आणणारे ठरले. त्यामुळे त्यांनी आपल्या सावत्रभावाला विरोध करायचा ठरवले. २८ ऑक्टोबर १६८९ रोजी राजाराम वेल्लोरच्या कोटात पोहोचले. तेथून त्यांनी आपल्या सावत्रबहिणीकडे आपला वकील पाठवला व जिंजीचा किल्ला स्वाधीन करण्याविषयी निरोप दिला. परंतु उलट अंबिकाबाईंनी राजारामांविरुद्ध लढण्याचा पावित्रा घेतला. त्या वेल्लोरच्या दिशेने ससैन्य निघाल्या. पण वाटेत त्यांच्या सैन्य अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली. आपली लंगडी बाजू बघता त्यांनी माघार घेतली. राजाराम महाराजांना दक्षिणेतील विविध मराठी किल्लेदार, ठाणेदार, मुलकी, प्रशासनिक व लष्करी अधिकाऱ्यांनी स्वराज्याचे छत्रपती म्हणून मान्यता देण्यास सुरुवात केली. त्यामुळे अंबिकाबाईंचा विरोध पूर्णपणे निष्प्रभ ठरला व त्यांनी जिंजी किल्ला राजारामांच्या स्वाधीन केला. २ नोव्हेंबर १६८९ रोजी राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात पोहचले आणि तिथून कारभार पाहू लागले, राजाराम महाराजांनी स्वतःस राज्याभिषेक न करवता मंचकरोहण करून छत्रपतीपद आणि राजचिन्हे धारण केली.
राजाराम महाराजांनी राज्याभिषेक न करून घ्यायचे कारण स्पष्ट होते ते कैदेत असलेल्या थोरल्या शाहूंना स्वराज्याचे वारसदार मानत होते, या संदर्भात राजाराम महाराजांच्या एका पत्रातील सारांश खूप महत्त्वाचा आहे ते लिहतात
" चिरंजीव ( शाहूराजे ) काले करून श्री देशी ( स्वराज्यात ) आणील .. ते ( शाहू ) मुख्य. सर्व राज्यास अधिकारी. आम्ही करिता तरी त्याचेसाठीच आहे. प्रसंगास सर्व लोकांस तिकडेच ( शाहूकडेच ) पाहणे येईल व वागतील हे कारण ईश्वरीय नेमिले आहे "
छत्रपती राजाराम महाराजांच्या या पत्रातील सारांश राजाराम महाराजांची स्वराज्याप्रती त्यागाची भूमिका स्पष्ट तर करतोच पण थोरल्या शाहू महाराजांवरील प्रेम, आपुलकीच्या भावनेची ग्वाही देखील देतो.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ नोव्हेंबर १७६३*
१० आॅगस्ट १६७३ ला मराठे व निजाम यांच्यात लढाई झाली, त्यात निजामाचा दारूण पराभव झाला.
राक्षसभुवन येथील लढाईवरून माधवराव पेशव्यांची स्वारी मुहूर्ताने पुण्यात दाखल झाली. दुसर्या दिवशी संध्याकाळी त्यांच्यासमोर जनकोजी शिंदेंचा तोतया रघुजी थोरातला उभे केले.
१७६३ ला जनकोजी शिंदे नावाचा इसम करकुंब येथे प्रगट होऊन त्याने दोन हजार फौज जमा केली. मोठा भ्रम लोकांना उत्पन्न झाला. जनकोजी प्रमाणेच त्याच्या खाणाखुणा पटल्या. गोपिकाबाईंनी विश्वासु माणसे पाठवून तपास केला. भापकर, गराडे, सरलष्कर, गाढवे, जाधव इत्यादी शिंद्यांच्या माणसांनी त्यास ओळखून एकताटी भोजन केले. संगमा जवळ आणून उतरविला. नाना पुरंदरे व गोविंद शिवराम यांनी तपास करून हा रघुजी थोरात असा निर्णय दिला. त्यास कैद करून ठेवण्यात आले. साथीदार सापडले त्यांना पण कैदेत ठेवले. शिंद्यांच्या कुटुंबात मोठी गडबड उडाली. रघुजी थोराताची बायको, भाऊ, आणि आई या सर्वाना आणण्यात आले. त्यांनी रघुजीला ओळखले. सर्वांसमोर बायकोने सांगितले हा रघुजी थोरात जनकोजी नव्हे श्रीमंतांनी तोतयाला शिक्षा दिली. तोतयाचे दोन्ही कान कापण्यात आले. त्यास व्यंग करून सोडून दिला. दुसरे दिवशी विहिरीत उडी घेऊन तो मृत्यु पावला. त्याचे दहनक्रियेस श्रीमंतांनी आज्ञा दिली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment